2 Samuel 12
marc (MARC) vs ARA
1 नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब.
1 O Senhor enviou Natã a Davi. Chegando Natã a Davi, disse-lhe: Havia numa cidade dois homens, um rico e outro pobre.
2 श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती,
2 Tinha o rico ovelhas e gado em grande número;
3 परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती.
3 mas o pobre não tinha coisa nenhuma, senão uma cordeirinha que comprara e criara, e que em sua casa crescera, junto com seus filhos; comia do seu bocado e do seu copo bebia; dormia nos seus braços, e a tinha como filha.
4 “त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”
4 Vindo um viajante ao homem rico, não quis este tomar das suas ovelhas e do gado para dar de comer ao viajante que viera a ele; mas tomou a cordeirinha do homem pobre e a preparou para o homem que lhe havia chegado.
5 हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे!
5 Então, o furor de Davi se acendeu sobremaneira contra aquele homem, e disse a Natã: Tão certo como vive o Senhor , o homem que fez isso deve ser morto.
6 त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.”
6 E pela cordeirinha restituirá quatro vezes, porque fez tal coisa e porque não se compadeceu.
7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.
7 Então, disse Natã a Davi: Tu és o homem. Assim diz o Senhor , Deus de Israel: Eu te ungi rei sobre Israel e eu te livrei das mãos de Saul;
8 तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते.
8 dei-te a casa de teu senhor e as mulheres de teu senhor em teus braços e também te dei a casa de Israel e de Judá; e, se isto fora pouco, eu teria acrescentado tais e tais coisas.
9 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस.
9 Por que, pois, desprezaste a palavra do Senhor , fazendo o que era mau perante ele? A Urias, o heteu, feriste à espada; e a sua mulher tomaste por mulher, depois de o matar com a espada dos filhos de Amom.
10 तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’
10 Agora, pois, não se apartará a espada jamais da tua casa, porquanto me desprezaste e tomaste a mulher de Urias, o heteu, para ser tua mulher.
11 “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.
11 Assim diz o Senhor : Eis que da tua própria casa suscitarei o mal sobre ti, e tomarei tuas mulheres à tua própria vista, e as darei a teu próximo, o qual se deitará com elas, em plena luz deste sol.
12 तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”
12 Porque tu o fizeste em oculto, mas eu farei isto perante todo o Israel e perante o sol.
13 नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.”
13 Então, disse Davi a Natã: Pequei contra o Senhor . Disse Natã a Davi: Também o Senhor te perdoou o teu pecado; não morrerás.
14 परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”
14 Mas, posto que com isto deste motivo a que blasfemassem os inimigos do Senhor , também o filho que te nasceu morrerá.
15 नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला.
15 Então, Natã foi para sua casa. E o
16 दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
16 Buscou Davi a Deus pela criança; jejuou Davi e, vindo, passou a noite prostrado em terra.
17 त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही.
17 Então, os anciãos da sua casa se achegaram a ele, para o levantar da terra; porém ele não quis e não comeu com eles.
18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”
18 Ao sétimo dia, morreu a criança; e temiam os servos de Davi informá-lo de que a criança era morta, porque diziam: Eis que, estando a criança ainda viva, lhe falávamos, porém não dava ouvidos à nossa voz; como, pois, lhe diremos que a criança é morta? Porque mais se afligirá.
19 आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?”
19 Viu, porém, Davi que seus servos cochichavam uns com os outros e entendeu que a criança era morta, pelo que disse aos seus servos: É morta a criança? Eles responderam: Morreu.
20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.
20 Então, Davi se levantou da terra; lavou-se, ungiu-se, mudou de vestes, entrou na Casa do Senhor e adorou; depois, veio para sua casa e pediu pão; puseram-no diante dele, e ele comeu.
21 त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”
21 Disseram-lhe seus servos: Que é isto que fizeste? Pela criança viva jejuaste e choraste; porém, depois que ela morreu, te levantaste e comeste pão.
22 त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’
22 Respondeu ele: Vivendo ainda a criança, jejuei e chorei, porque dizia: Quem sabe se o Senhor se compadecerá de mim, e continuará viva a criança?
23 परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”
23 Porém, agora que é morta, por que jejuaria eu? Poderei eu fazê-la voltar? Eu irei a ela, porém ela não voltará para mim.
24 नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली;
24 Então, Davi veio a Bate-Seba, consolou-a e se deitou com ela; teve ela um filho a quem Davi deu o nome de Salomão; e o Senhor o amou.
25 कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह असे ठेवले.
25 Davi o entregou nas mãos do profeta Natã, e este lhe chamou Jedidias, por amor do Senhor .
26 त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले.
26 Entretanto, pelejou Joabe contra Rabá, dos filhos de Amom, e tomou a cidade real.
27 नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे.
27 Então, mandou Joabe mensageiros a Davi e disse: Pelejei contra Rabá e tomei a cidade das águas.
28 तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.”
28 Ajunta, pois, agora o resto do povo, e cerca a cidade, e toma-a, para não suceder que, tomando-a eu, se aclame sobre ela o meu nome.
29 त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले.
29 Reuniu, pois, Davi a todo o povo, e marchou para Rabá, e pelejou contra ela, e a tomou.
30 दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली
30 Tirou a coroa da cabeça do seu rei; o peso da coroa era de um talento de ouro, e havia nela pedras preciosas, e foi posta na cabeça de Davi; e da cidade levou mui grande despojo.
31 आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
31 Trazendo o povo que havia nela, fê-lo passar a serras, e a picaretas, e a machados de ferro, e em fornos de tijolos; e assim fez a todas as cidades dos filhos de Amom. Voltou Davi com todo o povo para Jerusalém.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Samuel 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.