2 Reis 6

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे.
1 Disseram os discípulos dos profetas a Eliseu: Eis que o lugar em que habitamos contigo é estreito demais para nós.
2 चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.”
2 Vamos, pois, até ao Jordão, tomemos de lá, cada um de nós uma viga, e construamos um lugar em que habitemos. Respondeu ele: Ide.
3 त्यापैकी एकाने म्हटले, “कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?”
3 Disse um: Serve-te de ires com os teus servos. Ele tornou: Eu irei.
4 आणि तो त्यांच्यासोबत गेला.
4 E foi com eles. Chegados ao Jordão, cortaram madeira.
5 त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्‍हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्‍हाड उसनी मागून आणली होती!”
5 Sucedeu que, enquanto um deles derribava um tronco, o machado caiu na água; ele gritou e disse: Ai! Meu senhor! Porque era emprestado.
6 परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्‍हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले.
6 Perguntou o homem de Deus: Onde caiu? Mostrou-lhe ele o lugar. Então, Eliseu cortou um pau, e lançou-o ali, e fez flutuar o ferro,
7 तो म्हणाला, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली.
7 e disse: Levanta-o. Estendeu ele a mão e o tomou.
8 त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.”
8 O rei da Síria fez guerra a Israel e, em conselho com os seus oficiais, disse: Em tal e tal lugar, estará o meu acampamento.
9 परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.”
9 Mas o homem de Deus mandou dizer ao rei de Israel: Guarda-te de passares por tal lugar, porque os siros estão descendo para ali.
10 परमेश्वराच्या मनुष्याने सांगितलेले ठिकाण इस्राएलच्या राजाने पडताळून पाहिले. अलीशाने राजाला वारंवार सावध केले, जेणेकरून तो अशा ठिकाणी सावध राहिला.
10 O rei de Israel enviou tropas ao lugar de que o homem de Deus lhe falara e de que o tinha avisado, e, assim, se salvou, não uma nem duas vezes.
11 तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्‍यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?”
11 Então, tendo-se turbado com este incidente o coração do rei da Síria, chamou ele os seus servos e lhes disse: Não me fareis saber quem dos nossos é pelo rei de Israel?
12 तेव्हा एका अधिकार्‍याने म्हटले, “माझे स्वामी महाराज, आपल्यापैकी कोणीही नाही, परंतु इस्राएलमधील अलीशा जो संदेष्टा, तो इस्राएलाच्या राजाला तुम्ही तुमच्या विश्रांतिगृहात उच्चारलेले प्रत्येक शब्द कळवितो.”
12 Respondeu um dos seus servos: Ninguém, ó rei, meu senhor; mas o profeta Eliseu, que está em Israel, faz saber ao rei de Israel as palavras que falas na tua câmara de dormir.
13 राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.”
13 Ele disse: Ide e vede onde ele está, para que eu mande prendê-lo. Foi-lhe dito: Eis que está em Dotã.
14 मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.
14 Então, enviou para lá cavalos, carros e fortes tropas; chegaram de noite e cercaram a cidade.
15 दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?”
15 Tendo-se levantado muito cedo o moço do homem de Deus e saído, eis que tropas, cavalos e carros haviam cercado a cidade; então, o seu moço lhe disse: Ai! Meu senhor! Que faremos?
16 संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण त्यांच्यासोबत जे आहेत, त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.”
16 Ele respondeu: Não temas, porque mais são os que estão conosco do que os que estão com eles.
17 मग अलीशाने ही प्रार्थना केली, “हे याहवेह, याचे डोळे उघडा, म्हणजे तो पाहू शकेल.” तेव्हा याहवेहने त्या सेवकाचे डोळे उघडले, आणि त्याने दृष्टी वर केली आणि पाहिले की, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे आणि रथ यांनी भरलेला आहे.
17 Orou Eliseu e disse: Senhor , peço-te que lhe abras os olhos para que veja. O Senhor abriu os olhos do moço, e ele viu que o monte estava cheio de cavalos e carros de fogo, em redor de Eliseu.
18 जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले.
18 E, como desceram contra ele, orou Eliseu ao Senhor e disse: Fere, peço-te, esta gente de cegueira. Feriu-a de cegueira, conforme a palavra de Eliseu.
19 मग अलीशा त्यांना म्हणाला, “हा तो रस्ता नाही आणि हे ते नगरही नाही. माझ्यामागे या म्हणजे जो मनुष्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” आणि त्याने त्यांना शोमरोनात नेले.
19 Então, Eliseu lhes disse: Não é este o caminho, nem esta a cidade; segui-me, e guiar-vos-ei ao homem que buscais. E os guiou a Samaria.
20 शोमरोनात प्रवेश केल्यानंतर, अलीशाने प्रार्थना केली, “हे याहवेह, आता या माणसांचे डोळे उघडा म्हणजे ते पाहू शकतील.” तेव्हा याहवेहने त्यांचे डोळे उघडले, आणि त्यांनी पाहिले की ते इस्राएलची राजधानी शोमरोनामध्ये आहेत.
20 Tendo eles chegado a Samaria, disse Eliseu: Ó Senhor , abre os olhos destes homens para que vejam. Abriu-lhes o Senhor os olhos, e viram; e eis que estavam no meio de Samaria.
21 जेव्हा इस्राएलाच्या राजाने त्यांना पहिले, तेव्हा त्यांनी अलीशाला विचारले, “मी त्यांचा वध करू काय, माझ्या पित्या, मी त्यांचा वध करू काय?”
21 Quando o rei de Israel os viu, perguntou a Eliseu: Feri-los-ei, feri-los-ei, meu pai?
22 अलीशाने उत्तर दिले, “त्यांचा वध करू नको. तुम्ही आपल्या तलवारीने किंवा धनुष्याने पकडलेल्यांना माराल का? त्यांच्यापुढे अन्न व पाणी ठेवा म्हणजे ते खाऊन पिऊन तृप्त होतील आणि नंतर त्यांच्या स्वामीकडे परत जातील.”
22 Respondeu ele: Não os ferirás; fere aqueles que fizeres prisioneiros com a tua espada e o teu arco. Porém a estes, manda pôr-lhes diante pão e água, para que comam, e bebam, e tornem a seu senhor.
23 तेव्हा राजाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी केली, आणि त्यांचे खाणेपिणे झाल्यानंतर त्यांना पाठवून दिले आणि ते आपल्या स्वामीकडे परत आले. त्यानंतर अरामाच्या टोळ्यांनी इस्राएली देशावर हल्ला करण्याचे थांबविले.
23 Ofereceu-lhes o rei grande banquete, e comeram e beberam; despediu-os, e foram para seu senhor; e da parte da Síria não houve mais investidas na terra de Israel.
24 काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.
24 Depois disto, ajuntou Ben-Hadade, rei da Síria, todo o seu exército, subiu e sitiou a Samaria.
25 शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.
25 Houve grande fome em Samaria; eis que a sitiaram, a ponto de se vender a cabeça de um jumento por oitenta siclos de prata e um pouco de esterco de pombas por cinco siclos de prata.
26 एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्‍या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!”
26 Passando o rei de Israel pelo muro, gritou-lhe uma mulher: Acode-me, ó rei, meu senhor!
27 राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”
27 Ele lhe disse: Se o Senhor te não acode, donde te acudirei eu? Da eira ou do lagar?
28 मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?”
28 Perguntou-lhe o rei: Que tens? Respondeu ela: Esta mulher me disse: Dá teu filho, para que, hoje, o comamos e, amanhã, comeremos o meu.
29 तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्‍या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.”
29 Cozemos, pois, o meu filho e o comemos; mas, dizendo-lhe eu ao outro dia: Dá o teu filho, para que o comamos, ela o escondeu.
30 जेव्हा राजाने स्त्रीचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपला अंगरखा फाडला. त्याला तटावरून फिरत असता लोकांनी पाहिले आणि त्यांच्या नजरेस आले की त्याच्या अंगरख्या खाली त्याने गोणपाट गुंडाळलेले आहे.
30 Tendo o rei ouvido as palavras da mulher, rasgou as suas vestes, quando passava pelo muro; o povo olhou e viu que trazia pano de saco por dentro, sobre a pele.
31 तो म्हणाला, “मी जर आज शाफाटाचा पुत्र अलीशाचे शिर उडविले नाही, तर परमेश्वर माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
31 Disse o rei: Assim me faça Deus o que bem lhe aprouver se a cabeça de Eliseu, filho de Safate, lhe ficar, hoje, sobre os ombros.
32 अलीशा आपल्या घरात बसलेला होता आणि वडीलजन त्याच्यासोबत बसलेले होते. राजाने आपल्यापुढे दूत पाठविला, पण तो येण्यापूर्वी अलीशा वडीलजनांना म्हणाला, “या खुनी मनुष्याने माझा शिरच्छेद करण्यासाठी कोणाला तरी पाठविले आहे, हे तुम्ही पाहिले काय? पाहा, जेव्हा दूत येईल तेव्हा दार बंद करून त्याला बाहेरच ठेवा, कारण त्याच्या पाठोपाठ त्याच्या धन्याच्या पावलांचा आवाज आहे की नाही?”
32 Estava, porém, Eliseu sentado em sua casa, juntamente com os anciãos. Enviou o rei um homem de diante de si; mas, antes que o mensageiro chegasse a Eliseu, disse este aos anciãos: Vedes como o filho do homicida mandou tirar-me a cabeça? Olhai, quando vier o mensageiro, fechai-lhe a porta e empurrai-o com ela; porventura, não vem após ele o ruído dos pés de seu senhor?
33 अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला.
33 Falava ele ainda com eles, quando lhe chegou o mensageiro; disse o rei: Eis que este mal vem do Senhor ; que mais, pois, esperaria eu do Senhor ?

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.