2 Reis 5

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.
1 Naamã, comandante do exército do rei da Síria, era muito respeitado e honrado pelo seu senhor, pois por meio dele o Senhor dera vitória à Síria. Mas esse grande guerreiro ficou leproso.
2 आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.
2 Ora, tropas da Síria haviam atacado Israel e levado cativa uma menina, que passou a servir à mulher de Naamã.
3 एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”
3 Um dia ela disse à sua senhora: "Se o meu senhor procurasse o profeta que está em Samaria, ele o curaria da lepra".
4 ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.
4 Naamã foi contar ao seu senhor o que a menina israelita dissera.
5 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.
5 O rei da Síria respondeu: "Vá. Eu lhe darei uma carta que você entregará ao rei de Israel". Então Naamã partiu, levando consigo trezentos e cinqüenta quilos de prata, setenta e dois quilos de ouro e dez mudas de roupas finas.
6 त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”
6 A carta que levou ao rei de Israel dizia: "Junto com esta carta estou te enviando meu oficial Naamã, para que o cures da lepra".
7 इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”
7 Assim que o rei de Israel leu a carta, rasgou as vestes e disse: "Por acaso sou Deus, capaz de conceder vida ou morte? Por que este homem me envia alguém para que eu o cure da lepra? Vejam como ele procura um motivo para se desentender comigo! "
8 इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”
8 Quando Eliseu, o homem de Deus, soube que o rei de Israel havia rasgado suas vestes, mandou-lhe esta mensagem: "Por que rasgaste tuas vestes? Envia o homem a mim, e ele saberá que há profeta em Israel".
9 तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला.
9 Então, Naamã foi com seus cavalos e carros e parou à porta da casa de Eliseu.
10 अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.”
10 Eliseu enviou um mensageiro para lhe dizer: "Vá e lave-se sete vezes no rio Jordão; sua pele será restaurada e você ficará purificado".
11 परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.
11 Mas Naamã ficou indignado e saiu dizendo: "Eu estava certo de que ele sairia para receber-me, invocaria de pé o nome do Senhor seu Deus, moveria a mão sobre o lugar afetado e me curaria da lepra.
12 दिमिष्कमधील अमानाह व परपर या नद्या इस्राएलातील जलांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यामध्ये स्नान करून मी स्वतःला शुद्ध करू शकतो की नाही?” मग तो मागे फिरला आणि क्रोधाने निघून केला.
12 Não são os rios Abana e Farfar, em Damasco, melhores do que todas as águas de Israel? Será que não poderia lavar-me neles e ser purificado? " Então, foi embora dali furioso.
13 नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”
13 Mas os seus servos lhe disseram: "Meu pai, se o profeta lhe tivesse pedido alguma coisa difícil, o senhor não faria? Quanto mais, quando ele apenas lhe diz para que se lave e seja purificado! "
14 मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.
14 Assim ele desceu ao Jordão e mergulhou sete vezes conforme a ordem do homem de Deus; ele foi purificado e sua pele tornou-se como a de uma criança.
15 नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”
15 Então Naamã e toda a sua comitiva voltaram à casa do homem de Deus. Ao chegar diante do profeta, Naamã lhe disse: "Agora sei que não há Deus em nenhum outro lugar, senão em Israel. Por favor, aceita um presente de teu servo".
16 तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
16 O profeta respondeu: "Juro pelo nome do Senhor, a quem sirvo, que nada aceitarei". Embora Naamã insistisse, ele recusou.
17 नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही.
17 E disse Naamã: "Já que não aceitas o presente, ao menos permite que eu leve duas mulas carregadas de terra, pois teu servo nunca mais fará holocaustos e sacrifícios a nenhum outro deus senão ao Senhor.
18 मात्र एक गोष्टींसाठी याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी: माझा धनी, म्हणजे राजा, रिम्मोन मंदिरात नमन करण्यास जातात, त्यावेळी त्यांना माझ्या हाताच्या आधाराची गरज पडते आणि त्याच्याबरोबर मलाही नमन करावे लागते—जेव्हा मी रिम्मोन मंदिरात नमन करतो, तेव्हा याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी.”
18 Mas que o Senhor me perdoe por uma única coisa: quando meu senhor vai adorar no templo de Rimom, eu também tenho que me ajoelhar ali pois ele se apóia em meu braço. Que o Senhor perdoe o teu servo por isso".
19 अलीशा म्हणाला, “शांतीने जा.”
19 Disse Eliseu: "Vá em paz". Quando Naamã já estava a certa distância,
20 इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”
20 Geazi, servo de Eliseu, o homem de Deus, pensou: "Meu senhor foi bom demais para Naamã, aquele arameu, não aceitando o que ele lhe ofereceu. Juro pelo nome do Senhor que correrei atrás dele para ver se ganho alguma coisa".
21 गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”
21 Então Geazi correu para alcançar Naamã, que, vendo-o se aproximar, desceu da carruagem para encontrá-lo e perguntou: "Está tudo bem? "
22 गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ”
22 Geazi respondeu: "Sim, tudo bem. Mas o meu senhor enviou-me para dizer que dois jovens, discípulos dos profetas, acabaram de chegar, vindos dos montes de Efraim. Por favor, dê-lhes trinta e cinco quilos de prata e duas mudas de roupas finas".
23 नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले.
23 "Claro", respondeu Naamã, "leve setenta quilos". Ele insistiu com Geazi para que aceitasse e colocou os setenta quilos de prata em duas sacolas, com as duas mudas de roupas, entregando tudo a dois de seus servos, os quais foram à frente de Geazi, levando as sacolas.
24 जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले.
24 Quando Geazi chegou à colina onde morava, pegou as sacolas dos servos e guardou-as em casa. Mandou os homens de volta, e eles partiram.
25 गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?”
25 Então entrou e apresentou-se ao seu senhor Eliseu. E este perguntou: "Onde você esteve, Geazi? " Geazi respondeu: "Teu servo não foi a lugar algum".
26 परंतु अलीशा त्याला म्हणाला, “तो मनुष्य तुला भेटण्यास आपल्या रथावरून उतरला, तेव्हा माझा आत्मा तुझ्याबरोबर नव्हता काय? पैसा किंवा पोशाख, जैतुनाची शेते आणि द्राक्षमळे किंवा मेंढरे आणि गुरे किंवा दास आणि दासी मागून घेण्याचा हा समय आहे काय?
26 Mas Eliseu lhe disse: "Você acha que eu não estava com você em espírito quando o homem desceu da carruagem para encontrar-se com você? Este não era o momento de aceitar prata nem roupas, nem de cobiçar olivais, vinhas, ovelhas, bois, servos e servas.
27 तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती.
27 Por isso a lepra de Naamã atingirá você e os seus descendentes para sempre". Então Geazi saiu da presença de Eliseu já leproso, parecido com neve.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.