2 Reis 4
marc (MARC) vs ACF
1 संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”
1 E uma mulher, das mulheres dos filhos dos profetas, clamou a Eliseu, dizendo: Meu marido, teu servo, morreu; e tu sabes que o teu servo temia ao SENHOR; e veio o credor, para levar os meus dois filhos para serem servos.
2 अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?”
2 E Eliseu lhe disse: Que te hei de fazer? Dize-me que é o que tens em casa. E ela disse: Tua serva não tem nada em casa, senão uma botija de azeite.
3 अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको.
3 Então disse ele: Vai, pede emprestadas, de todos os teus vizinhos, vasilhas vazias, não poucas.
4 आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”
4 Então entra, e fecha a porta sobre ti, e sobre teus filhos, e deita o azeite em todas aquelas vasilhas, e põe à parte a que estiver cheia.
5 तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली.
5 Partiu, pois, dele, e fechou a porta sobre si e sobre seus filhos; e eles lhe traziam as vasilhas, e ela as enchia.
6 जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.”
6 E sucedeu que, cheias que foram as vasilhas, disse a seu filho: Traze-me ainda uma vasilha. Porém ele lhe disse: Não há mais vasilha alguma. Então o azeite parou.
7 ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”
7 Então veio ela, e o fez saber ao homem de Deus; e disse ele: Vai, vende o azeite, e paga a tua dívida; e tu e teus filhos vivei do resto.
8 एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.
8 Sucedeu também um dia que, indo Eliseu a Suném, havia ali uma mulher importante, a qual o reteve para comer pão; e sucedeu que todas as vezes que passava por ali entrava para comer pão.
9 ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.
9 E ela disse a seu marido: Eis que tenho observado que este que sempre passa por nós é um santo homem de Deus.
10 तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”
10 Façamos-lhe, pois, um pequeno quarto junto ao muro, e ali lhe ponhamos uma cama, uma mesa, uma cadeira e um candeeiro; e há de ser que, vindo ele a nós, para ali se recolherá.
11 एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला.
11 E sucedeu que um dia ele chegou ali, e recolheu-se àquele quarto, e se deitou.
12 त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली.
12 Então disse ao seu servo Geazi: Chama esta sunamita. E chamando-a ele, ela se pôs diante dele.
13 अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ”
13 Porque ele tinha falado a Geazi: Dize-lhe: Eis que tu nos tens tratado com todo o desvelo; que se há de fazer por ti? Haverá alguma coisa de que se fale por ti ao rei, ou ao capitão do exército? E disse ela: Eu habito no meio do meu povo.
14 अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?”
14 Então disse ele: Que se há de fazer por ela? E Geazi disse: Ora ela não tem filho, e seu marido é velho.
15 मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली.
15 Por isso disse ele: Chama-a. E, chamando-a ele, ela se pôs à porta.
16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.”
16 E ele disse: A este tempo determinado, segundo o tempo da vida, abraçarás um filho. E disse ela: Não, meu senhor, homem de Deus, não mintas à tua serva.
17 पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.
17 E concebeu a mulher, e deu à luz um filho, no tempo determinado, no ano seguinte, segundo Eliseu lhe dissera.
18 पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्यांसोबत होता.
18 E, crescendo o filho, sucedeu que um dia saiu para ter com seu pai, que estava com os segadores,
19 तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!”
19 E disse a seu pai: Ai, a minha cabeça! Ai, a minha cabeça! Então disse a um moço: Leva-o à sua mãe.
20 सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.
20 E ele o tomou, e o levou à sua mãe; e esteve sobre os seus joelhos até ao meio-dia, e morreu.
21 ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.
21 E subiu ela, e o deitou sobre a cama do homem de Deus; e fechou a porta, e saiu.
22 तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”
22 E chamou a seu marido, e disse: Manda-me já um dos moços, e uma das jumentas, para que eu corra ao homem de Deus, e volte.
23 त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.”
23 E disse ele: Por que vais a ele hoje? Não é lua nova nem sábado. E ela disse: Tudo vai bem.
24 मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.”
24 Então albardou a jumenta, e disse ao seu servo: Guia e anda, e não te detenhas no caminhar, senão quando eu to disser.
25 ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली.
25 Partiu ela, pois, e foi ao homem de Deus, ao monte Carmelo; e sucedeu que, vendo-a o homem de Deus de longe, disse a Geazi, seu servo: Eis aí a sunamita.
26 धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ”
26 Agora, pois, corre-lhe ao encontro e dize-lhe: Vai bem contigo? Vai bem com teu marido? Vai bem com teu filho? E ela disse: Vai bem.
27 जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”
27 Chegando ela, pois, ao homem de Deus, ao monte, pegou nos seus pés; mas chegou Geazi para retirá-la; disse porém o homem de Deus: Deixa-a, porque a sua alma está triste de amargura, e o Senhor me encobriu, e não me manifestou.
28 ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ”
28 E disse ela: Pedi eu a meu senhor algum filho? Não disse eu: Não me enganes?
29 अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.”
29 E ele disse a Geazi: Cinge os teus lombos, toma o meu bordão na tua mão, e vai; se encontrares alguém não o saúdes, e se alguém te saudar, não lhe respondas; e põe o meu bordão sobre o rosto do menino.
30 परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला.
30 Porém disse a mãe do menino: Vive o Senhor, e vive a tua alma, que não te hei de deixar. Então ele se levantou, e a seguiu.
31 गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.”
31 E Geazi passou adiante deles, e pôs o bordão sobre o rosto do menino; porém não havia nele voz nem sentido; e voltou a encontrar-se com ele, e lhe trouxe aviso, dizendo: O menino não despertou.
32 अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले,
32 E, chegando Eliseu àquela casa, eis que o menino jazia morto sobre a sua cama.
33 तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली.
33 Então entrou ele, e fechou a porta sobre eles ambos, e orou ao Senhor.
34 मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली.
34 E subiu à cama e deitou-se sobre o menino, e, pondo a sua boca sobre a boca dele, e os seus olhos sobre os olhos dele, e as suas mãos sobre as mãos dele, se estendeu sobre ele; e a carne do menino aqueceu.
35 मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.
35 Depois desceu, e andou naquela casa de uma parte para a outra, e tornou a subir, e se estendeu sobre ele, então o menino espirrou sete vezes, e abriu os olhos.
36 मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!”
36 Então chamou a Geazi, e disse: Chama esta sunamita. E chamou-a, e veio a ele. E disse ele: Toma o teu filho.
37 ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.
37 E entrou ela, e se prostrou a seus pés, e se inclinou à terra; e tomou o seu filho e saiu.
38 अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
38 E, voltando Eliseu a Gilgal, havia fome naquela terra, e os filhos dos profetas estavam assentados na sua presença; e disse ao seu servo: Põe a panela grande ao lume, e faze um caldo de ervas para os filhos dos profetas.
39 त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती.
39 Então um deles saiu ao campo a apanhar ervas, e achou uma parra brava, e colheu dela enchendo a sua capa de colocíntidas; e veio, e as cortou na panela do caldo; porque não as conheciam.
40 शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही.
40 Assim deram de comer para os homens. E sucedeu que, comendo eles daquele caldo, clamaram e disseram: Homem de Deus, há morte na panela. Não puderam comer.
41 तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” त्याने ते भांड्यात टाकले आणि म्हणाला, “हे लोकांना खाण्यास वाढा.” आणि भांड्यात काहीही अपायकारक राहिले नाही.
41 Porém ele disse: Trazei farinha. E deitou-a na panela, e disse: Dai de comer ao povo. E já não havia mal nenhum na panela.
42 एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”
42 E um homem veio de Baal-Salisa, e trouxe ao homem de Deus pães das primícias, vinte pães de cevada, e espigas verdes na sua palha, e disse: Dá ao povo, para que coma.
43 त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?”
43 Porém seu servo disse: Como hei de pôr isto diante de cem homens? E disse ele: Dá ao povo, para que coma; porque assim diz o Senhor: Comerão, e sobejará.
44 मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले.
44 Então lhos pôs diante, e comeram e ainda sobrou, conforme a palavra do Senhor.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.