2 Reis 17
marc (MARC) vs ARC
1 यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले.
1 No ano duodécimo de Acaz, rei de Judá, começou a reinar Oseias, filho de Elá, e reinou sobre Israel, em Samaria, nove anos.
2 त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही.
2 E fez o que era mal aos olhos do Senhor ; contudo, não como os reis de Israel que foram antes dele.
3 अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला.
3 Contra ele subiu Salmaneser, rei da Assíria; e Oseias ficou sendo servo dele e dava-lhe presentes.
4 परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले.
4 Porém o rei da Assíria achou em Oseias conspiração, porque enviara mensageiros a Sô, rei do Egito, e não pagava presentes ao rei da Assíria cada ano, como dantes; então, o rei da Assíria o encerrou e aprisionou na casa do cárcere.
5 आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.
5 Porque o rei da Assíria subiu por toda a terra, e veio até Samaria, e a cercou três anos.
6 होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.
6 No ano nono de Oseias, o rei da Assíria tomou a Samaria, e transportou a Israel para a Assíria, e fê-los habitar em Hala e em Habor, junto ao rio Gozã, e nas cidades dos medos.
7 हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली
7 E sucedeu assim por os filhos de Israel pecarem contra o Senhor , seu Deus, que os fizera subir da terra do Egito, de debaixo da mão de Faraó, rei do Egito; e temeram a outros deuses.
8 आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले.
8 E andaram nos estatutos das nações que o Senhor lançara fora de diante dos filhos de Israel e nos costumes dos reis de Israel.
9 इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली.
9 E os filhos de Israel fizeram secretamente coisas que não eram retas, contra o Senhor , seu Deus; e edificaram altos em todas as suas cidades, desde a torre dos atalaias até à cidade forte.
10 त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले.
10 E levantaram estátuas e imagens do bosque, em todos os altos outeiros e debaixo de todas as árvores verdes.
11 ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली.
11 E queimaram ali incenso em todos os altos, como as nações que o Senhor transportara de diante deles; e fizeram coisas ruins, para provocarem à ira o Senhor .
12 याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.
12 E serviram os ídolos, dos quais o Senhor lhes dissera: Não fareis estas coisas.
13 याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”
13 E o Senhor protestou a Israel e a Judá, pelo ministério de todos os profetas e de todos os videntes, dizendo: Convertei-vos de vossos maus caminhos e guardai os meus mandamentos e os meus estatutos, conforme toda a Lei que ordenei a vossos pais e que eu vos enviei pelo ministério de meus servos, os profetas.
14 परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले,
14 Porém não deram ouvidos; antes, endureceram a sua cerviz, como a cerviz de seus pais, que não creram no Senhor , seu Deus.
15 त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.
15 E rejeitaram os estatutos e o concerto que fizera com seus pais, como também os testemunhos com que protestara contra eles; e andaram após a vaidade e ficaram vãos, como também após as nações que estavam em roda deles, das quais o Senhor lhes tinha dito que não fizessem como elas.
16 त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली.
16 E deixaram todos os mandamentos do Senhor , seu Deus, e fizeram imagens de fundição, dois bezerros; e fizeram um ídolo do bosque, e se prostraram perante todo o exército do céu, e serviram a Baal.
17 त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला.
17 Também fizeram passar pelo fogo a seus filhos e suas filhas, e deram-se a adivinhações, e criam em agouros; e venderam-se para fazer o que era mal aos olhos do Senhor , para o provocarem à ira.
18 म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले,
18 Pelo que o Senhor muito se indignou contra Israel e os tirou de diante da sua face; nada mais ficou, senão a tribo de Judá.
19 परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले.
19 Até Judá não guardou os mandamentos do Senhor , seu Deus; antes, andaram nos estatutos que Israel fizera.
20 यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले.
20 Pelo que o Senhor rejeitou a toda semente de Israel, e os oprimiu, e os deu nas mãos dos despojadores, até que os tirou de diante da sua presença.
21 जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराेबाेअमास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले.
21 Porque, depois que o Senhor rasgou a Israel da casa de Davi, e eles fizeram rei a Jeroboão, filho de Nebate, Jeroboão apartou a Israel de seguir o Senhor e os fez pecar um grande pecado.
22 इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही,
22 Assim, andaram os filhos de Israel em todos os pecados que Jeroboão tinha feito; nunca se apartaram deles.
23 जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.
23 Até que o Senhor tirou a Israel de diante da sua presença, como falara pelo ministério de todos os seus servos, os profetas; assim, foi Israel transportado da sua terra à Assíria, onde permanece até ao dia de hoje.
24 मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.
24 E o rei da Assíria trouxe gente de Babel, e de Cuta, e de Ava, e de Hamate, e de Sefarvaim e a fez habitar nas cidades de Samaria, em lugar dos filhos de Israel; e tomaram a Samaria em herança e habitaram nas suas cidades.
25 जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले.
25 E sucedeu que, no princípio da sua habitação ali, não temeram ao Senhor ; e mandou o Senhor entre eles leões, que mataram a alguns deles.
26 अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”
26 Pelo que falaram ao rei da Assíria, dizendo: A gente que transportaste e fizeste habitar nas cidades de Samaria não sabe o costume do Deus da terra; pelo que ele mandou leões entre ela, e eis que a matam, porquanto não sabe o culto do Deus da terra.
27 तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.”
27 Então, o rei da Assíria mandou dizer: Levai ali um dos sacerdotes que transportastes de lá; que ele vá, e habite lá, e lhes ensine o costume do Deus da terra.
28 म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
28 Veio, pois, um dos sacerdotes que transportaram de Samaria, e habitou em Betel, e lhes ensinou como deviam temer ao Senhor .
29 तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले.
29 Porém cada nação fez os seus deuses, e os puseram nas casas dos altos que os samaritanos fizeram, cada nação nas suas cidades, nas quais habitavam.
30 बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली;
30 E os de Babel fizeram Sucote-Benote; e os de Cuta fizeram Nergal; e os de Hamate fizeram Asima;
31 अव्वी लोकांनी निभज व तर्ताक केले आणि सफरवी लोकांनी तर अद्राम्मेलेक व अनम्मेलेक या आपल्या दैवतांच्या वेद्यांवर आपल्या मुलामुलींचे अग्नीत बळी दिले.
31 E os aveus fizeram Nibaz e Tartaque; e os sefarvitas queimavam seus filhos no fogo a Adrameleque e a Anameleque, deuses de Sefarvaim.
32 त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले.
32 Assim temiam ao Senhor e dos mais humildes se fizeram sacerdotes dos lugares altos, os quais exerciam o ministério nas casas dos lugares altos.
33 ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत.
33 Assim, ao Senhor temiam e também a seus deuses serviam, segundo o costume das nações dentre as quais tinham sido transportados.
34 ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत.
34 Até ao dia de hoje fazem segundo os primeiros costumes; não temem ao Senhor , nem fazem segundo os seus estatutos, e segundo as suas ordenanças e segundo a lei, e segundo o mandamento que o Senhor ordenou aos filhos de Jacó, a quem deu o nome de Israel.
35 जेव्हा याहवेहने इस्राएली लोकांसोबत करार केला, तेव्हा त्यांनी त्यांना आज्ञा केली: “इतर दैवतांची उपासना करू नका किंवा त्यांना नमन करू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांना यज्ञार्पणे करू नका.
35 Contudo, o Senhor tinha feito um concerto com eles e lhes ordenara, dizendo: Não temereis a outros deuses, nem vos inclinareis diante deles, nem os servireis, nem lhes sacrificareis.
36 परंतु ज्या याहवेहने आपल्या अलौकिक सामर्थ्याने आणि वाढविलेल्या भुजांनी इजिप्तमधून त्यांना बाहेर आणले होते केवळ त्याच याहवेहची तुम्ही उपासना करावी. त्यांनाच तुम्ही नमन करावे आणि त्यांनाच यज्ञार्पणे अर्पण करावी.
36 Mas ao Senhor , que vos fez subir da terra do Egito com grande força e com braço estendido, a este temereis, e a ele vos inclinareis, e a ele sacrificareis.
37 त्यांनी लिहून दिलेल्या विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा यांचे तुम्ही खात्रीने नेहमी काळजीपूर्वक पालन करावे. इतर दैवतांची उपासना करू नका.
37 E os estatutos, e as ordenanças, e a lei, e o mandamento que vos escreveu, tereis cuidado de os observar todos os dias; e não temereis a outros deuses.
38 मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका.
38 E do concerto que fiz convosco vos não esquecereis; e não temereis a outros deuses.
39 तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.”
39 Mas ao Senhor , vosso Deus, temereis, e ele vos livrará das mãos de todos os vossos inimigos.
40 त्यांनी याहवेहचे ऐकले नाही, परंतु त्यांच्या आधीच्या रीतींना ते चिकटून राहिले.
40 Porém eles não ouviram; antes, fizeram segundo o seu primeiro costume.
41 हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत.
41 Assim, estas nações temiam ao Senhor e serviam as suas imagens de escultura; como fizeram seus pais, assim fazem também seus filhos e os filhos de seus filhos, até ao dia de hoje.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.