2 Reis 15

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला.
1 No vigésimo sétimo ano de Jeroboão, rei de Israel, começou a reinar Azarias, filho de Amazias, rei de Judá.
2 तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
2 Tinha dezesseis anos quando começou a reinar e cinquenta e dois anos reinou em Jerusalém. Era o nome de sua mãe Jecolias, de Jerusalém.
3 त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
3 Ele fez o que era reto perante o Senhor , segundo tudo o que fizera Amazias, seu pai.
4 तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
4 Tão somente os altos não se tiraram; o povo ainda sacrificava e queimava incenso nos altos.
5 याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे.
5 O Senhor feriu ao rei, e este ficou leproso até ao dia da sua morte e habitava numa casa separada. Jotão, filho do rei, tinha o cargo da casa e governava o povo da terra.
6 अजर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
6 Ora, os mais atos de Azarias e tudo o que fez, porventura, não estão escritos no Livro da História dos Reis de Judá?
7 अजर्‍याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
7 Descansou Azarias com seus pais, e o sepultaram junto a seus pais, na Cidade de Davi; e Jotão, seu filho, reinou em seu lugar.
8 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.
8 No trigésimo oitavo ano de Azarias, rei de Judá, reinou Zacarias, filho de Jeroboão, sobre Israel, em Samaria, seis meses.
9 आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
9 Fez o que era mau perante o Senhor , como tinham feito seus pais; não se apartou dos pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel.
10 याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
10 Salum, filho de Jabes, conspirou contra ele, feriu-o diante do povo, matou-o e reinou em seu lugar.
11 जखर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?
11 Quanto aos mais atos de Zacarias, eis que estão escritos no Livro da História dos Reis de Israel.
12 याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”
12 Esta foi a palavra que o Senhor falou a Jeú: Teus filhos, até à quarta geração, se assentarão no trono de Israel. E assim sucedeu.
13 यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
13 Salum, filho de Jabes, começou a reinar no trigésimo nono ano de Uzias, rei de Judá; e reinou durante um mês em Samaria.
14 नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
14 Subindo de Tirza, Menaém, filho de Gadi, veio a Samaria, feriu ali a Salum, filho de Jabes, matou-o e reinou em seu lugar.
15 शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय?
15 Quanto aos mais atos de Salum e a conspiração que fez, eis que estão escritos no Livro da História dos Reis de Israel.
16 त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
16 Então, Menaém feriu a Tifsa e todos os que nela havia, como também seus limites desde Tirza. Porque não lha abriram, a devastou e todas as mulheres grávidas fez rasgar pelo ventre.
17 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी गादीचा पुत्र मनाहेम हा इस्राएलाचा राजा झाला, त्याने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.
17 Desde o trigésimo nono ano de Azarias, rei de Judá, Menaém, filho de Gadi, começou a reinar sobre Israel e reinou dez anos em Samaria.
18 याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
18 Fez o que era mau perante o Senhor ; todos os seus dias, não se apartou dos pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel.
19 तेव्हा अश्शूरचा राजा पूल ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत दिले.
19 Então, veio Pul, rei da Assíria, contra a terra; Menaém deu a Pul mil talentos de prata, para que este o ajudasse a consolidar o seu reino.
20 मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.
20 Menaém arrecadou este dinheiro de Israel para pagar ao rei da Assíria, de todos os poderosos e ricos, cinquenta siclos de prata por cabeça; assim, voltou o rei da Assíria e não se demorou ali na terra.
21 मनाहेमाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले हे इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात नमूद करून ठेवलेले नाही काय?
21 Quanto aos mais atos de Menaém e a tudo quanto fez, porventura, não estão escritos no Livro da História dos Reis de Israel?
22 मनाहेम आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र पेकाहियाह हा राज्य करू लागला.
22 Descansou Menaém com seus pais; e Pecaías, seu filho, reinou em seu lugar.
23 यहूदीयाचा राजा अजर्‍याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले.
23 No quinquagésimo ano de Azarias, rei de Judá, começou a reinar Pecaías, filho de Menaém; e reinou sobre Israel, em Samaria, dois anos.
24 पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
24 Fez o que era mau perante o Senhor ; não se apartou dos pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel.
25 त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.
25 Peca, seu capitão, filho de Remalias, conspirou contra ele e o feriu em Samaria, na fortaleza da casa do rei, juntamente com Argobe e com Arié; com Peca estavam cinquenta homens dos gileaditas; Peca o matou e reinou em seu lugar.
26 पेकाहियाह राजाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात लिहून ठेवलेले नाही काय?
26 Quanto aos mais atos de Pecaías e a tudo quanto fez, eis que estão escritos no Livro da História dos Reis de Israel.
27 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले.
27 No quinquagésimo segundo ano de Azarias, rei de Judá, começou a reinar Peca, filho de Remalias, e reinou sobre Israel, em Samaria, vinte anos.
28 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
28 Fez o que era mau perante o Senhor ; não se apartou dos pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel.
29 इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.
29 Nos dias de Peca, rei de Israel, veio Tiglate-Pileser, rei da Assíria, e tomou a Ijom, a Abel-Bete-Maaca, a Janoa, a Quedes, a Hazor, a Gileade e à Galileia, a toda a terra de Naftali, e levou os seus habitantes para a Assíria.
30 नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली.
30 Oseias, filho de Elá, conspirou contra Peca, filho de Remalias, e o feriu, e o matou, e reinou em seu lugar, no vigésimo ano de Jotão, filho de Uzias.
31 पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?
31 Quanto aos mais atos de Peca e a tudo quanto fez, eis que estão escritos no Livro da História dos Reis de Israel.
32 इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह याच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा उज्जीयाह याचा पुत्र योथाम राज्य करू लागला.
32 No ano segundo de Peca, filho de Remalias, rei de Israel, começou a reinar Jotão, filho de Uzias, rei de Judá.
33 तो पंचवीस वर्षांचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
33 Tinha vinte e cinco anos de idade quando começou a reinar e reinou dezesseis anos em Jerusalém. Era o nome de sua mãe Jerusa, filha de Zadoque.
34 आपल्या पिता उज्जीयाह प्रमाणे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले,
34 Fez o que era reto perante o Senhor ; e em tudo procedeu segundo fizera Uzias, seu pai.
35 तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.
35 Tão somente os altos não se tiraram; o povo ainda sacrificava e queimava incenso nos altos. Ele edificou a Porta de Cima da Casa do Senhor .
36 योथामाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
36 Quanto aos mais atos de Jotão e a tudo quanto fez, porventura, não estão escritos no Livro da História dos Reis de Judá?
37 (त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)
37 Naqueles dias, começou o Senhor a enviar contra Judá a Rezim, rei da Síria, e a Peca, filho de Remalias.
38 योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला.
38 Descansou Jotão com seus pais e foi sepultado junto a seus pais, na Cidade de Davi, seu pai. Em seu lugar reinou Acaz, seu filho.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.