2 Reis 13
marc (MARC) vs NVI
1 यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले.
1 No vigésimo terceiro ano do reinado de Joás, filho de Acazias, rei de Judá, Jeoacaz, filho de Jeú, tornou-se rei de Israel em Samaria, e reinou dezessete anos.
2 पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही.
2 E fez o que o Senhor reprova, seguindo os pecados que Jeroboão, filho de Nebate, levara Israel a cometer; e não se afastou deles.
3 त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.
3 Por isso a ira do Senhor se acendeu contra Israel, e por longo tempo ele os manteve sob o poder de Hazael, rei da Síria, e de seu filho Ben-Hadade.
4 तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.
4 Então Jeoacaz buscou o favor do Senhor, e este o ouviu, pois viu o quanto o rei da Síria oprimia Israel.
5 याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले.
5 O Senhor providenciou um libertador para Israel, e eles escaparam do poder da Síria. Assim os israelitas moraram em suas casas como anteriormente.
6 परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याने इस्राएली लोकांना जी पातके करण्यास लावली होती, त्या पातकांपासून मागे फिरले नाहीत. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.
6 Mas continuaram a praticar os pecados que a dinastia de Jeroboão havia levado Israel a cometer, permanecendo neles. Inclusive a coluna sagrada permanecia de pé em Samaria.
7 यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.
7 Nada havia sobrado do exército de Jeoacaz, com exceção de cinqüenta cavaleiros, dez carros de guerra e dez mil soldados de infantaria, pois o rei da Síria havia destruído o restante, reduzindo-o a pó.
8 यहोआहाजाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने जे सर्व केले आणि त्याचे पराक्रम इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेले नाहीत काय?
8 Os demais acontecimentos do reinado de Jeoacaz, os seus feitos e tudo o que realizou, estão escritos nos registros históricos dos reis de Israel.
9 यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.
9 Jeoacaz descansou com seus antepassados e foi sepultado em Samaria. Seu filho Jeoás foi o seu sucessor.
10 यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले.
10 No trigésimo sétimo ano do reinado de Joás, rei de Judá, Jeoás, filho de Jeoacaz, tornou-se rei de Israel em Samaria, e reinou dezesseis anos.
11 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.
11 Ele fez o que o Senhor reprova e não se desviou de nenhum dos pecados que Jeroboão, filho de Nebate, levara Israel a cometer; antes permaneceu neles.
12 योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याहबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय?
12 Os demais acontecimentos do reinado de Jeoás, os seus feitos e as suas realizações, inclusive sua guerra contra Amazias, rei de Judá, estão escritos no livro dos registros históricos dos reis de Israel.
13 योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.
13 Jeoás descansou com seus antepassados, e Jeroboão o sucedeu no trono. Jeoás foi sepultado com os reis de Israel, em Samaria.
14 आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!”
14 Ora, Eliseu estava sofrendo da doença da qual morreria. Então Jeoás, rei de Israel, foi visitá-lo e, curvado sobre ele, chorou gritando: "Meu pai! Meu pai! Tu és como os carros e os cavaleiros de Israel! "
15 अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले.
15 E Eliseu lhe disse: "Traga um arco e algumas flechas"; e ele assim fez.
16 “आपल्या हातात धनुष्य घे,” तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला. जेव्हा त्याने ते आपल्या हातात घेतले, तेव्हा अलीशाने आपला हात राजाच्या हातावर ठेवला.
16 "Pegue o arco em suas mãos", disse ao rei de Israel. Quando pegou, Eliseu pôs suas mãos sobre as mãos do rei
17 “पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”
17 e lhe disse para abrir a janela que dava para o leste e atirar. O rei o fez, então Eliseu declarou: "Esta é a flecha da vitória do Senhor, a flecha da vitória sobre a Síria! Você destruirá totalmente os arameus, em Afeque".
18 नंतर त्याने म्हटले, “बाण घे,” आणि राजाने बाण घेतले. अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला, “ते बाण जमिनीवर मार.” त्याने ते बाण तीन वेळा जमिनीवर मारले आणि थांबला.
18 Em seguida Eliseu mandou o rei pegar as flechas e golpear o chão. Ele golpeou o chão três vezes e parou.
19 परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.”
19 O homem de Deus ficou irado com ele e disse: "Você deveria ter golpeado o chão cinco ou seis vezes; então iria derrotar a Síria e a destruiria completamente. Mas agora você a derrotará somente três vezes".
20 अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली.
20 Então Eliseu morreu e foi sepultado. Ora, tropas moabitas costumavam entrar no país em todas as primaveras.
21 एके दिवशी काही इस्राएली लोक एका व्यक्तीला मूठमाती देत असताना त्यांनी लुटारूंची टोळी पाहिली; म्हणून त्यांनी त्या मनुष्याचा मृतदेह अलीशाच्या कबरेत लोटून दिला. त्या मृत शरीराला अलीशाच्या अस्थींचा स्पर्श होताच, तो मृत मनुष्य जिवंत झाला आणि आपल्या पायांवर उभा राहिला.
21 Certa vez, enquanto alguns israelitas sepultavam um homem, viram de repente uma dessas tropas; então jogaram o corpo do homem no túmulo de Eliseu e fugiram. Assim que o cadáver encostou nos ossos de Eliseu, o homem voltou à vida e se levantou.
22 यहोआहाज राजाच्या संपूर्ण कारकिर्दीत अरामचा राजा हजाएल इस्राएली लोकांचा छळ करीत राहिला.
22 Hazael, rei da Síria, oprimiu Israel durante todo o reinado de Jeoacaz.
23 परंतु याहवेहची कृपा इस्राएली लोकांवर होती आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे त्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांची काळजी घेतली. आजपर्यंत त्यांचा नाश करण्याची किंवा त्यांना त्यांच्या उपस्थितीतून घालवून देण्याची त्यांची इच्छा नव्हती.
23 Mas o Senhor foi bondoso para com eles, teve compaixão e mostrou preocupação por eles, por causa da sua aliança com Abraão, Isaque e Jacó. Até hoje ele não se dispôs a destruí-los ou eliminá-los de sua presença.
24 अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला.
24 E Hazael, rei da Síria, morreu, e seu filho Ben-Hadade foi o seu sucessor.
25 मग यहोआहाजचा पुत्र यहोआशने हजाएलचा पुत्र बेन-हदादच्या हातून त्याचा पिता यहोआहाजशी केलेल्या युद्धात घेतलेली नगरे परत हस्तगत केली. योआशाने त्याचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलाची नगरे परत घेतली.
25 Então Jeoás, filho de Jeoacaz, conquistou de Ben-Hadade, filho de Hazael, as cidades que, em combate, Hazael havia tomado de seu pai Jeoacaz. Três vezes Jeoás o derrotou e, assim, reconquistou essas cidades israelitas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.