2 Reis 10
marc (MARC) vs ARA
1 शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते,
1 Achando-se em Samaria setenta filhos de Acabe, Jeú escreveu cartas e as enviou a Samaria, aos chefes da cidade, aos anciãos e aos tutores dos filhos de Acabe, dizendo:
2 “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच,
2 Logo, em chegando a vós outros esta carta (pois estão convosco os filhos de vosso senhor, como também os carros, os cavalos, a cidade fortalecida e as armas),
3 आपल्या धन्याच्या पुत्रांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य निवडा आणि त्याला त्याच्या पित्याच्या सिंहासनावर बसवा. मग तुमच्या धन्याच्या घरासाठी लढा.”
3 escolhei o melhor e mais capaz dos filhos de vosso senhor, ponde-o sobre o trono de seu pai e pelejai pela casa de vosso senhor.
4 परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?”
4 Porém eles temeram muitíssimo e disseram: Dois reis não puderam resistir a ele; como, pois, poderemos nós fazê-lo?
5 मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”
5 Então, o responsável pelo palácio, e o responsável pela cidade, e os anciãos, e os tutores mandaram dizer a Jeú: Teus servos somos e tudo quanto nos ordenares faremos; a ninguém constituiremos rei; faze o que bem te parecer.
6 मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.”
6 Então, lhes escreveu outra carta, dizendo: Se estiverdes do meu lado e quiserdes obedecer-me, tomai as cabeças dos homens, filhos de vosso senhor, e amanhã a estas horas vinde a mim a Jezreel. Ora, os filhos do rei, que eram setenta, estavam com os grandes da cidade, que os criavam.
7 जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली.
7 Chegada a eles a carta, tomaram os filhos do rei, e os mataram, setenta pessoas, e puseram as suas cabeças nuns cestos, e lhas mandaram a Jezreel.
8 जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.”
8 Veio um mensageiro e lhe disse: Trouxeram as cabeças dos filhos do rei. Ele disse: Ponde-as em dois montões à entrada da porta, até pela manhã.
9 दुसर्या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले?
9 Saindo ele pela manhã, parou e disse a todo o povo: Vós estais sem culpa; eis que eu conspirei contra o meu senhor e o matei; mas quem feriu todos estes?
10 तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.”
10 Sabei, pois, agora, que, da palavra do Senhor , pronunciada contra a casa de Acabe, nada cairá em terra, porque o Senhor fez o que falou por intermédio do seu servo Elias.
11 असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.
11 Jeú feriu também todos os restantes da casa de Acabe em Jezreel, como também todos os seus grandes, os seus conhecidos e os seus sacerdotes, até que nem um sequer lhe deixou ficar de resto.
12 यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला,
12 Então, se dispôs, partiu e foi a Samaria. E, estando no caminho, em Bete-Equede dos Pastores,
13 त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?”
13 encontrou Jeú parentes de Acazias, rei de Judá, e perguntou: Quem sois vós? Eles responderam: Parentes de Acazias; voltamos de saudar os filhos do rei e os da rainha-mãe.
14 तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही.
14 Então, disse Jeú: Apanhai-os vivos. Eles os apanharam vivos e os mataram junto ao poço de Bete-Equede, quarenta e dois homens; e a nenhum deles deixou de resto.
15 तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?”
15 Tendo partido dali, encontrou a Jonadabe, filho de Recabe, que lhe vinha ao encontro; Jeú saudou-o e lhe perguntou: Tens tu sincero o coração para comigo, como o meu o é para contigo? Respondeu Jonadabe: Tenho. Então, se tens, dá-me a mão. Jonadabe deu-lhe a mão; e Jeú fê-lo subir consigo ao carro
16 येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला.
16 e lhe disse: Vem comigo e verás o meu zelo para com o Senhor . E, assim, Jeú o levou no seu carro.
17 जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.
17 Tendo Jeú chegado a Samaria, feriu todos os que ali ficaram de Acabe, até destruí-los, segundo a palavra que o Senhor dissera a Elias.
18 नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल.
18 Ajuntou Jeú a todo o povo e lhe disse: Acabe serviu pouco a Baal; Jeú, porém, muito o servirá.
19 म्हणून बआल दैवताच्या सर्व संदेष्ट्यांना आणि सर्व सेवकांना आणि सर्व याजकांना एकत्र बोलवा. कोणीही अनुपस्थित राहू नये याची खबरदारी घ्या, कारण मी बआलसाठी मोठा यज्ञ करणार आहे. जो कोणी येणार नाही त्याला ठार मारण्यात येईल.” परंतु बआलच्या सर्व भक्तांचा संहार करण्याच्या हेतूनेच येहूने ही योजना आखली होती.
19 Pelo que chamai-me, agora, todos os profetas de Baal, todos os seus servidores e todos os seus sacerdotes; não falte nenhum, porque tenho grande sacrifício a oferecer a Baal; todo aquele que faltar não viverá. Porém Jeú fazia isto com astúcia, para destruir os servidores de Baal.
20 येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली.
20 Disse mais Jeú: Consagrai uma assembleia solene a Baal; e a proclamaram.
21 नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले.
21 Também Jeú enviou mensageiros por todo o Israel; vieram todos os adoradores de Baal, e nenhum homem deles ficou que não viesse. Entraram na casa de Baal, que se encheu de uma extremidade à outra.
22 आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले.
22 Então, disse Jeú ao vestiário: Tira as vestimentas para todos os adoradores de Baal. E o fez.
23 यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.”
23 Entrou Jeú com Jonadabe, filho de Recabe, na casa de Baal e disse aos adoradores de Baal: Examinai e vede bem não esteja aqui entre vós algum dos servos do Senhor , mas somente os adoradores de Baal.
24 म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”
24 E, entrando eles a oferecerem sacrifícios e holocaustos, Jeú preparou da parte de fora oitenta homens e disse-lhes: Se escapar algum dos homens que eu entregar em vossas mãos, a vida daquele que o deixar escapar responderá pela vida dele.
25 येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्यात गेले.
25 Sucedeu que, acabado o oferecimento do holocausto, ordenou Jeú aos da sua guarda e aos capitães: Entrai, feri-os, que nenhum escape. Feriram-nos a fio de espada; e os da guarda e os capitães os lançaram fora, e penetraram no mais interior da casa de Baal,
26 बआलच्या मंदिरातून पवित्र स्तंभ बाहेर काढला आणि तो जाळून टाकला.
26 e tiraram as colunas que estavam na casa de Baal, e as queimaram.
27 त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात.
27 Também quebraram a própria coluna de Baal, e derribaram a casa de Baal, e a transformaram em latrinas até ao dia de hoje.
28 याप्रमाणे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना नष्ट केली.
28 Assim, Jeú exterminou de Israel a Baal.
29 तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली.
29 Porém não se apartou Jeú de seguir os pecados de Jeroboão, filho de Nebate, que fez pecar a Israel, a saber, dos bezerros de ouro que estavam em Betel e em Dã.
30 याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”
30 Pelo que disse o Senhor a Jeú: Porquanto bem executaste o que é reto perante mim e fizeste à casa de Acabe segundo tudo quanto era do meu propósito, teus filhos até à quarta geração se assentarão no trono de Israel.
31 परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
31 Mas Jeú não teve cuidado de andar de todo o seu coração na lei do Senhor , Deus de Israel, nem se apartou dos pecados que Jeroboão fez pecar a Israel.
32 त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला.
32 Naqueles dias, começou o Senhor a diminuir os limites de Israel, que foi ferido por Hazael em todas as suas fronteiras,
33 यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले.
33 desde o Jordão para o nascente do sol, toda a terra de Gileade, os gaditas, os rubenitas e os manassitas, desde Aroer, que está junto ao vale de Arnom, a saber, Gileade e Basã.
34 येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय?
34 Ora, os mais atos de Jeú, e tudo quanto fez, e todo o seu poder, porventura, não estão escritos no Livro da História dos Reis de Israel?
35 येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला.
35 Descansou Jeú com seus pais, e o sepultaram em Samaria; e Jeoacaz, seu filho, reinou em seu lugar.
36 येहूने इस्राएलाचा राजा म्हणून शोमरोनात अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
36 Os dias que Jeú reinou sobre Israel em Samaria foram vinte e oito anos.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.