2 Crônicas 7
marc (MARC) vs ARA
1 शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले.
1 Tendo Salomão acabado de orar, desceu fogo do céu e consumiu o holocausto e os sacrifícios; e a glória do Senhor encheu a casa.
2 याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते.
2 Os sacerdotes não podiam entrar na Casa do Senhor , porque a glória do Senhor tinha enchido a Casa do Senhor .
3 जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला,
3 Todos os filhos de Israel, vendo descer o fogo e a glória do Senhor sobre a casa, se encurvaram com o rosto em terra sobre o pavimento, e adoraram, e louvaram o Senhor , porque é bom, porque a sua misericórdia dura para sempre.
4 नंतर राजा आणि सर्व लोकांनी याहवेहसमोर होमार्पणे केली.
4 Então, o rei e todo o povo ofereceram sacrifícios diante do Senhor .
5 शलोमोन राजाने बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे अर्पण केली. याप्रकारे राजाने व सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.
5 Ofereceu o rei Salomão em sacrifício vinte e dois mil bois e cento e vinte mil ovelhas.
6 याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.
6 Assim, o rei e todo o povo consagraram a Casa de Deus. Os sacerdotes estavam nos seus devidos lugares, como também os levitas com os instrumentos músicos do Senhor , que o rei Davi tinha feito para deles se utilizar nas ações de graças ao Senhor , porque a sua misericórdia dura para sempre. Os sacerdotes que tocavam as trombetas estavam defronte deles, e todo o Israel se mantinha em pé.
7 शलोमोनाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधील भाग पवित्र केला, आणि तिथे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणाचे मांदे ही अर्पण केली, कारण जी कास्याची वेदी त्याने बनविली होती त्यात होमार्पणे, धान्यार्पणे व मांदे मावत नव्हते.
7 Salomão consagrou também o meio do átrio que estava diante da Casa do Senhor , porquanto ali prepararam os holocaustos e a gordura dos sacrifícios pacíficos; porque, no altar de bronze, que Salomão fizera, não podiam caber os holocaustos, as ofertas de manjares e a gordura dos sacrifícios pacíficos.
8 तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते.
8 Assim, celebrou Salomão a festa por sete dias, e todo o Israel, com ele, uma grande congregação, desde a entrada de Hamate até ao rio do Egito.
9 आठव्या दिवशी त्यांनी सभा भरविली, कारण त्यांनी सात दिवस वेदीवर समर्पण आणि आणखी सात दिवस उत्सव साजरा केला होता.
9 Ao oitavo dia, começaram a celebrar a Festa dos Tabernáculos, porque, por sete dias, já haviam celebrado a consagração do altar; a festa durava sete dias.
10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी त्याने लोकांना त्यांच्या घरी रवाना केले, याहवेहने दावीद आणि शलोमोन आणि त्यांच्या इस्राएली लोकांसाठी जी चांगली कृत्ये केली, त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.
10 No vigésimo terceiro dia do sétimo mês, o rei despediu o povo para as suas tendas; e todos se foram alegres e de coração contente por causa do bem que o Senhor fizera a Davi, a Salomão e a Israel, seu povo.
11 शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला.
11 Assim, Salomão acabou a Casa do Senhor e a casa do rei; tudo quanto Salomão intentou fazer na Casa do Senhor e na sua casa, prosperamente o efetuou.
12 रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले:
12 De noite, apareceu o Senhor a Salomão e lhe disse: Ouvi a tua oração e escolhi para mim este lugar para casa do sacrifício.
13 “जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन,
13 Se eu cerrar os céus de modo que não haja chuva, ou se ordenar aos gafanhotos que consumam a terra, ou se enviar a peste entre o meu povo;
14 जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.
14 se o meu povo, que se chama pelo meu nome, se humilhar, e orar, e me buscar, e se converter dos seus maus caminhos, então, eu ouvirei dos céus, perdoarei os seus pecados e sararei a sua terra.
15 आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.
15 Estarão abertos os meus olhos e atentos os meus ouvidos à oração que se fizer neste lugar.
16 मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
16 Porque escolhi e santifiquei esta casa, para que nela esteja o meu nome perpetuamente; nela, estarão fixos os meus olhos e o meu coração todos os dias.
17 “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,
17 Quanto a ti, se andares diante de mim, como andou Davi, teu pai, e fizeres segundo tudo o que te ordenei, e guardares os meus estatutos e os meus juízos,
18 तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
18 também confirmarei o trono do teu reino, segundo a aliança que fiz com Davi, teu pai, dizendo: Não te faltará sucessor que domine em Israel.
19 “परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,
19 Porém, se vós vos desviardes, e deixardes os meus estatutos e os meus mandamentos, que vos prescrevi, e fordes, e servirdes a outros deuses, e os adorardes,
20 तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.
20 então, vos arrancarei da minha terra que vos dei, e esta casa, que santifiquei ao meu nome, lançarei longe da minha presença, e a tornarei em provérbio e motejo entre todos os povos.
21 हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’
21 Desta casa, agora tão exaltada, todo aquele que por ela passar pasmará e dirá: Por que procedeu o Senhor assim para com esta terra e esta casa?
22 तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
22 Responder-se-lhe-á: Porque deixaram o Senhor , o Deus de seus pais, que os tirou da terra do Egito, e se apegaram a outros deuses, e os adoraram, e os serviram. Por isso, trouxe sobre eles todo este mal.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.