2 Crônicas 6
marc (MARC) vs VC
1 तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील;
1 Então disse Salomão: O Senhor deseja habitar na escuridão.
2 मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”
2 Construí, portanto, uma casa que será vossa morada eterna.
3 इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला.
3 Voltou-se, em seguida, para a assembléia, que estava de pé e a abençoou.
4 मग राजा म्हणाला:
4 Bendito seja, disse ele, o Senhor, Deus de Israel, que, pela sua própria boca falou a Davi, meu pai, e que, pela sua mão, realizou suas promessas. Ele tinha dito:
5 ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही.
5 Desde o dia em que fiz sair meu povo do Egito, não escolhi uma cidade dentre todas as tribos de Israel para nela construir um templo onde meu nome fosse invocado, e não escolhi um homem para que fosse chefe de meu povo de Israel;
6 परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’
6 mas escolhi Jerusalém como lugar de residência para meu nome e Davi como rei de meu povo de Israel.
7 “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.
7 Ora, meu pai Davi desejava edificar um templo para a glória do Senhor, Deus de Israel,
8 पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.
8 mas o Senhor lhe disse: Tiveste uma feliz inspiração de edificar um templo para a glória de meu nome.
9 तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’
9 Somente, não és tu que me hás de construir, será teu filho, o filho procedente de tuas entranhas, que o fará.
10 “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.
10 O Senhor realizou sua predição. Sucedi a meu pai Davi e ocupo o trono de Israel, como disse o Senhor, e construí este templo ao nome do Senhor, Deus de Israel.
11 तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.”
11 Pus a arca onde se encontra colocada a aliança feita entre o Senhor e os israelitas.
12 नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले
12 Em seguida, Salomão postou-se diante do altar do Senhor, em presença de toda a assembléia de Israel e estendeu as mãos.
13 शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले.
13 Com efeito, ele mandara construir uma tribuna de bronze, erguida no meio do átrio, de cinco côvados de comprimento, cinco de largura e três de altura. Nela subiu e, de joelhos, voltado para a multidão dos israelitas, com os braços levantados para o céu, disse:
14 तो म्हणाला:
14 Senhor, Deus de Israel, não há nem nos céus nem na terra um deus que seja comparável a vós, que seja fiel à sua aliança com seus servos, e cheio de misericórdia para com os que vos servem de todo o coração.
15 आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.
15 Cumpristes a promessa que fizestes a meu pai Davi, vosso servo. Neste dia, vossa mão realizou o que vossa boca havia anunciado.
16 “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’
16 Dignai-vos, portanto, agora, Senhor, Deus de Israel, cumprir também a promessa que fizestes a meu pai Davi, vosso servo, de que jamais lhe faltaria diante de vós um descendente que ocupasse o trono de Israel, contanto que seus filhos atendam ao seu procedimento e observem vossa lei como ele mesmo a observou.
17 तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.
17 Assim, pois, Senhor Deus de Israel, dignai-vos ratificar a promessa que fizestes a vosso servo Davi!
18 “पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?
18 Mas, é verdade que Deus habita com os homens sobre a terra? Se o céu e os céus dos céus não vos podem conter, muito menos ainda esta casa que eu construí!
19 तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या.
19 Contudo, Senhor, meu Deus, atendei à prece suplicante de vosso servo, acolhei o clamor e os votos que ele vos dirige.
20 आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी.
20 Que de dia e de noite vossos olhos estejam abertos para esta casa, para este lugar em que prometestes fazer a residência de vosso nome. Escutai o pedido que vosso servo vos apresenta.
21 आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा.
21 Escutai a súplica de vosso servo e de vosso povo de Israel, quando vierem orar neste lugar. Escutai-os de vossa morada celeste, escutai e perdoai!
22 “जेव्हा कोणी आपल्या शेजार्याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील,
22 Se um homem pecar contra seu próximo, e lhe for exigido juramento, se ele vier jurar diante de vosso altar, neste templo,
23 तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.
23 escutai-o do alto dos céus, agi e julgai vossos servos de modo a condenar o culpado, fazendo recair sobre ele o peso de sua falta, e de modo a justificar o inocente tratando-o de acordo com sua inocência.
24 “तुमच्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा तुमचे इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातील आणि जेव्हा ते तुमच्याकडे पुन्हा वळतील व आपल्या नावाची थोरवी गाऊन या मंदिरात तुमच्यापुढे प्रार्थना व विनंती करतील,
24 Quando vosso povo de Israel, por ter pecado contra vós, for subjugado pelo inimigo, se ele retornar a vós, render glória ao vosso nome, entrar neste templo para dirigir-vos preces e súplicas,
25 तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे.
25 escutai-o do alto dos céus, e perdoai o pecado de vosso povo de Israel, reconduzindo-o à terra que lhe destes a ele e a seus pais.
26 “तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील,
26 Se o céu vier a se fechar e não chover mais, por terem eles pecado contra vós, e vierem a orar neste lugar, rendendo glória ao vosso nome e arrependendo-se de seu pecado por causa de vosso castigo,
27 तेव्हा त्यांची विनंती ऐकून तुमचे सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा, व जो देश तुम्ही तुमच्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा.
27 escutai-os do alto dos céus, perdoai o pecado de vossos servos e de vosso povo de Israel. Mostrai-lhes o reto caminho que devem seguir, e concedei chuva à terra que destes como herança a vosso povo.
28 “जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,
28 Quando a terra for assolada pela fome, peste, ferrugem, mangra, gafanhoto, pulgão, quando os inimigos cercarem as cidades da terra de Israel, ou se houver uma calamidade ou uma epidemia qualquer,
29 आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील;
29 e um homem, ou todo o povo de Israel, vos dirigir uma prece suplicante, e cada qual, reconhecendo sua chaga dolorosa, estender as mãos para este templo,
30 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार घडवून आणा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण तुम्हाला त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ तुम्हीच मानवाचे हृदय जाणणारे आहात),
30 escutai-o do alto dos céus, de vossa morada, e perdoai, concedendo a cada um o que merece, vós que conheceis seu coração, pois só vós conheceis o coração do homem.
31 यासाठी की जो देश तुम्ही आमच्या पूर्वजांना दिला त्यात जितका काळ ते राहतील, त्यांनी तुमचे भय बाळगावे व तुमच्या आज्ञेत राहावे.
31 É assim que eles vos temerão e andarão em vossos caminhos durante toda a sua vida na terra que destes a seus pais.
32 “असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली,
32 Quando o estrangeiro, o que não é do vosso povo de Israel, vier de uma terra longínqua, atraído pela fama de vosso nome e do poder de vosso braço, para rezar neste templo,
33 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे, तिथून तुम्ही त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही तुमच्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी तुमचे नाव ओळखावे व तुमच्या इस्राएली लोकांप्रमाणे तुमचे भय धरावे, व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर तुमचे नाव आहे.
33 escutai-o do alto dos céus, lá donde habitais, e concedei a esse estrangeiro tudo o que vos pedir. Todos os povos da terra conhecerão assim vosso nome e vos temerão como vosso povo de Israel, cientes de que vosso nome é invocado sob este templo que vos construí.
34 “जेव्हा तुमचे लोक तुम्ही जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे तुमची प्रार्थना करतात,
34 Quando vosso povo fizer guerra contra seus inimigos em qualquer direção à qual vós o enviardes, e eles vos invocarem, voltando-se para esta cidade de vossa escolha e para este templo que construí à glória de vosso nome,
35 तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
35 escutai do alto dos céus suas preces suplicantes e fazei-lhes justiça.
36 “जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले;
36 Quando tiverem pecado contra vós, - pois não há homem algum sem pecado -, quando em vossa ira os entregardes ao inimigo e o vencedor os deportar para uma terra estrangeira, longínqua ou próxima,
37 आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्या देशात तुमच्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत आणि आम्ही दुष्टतेने वागलो आहोत,’
37 e lá, na terra de seu exílio, entrarem em si e retornarem a vós, dizendo-vos em tom de súplica: Pecamos, cometemos a iniqüidade, fizemos o mal -,
38 आणि त्यांना कैद करून नेलेल्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने तुमच्याकडे वळले आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर तुम्ही निवडले आणि मी तुमच्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,
38 se eles retornarem a vós de todo o seu coração e de toda a sua alma, na terra do exílio ou onde estiverem deportados, e vos dirigirem sua oração, voltando-se para a pátria que destes a seus pais, para a cidade de vossa predileção e para este templo que construí à glória de vosso nome,
39 तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंत्या ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करा.
39 escutai do alto dos céus, lá onde habitais, suas preces súplices, fazei-lhes justiça e perdoai a vosso povo os pecados cometidos contra vós.
40 “माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्या प्रार्थनांकडे लागावे.
40 Por conseguinte, doravante, ó meu Deus, que vossos olhos estejam abertos e vossos ouvidos atentos a {toda} prece feita neste lugar!
41 “याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
41 Senhor, Deus, vinde, pois, habitar nesta moradia, vós e a arca onde reside vosso poder. Senhor Deus, que vossos sacerdotes estejam revestidos de força salutar e que vossos devotos desfrutem de sua felicidade!
42 हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
42 Senhor Deus, não repilais a prece daquele que vos é consagrado, em memória dos favores que concedestes a vosso servo Davi.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.