2 Crônicas 35
marc (MARC) vs NVI
1 योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले.
1 Josias celebrou a Páscoa do Senhor em Jerusalém, e o cordeiro da Páscoa foi abatido no dia catorze do primeiro mês.
2 त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले.
2 Ele nomeou os sacerdotes para as suas responsabilidades e os encorajou a dedicar-se ao serviço no templo do Senhor.
3 ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.
3 Ele disse aos levitas que instruíam todo Israel e haviam sido consagrados ao Senhor: "Ponham a arca sagrada no templo construído por Salomão, filho de Davi, rei de Israel. Vocês não precisam mais levá-la de um lado para outro sobre os ombros. Agora sirvam ao Senhor, ao seu Deus, e ao povo dele, Israel.
4 इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.
4 Preparem-se por famílias, em suas divisões, de acordo com a orientação escrita por Davi, rei de Israel, e por seu filho Salomão.
5 “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा.
5 "Fiquem no lugar santo com um grupo de levitas para cada subdivisão das famílias do povo.
6 वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.”
6 Abatam os cordeiros da Páscoa, consagrem-se e preparem os cordeiros para os seus irmãos israelitas, fazendo o que o Senhor ordenou por meio de Moisés".
7 योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले.
7 Josias deu a todo o povo que ali estava um total de trinta mil ovelhas e cabritos para as ofertas da Páscoa, além de três mil bois; tudo foi tirado dos bens pessoais do rei.
8 त्याच्या अधिकार्यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली.
8 Seus oficiais também contribuíram voluntariamente para o povo, para os sacerdotes e para os levitas. Hilquias, Zacarias e Jeiel, os administradores do templo de Deus, deram aos sacerdotes duas mil e seiscentas ovelhas e cabritos e trezentos bois.
9 तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.
9 Também Conanias, junto com seus irmãos Semaías, Natanael e com os líderes dos levitas, Hasabias, Jeiel e Jozabade, ofereceram aos levitas cinco mil ovelhas e cabritos e quinhentos bois.
10 सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले.
10 O serviço foi organizado e os sacerdotes assumiram os seus lugares com os levitas em seus turnos, conforme o rei ordenara.
11 वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली.
11 Os cordeiros da Páscoa foram abatidos, e os sacerdotes aspergiram o sangue que lhes fora entregue, enquanto os levitas tiravam a pele dos animais.
12 मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याहवेहना अर्पण देण्यासाठी लोकांच्या कुटुंबातील पोटविभागांनी याहवेहना अर्पण द्यावे यासाठी त्यांनी होमार्पण बाजूला ठेवले. त्यांनी गुरांच्या बाबतीतही तसेच केले.
12 Eles separaram também os holocaustos para dá-los aos grupos das famílias do povo, para que essas os oferecessem ao Senhor, conforme está escrito no livro de Moisés; e fizeram o mesmo com os bois.
13 त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे वल्हांडण सणाच्या प्राण्यांना अग्नीवर भाजून घेतले आणि पवित्र अर्पणे मडके, कढई आणि तव्यांत उकळले आणि ते सर्व लोकांना लगेच वाढले.
13 Assaram os animais da Páscoa sobre o fogo, conforme prescrito, cozinharam as ofertas sagradas em potes, caldeirões e panelas, e serviram rapidamente a todo o povo.
14 यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली.
14 Depois disso, os levitas prepararam a parte deles e a dos sacerdotes, pois estes, descendentes de Arão, ficaram sacrificando os holocaustos e as porções de gordura até o anoitecer. Foi por isso que os levitas prepararam a parte deles e a dos sacerdotes, descendentes de Arão.
15 दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.
15 Os músicos, descendentes de Asafe, estavam nos locais prescritos por Davi, e por Asafe, Hemã e Jedutum, videntes do rei. Os porteiros que guardavam cada porta não precisaram deixar os seus postos, pois os seus colegas levitas prepararam as ofertas para eles.
16 त्यावेळेस योशीयाह राजाच्या आदेशाप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि याहवेहच्या वेदीवर होमबलींचे अर्पण करण्यासाठी याहवेहची संपूर्ण सेवा पार पडली.
16 Assim, naquele dia, todo o serviço do Senhor foi executado para a celebração da Páscoa e para a apresentação de holocaustos no altar do Senhor, conforme o rei Josias havia ordenado.
17 त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला.
17 Os israelitas que estavam presentes celebraram a Páscoa naquele dia e durante sete dias celebraram a festa dos pães sem fermento.
18 शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.
18 A Páscoa não havia sido celebrada dessa maneira em Israel desde os dias do profeta Samuel; e nenhum dos reis de Israel havia celebrado uma Páscoa como esta, como o fez Josias, com os sacerdotes, os levitas e todo o Judá e Israel que estavam ali com o povo de Jerusalém.
19 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला.
19 Esta Páscoa foi celebrada no décimo oitavo ano do reinado de Josias.
20 या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला.
20 Depois de tudo o que Josias fez, e depois de colocar em ordem o templo, Neco, rei do Egito, saiu para lutar em Carquemis, junto ao Eufrates, e Josias marchou para combatê-lo.
21 परंतु नखोने त्याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “यहूदीयाच्या राजा, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय भांडण आहे? यावेळेस मी तुमच्यावर नव्हे तर या घराण्याबरोबर मी युद्ध करीत आहे, त्याच्यावर हल्ला करीत आहे. परमेश्वराने मला घाई करण्यास सांगितले आहे; म्हणून परमेश्वराला विरोध करणे थांबव, ते माझ्याबरोबर आहेत, नाहीतर ते तुझा नाश करतील.”
21 Neco, porém, enviou-lhe mensageiros, dizendo: "Não interfiras nisso, ó rei de Judá. Desta vez não estou atacando a ti, mas a outro reino com o qual estou em guerra. Deus me disse que me apressasse; por isso pára de opor-se a Deus, que está comigo; caso contrário ele o destruirá".
22 तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला.
22 Josias, contudo, não quis voltar atrás, e disfarçou-se para enfrentá-lo em combate. Ele não quis ouvir o que Neco lhe disse por ordem de Deus, mas foi combatê-lo na planície de Megido.
23 तेव्हा धनुर्धऱ्यांनी योशीयाह राजाला बाण मारला, त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले, “मला घेऊन जा; मी अत्यंत जखमी झालो आहे.”
23 E na batalha, flecheiros atingiram o rei Josias, pelo que disse aos seus oficiais: "Tirem-me daqui. Estou gravemente ferido".
24 तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.
24 Eles o tiraram do seu carro, colocaram-no em outro e o levaram para Jerusalém, onde morreu. Ele foi sepultado nos túmulos dos seus antepassados, e todos os moradores de Judá e de Jerusalém choraram por ele.
25 यिर्मयाहने योशीयासाठी विलापगीत लिहिले आणि आजपर्यंत सर्व स्त्री-पुरुष गायक विलापामध्ये योशीयाहचे स्मरणोत्सव करतात. इस्राएलमध्ये ही एक परंपरा झाली आहे आणि विलाप गीतांमध्ये त्या लिहिलेल्या आहेत.
25 Jeremias compôs um cântico de lamento em homenagem a Josias, e até hoje todos os cantores e cantoras homenageiam Josias com cânticos de lamento. Estes se tornaram uma tradição em Israel e estão escritos na Coletânea das Lamentações.
26 याहवेहच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे योशीयाहने केलेली भक्तीची कृत्ये आणि त्याच्या राजवटीतील इतर घटना
26 Os demais acontecimentos do reinado de Josias e os seus atos piedosos, de acordo com o que está escrito na Lei do Senhor,
27 सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सर्व इस्राएलचे आणि यहूदीयाचे राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत.
27 todos os acontecimentos, do início ao fim, estão escritos nos registros históricos dos reis de Israel e de Judá.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 35, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.