2 Crônicas 34
marc (MARC) vs NVI
1 वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले.
1 Josias tinha oito anos de idade quando começou a reinar, e reinou trinta e um anos em Jerusalém.
2 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदाच्या मार्गांचे पालन केले.
2 Ele fez o que o Senhor aprova e andou nos caminhos de Davi, seu predecessor, sem desviar-se nem para a direita nem para a esquerda.
3 त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली.
3 No oitavo ano do seu reinado, sendo ainda bem jovem, ele começou a buscar o Deus de Davi, seu predecessor. No décimo segundo ano, começou a purificar Judá e Jerusalém dos altares idólatras, dos postes sagrados, das imagens esculpidas e dos ídolos de metal.
4 त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले.
4 Sob as suas ordens foram derrubados os altares dos baalins; além disso, ele despedaçou os altares de incenso que ficavam acima deles. Também despedaçou e reduziu a pó os postes sagrados, as imagens esculpidas e os ídolos de metal, e os espalhou sobre os túmulos daqueles que lhes haviam oferecido sacrifícios.
5 याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले.
5 Depois queimou os ossos dos sacerdotes sobre esses altares, purificando assim Judá e Jerusalém.
6 मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये,
6 Nas cidades das tribos de Manassés, de Efraim e de Simeão, e até mesmo de Naftali, e nas ruínas ao redor delas,
7 वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला.
7 derrubou os altares e os postes sagrados, esmagou os ídolos, reduzindo-os a pó, e despedaçou todos os altares de incenso espalhados por Israel. Então voltou para Jerusalém.
8 योशीयाहच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, भूमी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी, त्याने अजल्याहचा पुत्र शाफान आणि त्या नगराचा अधिपती मासेयाह यांना, नोंद करणारा यहोआहाजचा पुत्र योवाहला त्याचे परमेश्वर याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पाठविले.
8 No décimo oitavo ano do seu reinado, a fim de purificar o país e o templo, ele enviou Safã, filho de Azalias, e Maaséias, governador da cidade, junto com Joá, filho do arquivista real Joacaz, para restaurarem o templo do Senhor, do seu Deus.
9 ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले.
9 Eles foram entregar ao sumo sacerdote Hilquias a prata que havia sido trazida ao templo de Deus e que os porteiros levitas haviam recolhido das ofertas do povo de Manassés e de Efraim, e de todo o remanescente de Israel, e também de todo o povo de Judá e de Benjamim e dos habitantes de Jerusalém.
10 नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले.
10 Então confiaram a prata aos homens nomeados para supervisionarem a reforma no templo do Senhor, que pagavam os trabalhadores que faziam os reparos no templo.
11 ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले.
11 Também deram dessa prata aos carpinteiros e aos construtores para comprarem pedras lavradas, e madeira para as juntas e as vigas dos edifícios que os reis de Judá haviam deixado ficar em ruínas.
12 कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक—
12 Esses homens fizeram o trabalho com fidelidade. Eram dirigidos por Jaate e Obadias, levitas descendentes de Merari, e Zacarias e Mesulão, descendentes de Coate. Todos os levitas que sabiam tocar instrumentos musicais
13 त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले.
13 estavam encarregados dos operários e supervisionavam todos os trabalhadores em todas as funções. Outros levitas eram secretários, oficiais e porteiros.
14 जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
14 Enquanto recolhiam a prata que tinha sido levada para o templo do Senhor, o sacerdote Hilquias encontrou o livro da Lei do Senhor que havia sido dada por meio de Moisés.
15 हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला.
15 Hilquias disse ao secretário Safã: "Encontrei o livro da Lei no templo do Senhor". E o entregou a Safã.
16 तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत.
16 Então Safã levou o livro ao rei e lhe informou: "Teus servos estão fazendo tudo o que lhes foi ordenado.
17 त्यांना जो पैसा याहवेहच्या मंदिरात मिळाला, त्यांनी तो मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्यांच्या हाती दिला आहे.”
17 Fundiram a prata que estava no templo do Senhor e a confiaram aos supervisores e aos trabalhadores".
18 नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले.
18 E acrescentou: "O sacerdote Hilquias entregou-me um livro". E Safã leu trechos do livro para o rei.
19 जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली.
19 Assim que o rei ouviu as palavras da Lei, rasgou suas vestes
20 त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:
20 e deu estas ordens a Hilquias, a Aicam, filho de Safã, a Abdom, filho de Mica, ao secretário Safã e ao auxiliar real Asaías:
21 “जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”
21 "Vão consultar o Senhor por mim e pelo remanescente de Israel e de Judá acerca do que está escrito neste livro que foi encontrado. A ira do Senhor contra nós deve ser grande, pois os nossos antepassados não obedeceram à palavra do Senhor e não agiram de acordo com tudo o que está escrito neste livro".
22 हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.
22 Hilquias e aqueles que o rei tinha enviado com ele foram falar com a profetisa Hulda, mulher de Salum, responsável pelo guarda-roupa do templo, filho de Tocate e neto de Harás. Ela morava no bairro novo de Jerusalém.
23 ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा,
23 Ela lhes disse: "Assim diz o Senhor, o Deus de Israel: ‘Digam ao homem que os enviou a mim:
24 ‘याहवेह असे म्हणतात: मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन आणि यहूदीयाच्या राजासमोर वाचलेल्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप आणेन.
24 Assim diz o Senhor: Eu vou trazer uma desgraça sobre este lugar e sobre seus habitantes; todas as maldições escritas no livro que foi lido na presença do rei de Judá.
25 कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’
25 Porque me abandonaram e queimaram incenso a outros deuses, provocando-me a ira por meio de todos os ídolos que as mãos deles têm feito, minha ira arderá contra este lugar e não será apagada’.
26 यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
26 Digam ao rei de Judá, que os enviou para consultar o Senhor: ‘Assim diz o Senhor, o Deus de Israel, acerca das palavras que você ouviu:
27 कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे होते आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध तो जे काही बोलला ते तू ऐकले तेव्हा तू स्वतःला परमेश्वरासमोर नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.
27 Já que o seu coração se abriu e você se humilhou diante de Deus quando ouviu o que ele falou contra este lugar e contra os seus habitantes, e você se humilhou diante de mim, rasgou as suas vestes e chorou na minha presença, eu o ouvi, declara o Senhor.
28 आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ”
28 Portanto, eu o reunirei aos seus antepassados, e você será sepultado em paz. Seus olhos não verão a desgraça que trarei sobre este lugar e sobre seus habitantes’ ". Então eles levaram a resposta ao rei.
29 नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले.
29 Então o rei convocou todas as autoridades de Judá e de Jerusalém.
30 यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.
30 Depois subiu ao templo do Senhor acompanhado por todos os homens de Judá, todo o povo de Jerusalém, os sacerdotes e os levitas: todo o povo, dos mais simples aos mais importantes. Para todos o rei leu em voz alta todas as palavras do Livro da Aliança, que havia sido encontrado no templo do Senhor.
31 राजा त्याच्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि हुकूमनाम्याचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराचे नवीनीकरण केले.
31 Ele tomou o seu lugar e, na presença do Senhor, fez uma aliança, comprometendo-se a seguir o Senhor e obedecer de todo o coração e de toda a alma aos seus mandamentos, seus testemunhos e seus decretos, cumprindo as palavras da aliança escritas naquele livro.
32 नंतर त्याने यरुशलेममधील प्रत्येकाला आणि बिन्यामीन गोत्रांच्या लोकांना तसे वचन देण्यास लावले; यरुशलेमच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराबरोबर केलेल्या कराराप्रमाणे केले.
32 Depois fez com que todos em Jerusalém e em Benjamim se comprometessem com a aliança; os habitantes de Jerusalém passaram a cumprir a aliança de Deus, o Deus dos seus antepassados.
33 योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत.
33 Josias retirou todos os ídolos detestáveis de todo o território dos israelitas e obrigou todos os que estavam em Israel a servirem ao Senhor, ao seu Deus. E enquanto ele viveu, o povo não deixou de seguir o Senhor, o Deus dos seus antepassados.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.