2 Crônicas 33

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले.
1 Manassés tinha doze anos de idade quando começou a reinar, e reinou cinqüenta e cinco anos em Jerusalém.
2 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले.
2 Ele fez o que o Senhor reprova, imitando as práticas detestáveis das nações que o Senhor havia expulsado de diante dos israelitas.
3 त्याचे वडील हिज्कीयाहने पाडून टाकलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; त्याने बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.
3 Reconstruiu os altares idólatras que seu pai Ezequias havia demolido; também ergueu altares para os baalins e fez postes sagrados. Inclinou-se diante de todos os exércitos celestes e lhes prestou culto.
4 त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.”
4 Construiu altares no templo do Senhor, do qual o Senhor tinha dito: "Meu nome permanecerá para sempre em Jerusalém".
5 याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या.
5 Nos dois pátios do templo do Senhor ele construiu altares para todos os exércitos celestes.
6 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला.
6 Chegou a queimar seus filhos em sacrifício, no vale de Ben-Hinom; praticou feitiçaria, adivinhação e magia, e consultou médiuns e espíritas. Fez o que o Senhor reprova, provocando-o à ira.
7 जी कोरीव मूर्ती त्याने घडविली होती, ती त्याने घेतली व परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी परमेश्वर, दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यांना म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.
7 Ele tomou a imagem esculpida que havia feito e a colocou no templo, do qual Deus tinha dito a Davi e a seu filho Salomão: "Neste templo e em Jerusalém, que escolhi dentre todas as tribos de Israel, porei meu nome para sempre.
8 जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.”
8 Não farei os pés dos israelitas deixarem novamente a terra que dei aos seus antepassados, se tão-somente tiverem o cuidado de fazer tudo o que lhes ordenei em todas as leis, os decretos e as ordenanças dados por meio de Moisés".
9 परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.
9 Manassés, porém, desencaminhou Judá e o povo de Jerusalém, a ponto de fazerem pior do que as nações que o Senhor havia destruído diante dos israelitas.
10 याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
10 O Senhor falou a Manassés e a seu povo, mas não lhe deram atenção.
11 तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले.
11 Por isso o Senhor enviou contra eles os comandantes do exército do rei da Assíria, os quais prenderam Manassés, colocaram-lhe um gancho no nariz e algemas de bronze, e o levaram para a Babilônia.
12 त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले.
12 Em sua angústia, ele buscou o favor do Senhor, o seu Deus, e humilhou-se muito diante do Deus dos seus antepassados.
13 आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.
13 Quando ele orou, o Senhor o ouviu e atendeu o seu pedido; de forma que o trouxe de volta a Jerusalém e a seu reino. E assim Manassés reconheceu que o Senhor é Deus.
14 नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.
14 Depois disso ele reconstruiu e aumentou a altura do muro externo da cidade de Davi, a oeste da fonte de Giom, no vale, até a entrada da porta do Peixe, em torno da colina de Ofel. Também pôs comandantes militares em todas as cidades fortificadas de Judá.
15 त्याने परकीय दैवते टाकून दिली आणि याहवेहच्या मंदिरातून मूर्ती काढून टाकली, तसेच मंदिराच्या टेकडीवर आणि यरुशलेममध्ये ज्या वेद्या त्याने बांधल्या होत्या त्या सर्व वेद्या काढल्या आणि त्या शहराबाहेर फेकून दिल्या.
15 Manassés tirou do templo do Senhor os deuses estrangeiros e a imagem que lá havia colocado, bem como todos os altares idólatras que havia construído na colina do templo e em Jerusalém; e jogou-os fora da cidade.
16 नंतर त्याने याहवेहची वेदी पुनर्स्थापित केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्तुतीची अर्पणे केली आणि यहूदीयाला सांगितले की, त्यांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहचीच यांचीच सेवा करावी.
16 Então restaurou o altar do Senhor e sobre ele ofereceu sacrifícios de comunhão e ofertas de gratidão, ordenando a Judá que servisse o Senhor, o Deus de Israel.
17 तरीसुद्धा लोकांनी उच्च स्थानावर जाऊन त्यांचे परमेश्वर याहवेह यांनाच अर्पणे करण्याचे कायम ठेवले.
17 O povo, contudo, continuou a sacrificar nos altares idólatras, mas somente ao Senhor, ao seu Deus.
18 मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत.
18 Os demais acontecimentos do reinado de Manassés, inclusive sua oração a seu Deus e as palavras que os videntes lhe falaram em nome do Senhor, o Deus de Israel, estão escritos nos registros históricos dos reis de Israel.
19 त्याची प्रार्थना आणि त्याच्या कळकळीच्या विनवणीमुळे परमेश्वर दयेने कसे हेलावून गेले, तसेच त्याची सर्व पापे आणि अविश्वासूपणा आणि जिथे घटनास्थळे आहेत, तिथे त्याने उच्च स्थाने बांधली आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती स्थापित केल्या, स्वतःला नम्र करण्याआधी केलेल्या या सर्व गोष्टी संदेष्ट्यांच्या घटनांची नोंद यामध्ये लिहिलेल्या आहेत.
19 Sua oração e a resposta de Deus, bem como todos os seus pecados e a sua infidelidade, além dos locais onde construiu altares idólatras e ergueu postes sagrados e ídolos, antes de humilhar-se, tudo está escrito nos registros históricos dos videntes.
20 मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.
20 Manassés descansou com os seus antepassados e foi sepultado em sua propriedade. E seu filho Amom foi o seu sucessor.
21 वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले.
21 Amom tinha vinte e dois anos de idade quando começou a reinar, e reinou dois anos em Jerusalém.
22 त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली.
22 Ele fez o que o Senhor reprova; à semelhança de seu pai, Amom prestou culto e ofereceu sacrifícios a todos os ídolos que Manassés havia feito.
23 परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.
23 Mas, ao contrário de seu pai Manassés, não se humilhou diante do Senhor, antes, aumentou a sua culpa.
24 आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली.
24 Os oficiais de Amom conspiraram contra ele e o assassinaram em seu palácio.
25 तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले.
25 Mas o povo matou todos os que haviam conspirado contra o rei Amom, e a seu filho Josias proclamou rei em seu lugar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.