2 Crônicas 32
marc (MARC) vs VC
1 हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी.
1 Depois desses feitos, que eram provas de fidelidade, Senaquerib, rei da Assíria, invadiu Judá e assediou as cidades fortes com o desígnio de se apoderar delas.
2 जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे,
2 Quando Ezequias viu que o objetivo de Senaquerib era Jerusalém,
3 तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.
3 resolveu, de acordo com os chefes e seus oficiais, obstruir as águas das nascentes que se encontravam fora da cidade; e todos o ajudaram a executar esse projeto.
4 त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”
4 Juntou muita gente; obstruíram todas as fontes, como também o riacho que corria no meio da terra. Por que, diziam eles, os reis da Assíria haveriam de encontrar, chegando aqui, água em abundância?
5 नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.
5 Ezequias, cheio de energia, reparou a muralha em ruína, levantou torres, construiu um segundo muro exterior, restaurou Milo, na cidade de Davi, e mandou fabricar lanças e escudos em grande abundância.
6 त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले:
6 Colocou à frente do exército chefes militares; reuniu-os perto de si na praça da porta da cidade e exortou-os à coragem.
7 “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे.
7 Sede valentes, disse-lhes ele; cobrai coragem, nenhum temor ou pavor diante do rei da Assíria e toda essa multidão que ele arrasta após si. Há mais conosco do que com ele.
8 त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.
8 Com ele, um braço de carne; conosco, o Senhor, nosso Deus, para nos auxiliar e combater conosco. A estas palavras de Ezequias, rei de Judá, o povo recobrou confiança.
9 नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:
9 Senaquerib, que se encontrava diante de Laquis com todas as suas forças armadas, enviou uma delegação a Jerusalém para dizer a Ezequias e aos homens de Judá:
10 “अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात?
10 Eis o que diz Senaquerib, rei da Assíria: em que confiais vós para vos encerrardes dessa maneira em Jerusalém?
11 जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे.
11 Não vedes que Ezequias vos engana para vos fazer perecer de fome e sede, quando vos diz: o Senhor, nosso Deus, nos salvará das mãos do rei da Assíria?
12 हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’
12 Não foi ele, Ezequias, quem suprimiu os lugares altos e os altares do Senhor, ordenando a Judá e a Jerusalém não se prostrar e não oferecer incenso, senão diante de um só altar?
13 “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?
13 Não sabeis o que fizemos, meus pais e eu, a todos os povos das outras terras? Puderam os deuses dessas nações salvar seus países de minha mão?
14 माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल?
14 Entre todos os deuses dessas nações que meus pais exterminaram, qual deles subtraiu sua nação de meu poder, para que vosso Deus vos possa livrar do meu braço?
15 तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!”
15 Não vos deixeis, portanto, iludir por Ezequias, nem seduzir. Não confieis nele. Nenhum deus de nenhuma nação nem de algum reino pôde livrar seu povo de minha mão, nem da mão de meus pais. Quanto menos vossos deuses poderiam livrar-vos da minha!
16 सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले.
16 Os homens de Senaquerib ajuntaram ainda muitas outras palavras contra o Senhor Deus e contra Ezequias, seu servo.
17 राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.”
17 Ele escreveu também uma carta cheia de ultrajes contra o Senhor, Deus de Israel, na qual o atacava dizendo: Assim como os deuses das nações não puderam subtraí-las de minha mão, assim também o Deus de Ezequias não poderá livrar seu povo da minha.
18 तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.
18 E tudo isso foi gritado em alta voz em hebraico, com o fim de intimidar e assustar o povo de Jerusalém, que se encontrava na muralha, a fim de apoderar-se da cidade.
19 यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.
19 Falavam do Deus de Jerusalém como dos deuses das nações pagãs que não passam de obras feitas pela mão do homem.
20 राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली.
20 Nessa altura, o rei Ezequias e o profeta Isaías, filho de Amós, puseram-se em oração para implorar aos céus.
21 आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.
21 E o Senhor enviou um anjo que exterminou todo o exército do rei da Assíria, no próprio acampamento, com os chefes e os generais; e o rei voltou para a sua terra inteiramente confuso. Quando ele entrava no templo de seu deus, seus filhos, saídos de sua própria carne, assassinaram-no com um golpe de espada.
22 अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.
22 Desse modo o Senhor livrou Ezequias e os habitantes de Jerusalém da mão de Senaquerib e de todos os seus inimigos, protegendo-os contra todos os seus vizinhos.
23 पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.
23 Muitos foram os que levaram a Jerusalém oferendas para o Senhor e ricos presentes para Ezequias, rei de Judá, que conquistou desde então um grande prestígio aos olhos das nações pagãs.
24 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली ज्यांनी त्याला उत्तर दिले आणि एक आश्चर्यकारक चिन्ह दिले.
24 Por aqueles dias, Ezequias caiu numa doença mortal. Orou ao Senhor, e este lhe respondeu por um prodígio.
25 परंतु हिज्कीयाहचे मन गर्विष्ठ होते आणि त्याच्यावर दाखविलेल्या दयेला त्याने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि यहूदीया व यरुशलेमवर याहवेहचा कोप आला होता.
25 Mas Ezequias não se mostrou reconhecido pelo benefício recebido: seu coração se ensoberbeceu e a ira do Senhor se inflamou contra ele, como também contra Judá e Jerusalém.
26 तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही.
26 Todavia, como ele se humilhou com os habitantes de Jerusalém, do orgulho de seu coração, não se desencadeou sobre ele a ira do Senhor, durante sua vida.
27 हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली.
27 Ezequias possuía muita riqueza e glória. Mandou fazer depósitos para a prata, o ouro, as pedras preciosas, os aromas, os escudos e os outros objetos de valor;
28 हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले.
28 armazéns para o trigo, o mosto e o azeite; estábulos para toda a espécie de gado e apriscos para os rebanhos.
29 त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती.
29 Construiu para si cidades. Adquiriu um grande número de rebanhos, de gado grande e miúdo, pois o Senhor lhe tinha dado imensas riquezas.
30 हिज्कीयाहनेच गीहोन झर्याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला.
30 Foi ele, Ezequias, quem fechou a saída superior das águas do Gião, e as dirigiu para o ocidente da cidade de Davi. Teve bom êxito em tudo o que empreendeu.
31 परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले.
31 Todavia, quando os chefes de Babilônia lhe enviaram mensageiros para se informar do prodígio que tinha acontecido na terra, Deus o abandonou para provar e conhecer o âmago de seu coração.
32 हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.
32 Os outros atos de Ezequias, suas obras piedosas, tudo isso se acha relatado na visão do profeta Isaías, filho de Amós, e nos livros dos reis de Judá e de Israel.
33 हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.
33 Ezequias adormeceu entre seus pais e foi sepultado na parte superior dos sepulcros dos filhos de Davi. Todo o Judá e os habitantes de Jerusalém lhe prestaram as honras fúnebres. Seu filho Manassés sucedeu-lhe no trono.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 32, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.