2 Crônicas 31

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.
1 Acabado tudo isso, todos os israelitas que ali estavam saíram às cidades de Judá e despedaçaram as colunas, cortaram os aserins, e derrubaram os altos e altares por toda a Judá e Benjamim, como também em Efraim e Manassés, até os destruírem de todo. Depois voltaram todos os filhos de Israel para as suas cidades, cada um para sua possessão.
2 हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली.
2 E Ezequias estabeleceu as turmas dos sacerdotes e levitas, turma por turma, cada um segundo o seu serviço, tanto os sacerdotes como os levitas, para os holocaustos e as ofertas pacíficas, para ministrarem, renderem ações de graças e cantarem louvores nas portas do arraial do Senhor.
3 राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले.
3 A contribuição da fazenda do rei foi designada para os holocaustos: os holocaustos da manhã e da tarde, e os holocaustos dos sábados, das luas novas e das festas fixas, como está escrito na lei do Senhor.
4 त्याने यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना याजक आणि लेवींना त्यांचा योग्य भाग देण्याची आज्ञा केली, ज्यामुळे ते स्वतःला याहवेहच्या नियमशास्त्रासाठी समर्पित करू शकतील.
4 Além disso ordenou ao povo que morava em Jerusalém que desse a porção pertencente aos sacerdotes e aos levitas, para que eles se dedicassem à lei do Senhor.
5 आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.
5 Logo que esta ordem se divulgou, os filhos de Israel trouxeram em abundância as primícias de trigo, mosto, azeite, mel e todo produto do campo; também trouxeram em abundância o dízimo de tudo.
6 यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला.
6 Os filhos de Israel e de Judá que habitavam nas cidades de Judá também trouxeram o dízimo de bois e de ovelhas, e o dízimo das coisas dedicadas que foram consagradas ao Senhor seu Deus, e depositaram-nos em montões.
7 त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले.
7 No terceiro mês começaram a formar os montões, e no sétimo mês acabaram.
8 जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला.
8 Vindo, pois, Ezequias e os príncipes, e vendo aqueles montões, bendisseram ao Senhor e ao seu povo Israel.
9 हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले;
9 Então perguntou Ezequias aos sacerdotes e aos levitas acerca daqueles montões.
10 आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”
10 Respondeu-lhe Azarias, o sumo sacerdote, que era da casa de Zadoque, dizendo: Desde que o povo começou a trazer as ofertas para a casa do Senhor, tem havido o que comer e de que se fartar, e ainda nos tem sobejado bastante, porque o Senhor abençoou ao seu povo; e os sobejos constituem esta abastança.
11 हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले.
11 Então ordenou Ezequias que se preparassem câmaras na casa do Senhor; e as prepararam.
12 नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता.
12 Ali recolheram fielmente as ofertas, os dízimos e as coisas dedicadas; e tinha o cargo disto o levita Conanias, e depois dele Simei, seu irmão.
13 यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्‍याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता.
13 E Jeiel, Azazias, Naate, Asael, Jerimote, Jozabade, Eliel, Ismaquias, Maate e Benaías eram superintendentes sob a direção de Conanias e de Simei, seu irmão, por decreto do rei Ezequias e de Azarias, o chefe da casa de Deus.
14 इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता.
14 E o levita Coré, filho de Imná, e guarda da porta oriental, estava encarregado das ofertas voluntárias que se faziam a Deus, para distribuir as ofertas do Senhor e as coisas santíssimas.
15 एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्‍याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली.
15 E debaixo das suas ordens estavam Edem, Miniamim, Jesuá, Semaías, Amarias e Secanias, nas cidades dos sacerdotes, para fazerem com fidelidade a distribuição a seus irmãos, segundo as suas turmas, tanto aos pequenos como aos grandes,
16 त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील.
16 exceto os que estavam contados pelas genealogias, varões da idade de três anos para cima, todos os que entravam na casa do Senhor, para o seu serviço diário nos seus cargos segundo as suas turmas.
17 आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या.
17 Quanto ao registro dos sacerdotes, era feito segundo as suas casas paternas; e o dos levitas da idade de vinte anos para cima era feito segundo os seus cargos nas suas turmas.
18 त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते.
18 Os sacerdotes eram arrolados com todos os seus pequeninos, suas mulheres, seus filhos e suas filhas, por toda a congregação; porque estes se dedicavam fielmente às coisas consagradas.
19 याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले.
19 Também para os filhos de Arão os sacerdotes que estavam nos campos dos arrabaldes das suas cidades, em cada cidade, havia homens designados por nome para distribuírem porções a todo homem entre os sacerdotes e a todos os arrolados entre os levitas.
20 हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला.
20 Assim fez Ezequias em todo o Judá; e fez o que era bom, e reto, e fiel perante o Senhor seu Deus.
21 परमेश्वराच्या मंदिराचे जे काही सेवाकार्य त्याने हाती घेतले आणि नियम व आज्ञाचे पालन करण्यामध्ये त्याने त्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि संपूर्ण अंतःकरणापासून काम केले आणि त्यामुळे तो समृद्ध झाला.
21 E toda a obra que empreendeu no serviço da casa de Deus, e de acordo com a lei e os mandamentos, para buscar a seu Deus, ele a fez de todo o seu coração e foi bem sucedido.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 31, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.