2 Crônicas 30

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.
1 Ezequias enviou uma mensagem a todo o Israel e Judá e também escreveu cartas a Efraim e a Manassés, convidando-os para ir ao templo do Senhor em Jerusalém e celebrar a Páscoa do Senhor, o Deus de Israel.
2 राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा.
2 O rei, seus oficiais e toda a comunidade de Jerusalém decidiram celebrar a Páscoa no segundo mês.
3 नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते.
3 Não tinha sido possível celebrá-la na data prescrita, pois não havia número suficiente de sacerdotes consagrados, e o povo não estava reunido em Jerusalém.
4 ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले.
4 A idéia pareceu boa tanto ao rei quanto a toda a assembléia.
5 त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.
5 Então decidiram fazer uma proclamação em todo o Israel, desde Berseba até Dã, convocando o povo a Jerusalém para celebrar a Páscoa do Senhor, o Deus de Israel. Pois muitos não a celebravam segundo o que estava escrito.
6 राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते:
6 Por ordem do rei, mensageiros percorreram Israel e Judá com cartas assinadas pelo rei e pelos seus oficiais, com a seguinte mensagem: "Israelitas, voltem para o Senhor, o Deus de Abraão, de Isaque e de Israel, para que ele se volte para vocês que restaram e escaparam das mãos dos reis da Assíria.
7 तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात.
7 Não sejam como seus pais e seus irmãos, que foram infiéis ao Senhor, o Deus dos seus antepassados, de maneira que ele os deixou em ruínas, conforme vocês vêem.
8 तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.
8 Portanto não sejam obstinados como seus antepassados; submetam-se ao Senhor. Venham ao santuário que ele consagrou para sempre. Sirvam ao Senhor, ao seu Deus, para que o fogo da sua ira se desvie de vocês.
9 जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”
9 Se vocês voltarem para o Senhor, os que capturaram os seus irmãos e os seus filhos terão misericórdia deles, e eles voltarão a esta terra, pois o Senhor, o seu Deus, é bondoso e compassivo. Ele não os rejeitará, se vocês se voltarem para ele".
10 संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.
10 Os mensageiros foram de cidade em cidade, em Efraim e em Manassés, e até em Zebulom, mas o povo zombou deles e os expôs ao ridículo.
11 तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.
11 No entanto, alguns homens de Aser, de Manassés e de Zebulom humilharam-se e foram para Jerusalém.
12 याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.
12 Já em Judá a mão de Deus esteve sobre o povo dando-lhes unidade de pensamento para executarem o que o rei e os seus oficiais haviam ordenado, conforme a palavra do Senhor.
13 दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले.
13 Uma imensa multidão reuniu-se em Jerusalém no segundo mês, para celebrar a festa dos pães sem fermento.
14 त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या.
14 Eles retiraram os altares que havia em Jerusalém e se desfizeram de todos os altares de incenso, atirando-os no vale de Cedrom.
15 वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली.
15 Abateram o cordeiro da Páscoa no dia catorze do segundo mês. Os sacerdotes e os levitas, envergonhados, consagraram-se e levaram holocaustos ao templo do Senhor.
16 नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
16 E assumiram seus postos, conforme prescrito na Lei de Moisés, homem de Deus. Os sacerdotes aspergiram o sangue que os levitas lhes entregaram.
17 जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.
17 Visto que muitos na multidão não haviam se consagrado, os levitas tiveram que matar cordeiros da Páscoa para todos os que não estavam cerimonialmente puros e que por isso não podiam consagrar os seus cordeiros ao Senhor.
18 एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.
18 Embora muitos dos que vieram de Efraim, de Manassés, de Issacar e de Zebulom não se tivessem purificado, assim mesmo comeram a Páscoa, contrariando o que estava escrito. Mas Ezequias orou por eles, dizendo: "Queira o Senhor, que é bondoso, perdoar todo
19 जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”
19 aquele que inclina o seu coração para buscar a Deus, o Senhor, o Deus dos seus antepassados, mesmo que não esteja puro de acordo com as regras do santuário".
20 आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले.
20 E o Senhor ouviu a oração de Ezequias e não castigou o povo.
21 यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.
21 Os israelitas presentes em Jerusalém celebraram com muita alegria a festa dos pães sem fermento durante sete dias. Diariamente os levitas e os sacerdotes cantavam louvores, ao som dos instrumentos ressonantes do Senhor.
22 ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती केली.
22 Ezequias dirigiu palavras animadoras a todos os levitas, que mostraram boa disposição para com o serviço do Senhor. Durante os sete dias eles comeram suas porções das ofertas, apresentaram sacrifícios de comunhão e louvaram o Senhor, o Deus dos seus antepassados.
23 तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला.
23 E toda a assembléia decidiu prolongar a festa por mais sete dias, e a celebraram com alegria.
24 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने या सभेसाठी एक हजार बैल आणि सात हजार मेंढ्या आणि शेळ्या दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार बैल आणि दहा हजार मेंढ्या व शेळ्या दिल्या. तेव्हा मोठ्या संख्येने याजकांनी स्वतःला पवित्र केले.
24 Ezequias, rei de Judá, forneceu mil novilhos e sete mil ovelhas e bodes para a assembléia, e os líderes, mil novilhos e dez mil ovelhas e bodes. Muitos sacerdotes se consagraram,
25 यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला.
25 e toda a assembléia de Judá se regozijava, juntamente com os sacerdotes, com os levitas e com todos os que se haviam reunido, vindos de Israel, inclusive os estrangeiros que viviam em Israel e em Judá.
26 त्यावेळेस तिथे यरुशलेममध्ये मोठा आनंद झाला होता, कारण इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनच्या दिवसांपासून यरुशलेममध्ये यासारखे काहीही घडले नव्हते.
26 Houve grande alegria em Jerusalém, pois desde os dias de Salomão, filho de Davi, rei de Israel, não havia acontecido algo assim na cidade.
27 याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.
27 Os sacerdotes e os levitas levantaram-se para abençoar o povo, e Deus os ouviu; a oração deles chegou aos céus, sua santa habitação.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.