2 Crônicas 26
marc (MARC) vs ARA
1 तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले.
1 Todo o povo de Judá tomou a Uzias, que era de dezesseis anos, e o constituiu rei em lugar de Amazias, seu pai.
2 अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता.
2 Ele edificou a Elate e a restituiu a Judá, depois que o rei descansou com seus pais.
3 उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
3 Uzias tinha dezesseis anos quando começou a reinar e cinquenta e dois anos reinou em Jerusalém. Era o nome de sua mãe Jecolias, de Jerusalém.
4 त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
4 Ele fez o que era reto perante o Senhor , segundo tudo o que fizera Amazias, seu pai.
5 जखर्याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.
5 Propôs-se buscar a Deus nos dias de Zacarias, que era sábio nas visões de Deus; nos dias em que buscou ao Senhor , Deus o fez prosperar.
6 तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.
6 Saiu e guerreou contra os filisteus e quebrou o muro de Gate, o de Jabné e o de Asdode; e edificou cidades no território de Asdode e entre os filisteus.
7 परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली.
7 Deus o ajudou contra os filisteus, e contra os arábios que habitavam em Gur-Baal, e contra os meunitas.
8 अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता.
8 Os amonitas deram presentes a Uzias, cujo renome se espalhara até à entrada do Egito, porque se tinha tornado em extremo forte.
9 उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.
9 Também edificou Uzias torres em Jerusalém, à Porta da Esquina, à Porta do Vale e à Porta do Ângulo e as fortificou.
10 त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.
10 Também edificou torres no deserto e cavou muitas cisternas, porque tinha muito gado, tanto nos vales como nas campinas; tinha lavradores e vinhateiros, nos montes e nos campos férteis, porque era amigo da agricultura.
11 उज्जीयाहकडे एक प्रशिक्षित सैन्य होते, हनन्याह हा राजेशाही अधिकाऱ्यांपैकी एक होता, याच्या मार्गदर्शनाखाली सचिव ईयेल आणि मासेयाह या अधिकाऱ्याने जमविलेल्या संख्येनुसार विभाग करून ते युद्ध करण्यास सुसज्जित होते.
11 Tinha também Uzias um exército de homens destros nas armas, que saíam à guerra em tropas, segundo o rol feito pelo escrivão Jeiel e Maaseias, oficial, sob a direção de Hananias, um dos príncipes do rei.
12 योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती.
12 O número total dos cabeças das famílias, homens valentes, era de dois mil e seiscentos.
13 त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते.
13 Debaixo das suas ordens, havia um exército guerreiro de trezentos e sete mil e quinhentos homens, que faziam a guerra com grande poder, para ajudar o rei contra os inimigos.
14 उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला.
14 Preparou-lhes Uzias, para todo o exército, escudos, lanças, capacetes, couraças e arcos e até fundas para atirar pedras.
15 यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.
15 Fabricou em Jerusalém máquinas, de invenção de homens peritos, destinadas para as torres e cantos das muralhas, para atirarem flechas e grandes pedras; divulgou-se a sua fama até muito longe, porque foi maravilhosamente ajudado, até que se tornou forte.
16 परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.
16 Mas, havendo-se já fortificado, exaltou-se o seu coração para a sua própria ruína, e cometeu transgressões contra o Senhor , seu Deus, porque entrou no templo do Senhor para queimar incenso no altar do incenso.
17 अजर्याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले.
17 Porém o sacerdote Azarias entrou após ele, com oitenta sacerdotes do Senhor , homens da maior firmeza;
18 ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.”
18 e resistiram ao rei Uzias e lhe disseram: A ti, Uzias, não compete queimar incenso perante o Senhor , mas aos sacerdotes, filhos de Arão, que são consagrados para este mister; sai do santuário, porque transgrediste; nem será isso para honra tua da parte do Senhor Deus.
19 उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला.
19 Então, Uzias se indignou; tinha o incensário na mão para queimar incenso; indignando-se ele, pois, contra os sacerdotes, a lepra lhe saiu na testa perante os sacerdotes, na Casa do Senhor , junto ao altar do incenso.
20 जेव्हा अजर्याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.
20 Então, o sumo sacerdote Azarias e todos os sacerdotes voltaram-se para ele, e eis que estava leproso na testa, e apressadamente o lançaram fora; até ele mesmo se deu pressa em sair, visto que o Senhor o ferira.
21 उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.
21 Assim, ficou leproso o rei Uzias até ao dia da sua morte; e morou, por ser leproso, numa casa separada, porque foi excluído da Casa do Senhor ; e Jotão, seu filho, tinha a seu cargo a casa do rei, julgando o povo da terra.
22 उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत.
22 Quanto aos mais atos de Uzias, tanto os primeiros como os últimos, o profeta Isaías, filho de Amoz, os escreveu.
23 उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
23 Descansou Uzias com seus pais, e, com seus pais, o sepultaram no campo do sepulcro que era dos reis; porque disseram: Ele é leproso. E Jotão, seu filho, reinou em seu lugar.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.