2 Crônicas 24

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती.
1 Tinha Joás sete anos de idade quando começou a reinar e quarenta anos reinou em Jerusalém; e era o nome de sua mãe Zíbia, de Berseba.
2 यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले.
2 E fez Joás o que era reto aos olhos do Senhor , todos os dias do sacerdote Joiada.
3 यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या.
3 E tomou Joiada para ele duas mulheres; e gerou filhos e filhas.
4 काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले.
4 E sucedeu, depois disso, que veio ao coração de Joás renovar a Casa do Senhor .
5 त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही.
5 Ajuntou, pois, os sacerdotes e os levitas e disse-lhes: Saí pelas cidades de Judá e ajuntai dinheiro de todo o Israel para reparar a Casa do vosso Deus, de ano em ano; e, vós, apressai este negócio. Porém os levitas não se apressaram.
6 तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?”
6 E o rei chamou a Joiada, o chefe, e disse-lhe: Por que não fizeste inquirição entre os levitas, para que trouxessem de Judá e de Jerusalém a oferta de Moisés, servo do Senhor , e da congregação de Israel à Tenda do Testemunho?
7 आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता.
7 Porque, sendo Atalia ímpia, seus filhos arruinaram a Casa de Deus e até todas as coisas sagradas da Casa do Senhor empregaram em baalins.
8 राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली.
8 E deu o rei ordem, e fizeram uma arca e a puseram fora, à porta da Casa do Senhor .
9 तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा.
9 E publicou-se em Judá e em Jerusalém que trouxessem ao Senhor a oferta que Moisés, o servo de Deus, havia imposto a Israel no deserto.
10 सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले.
10 Então, todos os príncipes e todo o povo se alegraram, e trouxeram a oferta, e a lançaram na arca, até que acabaram a obra.
11 जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले.
11 E sucedeu que, ao tempo que traziam a arca pelas mãos dos levitas, segundo o mandado do rei, e vendo que já havia muito dinheiro, vinham o escrivão do rei e o comissário do sumo sacerdote, e esvaziavam a arca, e a tomavam, e a tornavam ao seu lugar; assim faziam dia após dia e ajuntaram dinheiro em abundância,
12 राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले.
12 o qual o rei e Joiada davam aos que dirigiam a obra do serviço da Casa do Senhor e alugaram pedreiros e carpinteiros, para renovarem a Casa do Senhor , como também ferreiros e serralheiros, para repararem a Casa do Senhor .
13 कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले.
13 E os que dirigiam a obra faziam que a reparação da obra fosse crescendo pelas suas mãos, e restauraram a Casa de Deus ao seu estado, e a fortaleceram.
14 जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते.
14 E, depois de acabarem, trouxeram o resto do dinheiro diante do rei e de Joiada e dele fizeram utensílios para a Casa do Senhor , e objetos para ministrar e oferecer, e perfumadores e vasos de ouro e de prata. E continuamente sacrificaram holocaustos na Casa do Senhor , todos os dias de Joiada.
15 यहोयादा आता पूर्ण वयस्कर झाला होता आणि तो वयाच्या एकशे तिसाव्या वर्षी मरण पावला.
15 E envelheceu Joiada e morreu farto de dias; era da idade de cento e trinta anos quando morreu.
16 इस्राएलमध्ये परमेश्वरासाठी आणि त्यांच्या मंदिरासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे, त्याला दावीदाच्या नगरात राजांबरोबर पुरण्यात आले.
16 E o sepultaram na Cidade de Davi, com os reis, porque tinha feito bem em Israel e para com Deus e a sua casa.
17 यहोयादाच्या मृत्यूनंतर, यहूदीयाचे अधिकारी आले आणि त्यांनी राजाला आदरयुक्त वंदन केले आणि त्याने त्यांचे ऐकले.
17 Porém, depois da morte de Joiada, vieram os príncipes de Judá e prostraram-se perante o rei; e o rei os ouviu.
18 त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला.
18 E deixaram a Casa do Senhor , Deus de seus pais, e serviram às imagens do bosque e aos ídolos; então, veio grande ira sobre Judá e Jerusalém por causa desta sua culpa.
19 जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही.
19 Porém enviou profetas entre eles, para os fazer tornar ao Senhor , os quais protestaram contra eles; mas eles não deram ouvidos.
20 मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्‍याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ”
20 E o Espírito de Deus revestiu a Zacarias, filho do sacerdote Joiada, o qual se pôs em pé acima do povo e lhes disse: Assim diz Deus: Por que transgredis os mandamentos do Senhor ? Portanto, não prosperareis; porque deixastes o Senhor , também ele vos deixará.
21 परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले.
21 E eles conspiraram contra ele e o apedrejaram com pedras, por mandado do rei, no pátio da Casa do Senhor .
22 जखर्‍याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.”
22 Assim, o rei Joás não se lembrou da beneficência que Joiada, pai de Zacarias, lhe fizera; porém matou-lhe o filho, o qual, morrendo, disse: O Senhor o verá e o requererá.
23 वर्षाच्या शेवटी, अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला.
23 E sucedeu, no decurso de um ano, que o exército da Síria subiu contra ele, e vieram a Judá e a Jerusalém, e destruíram dentre o povo a todos os príncipes do povo, e todo o seu despojo enviaram ao rei de Damasco.
24 जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली.
24 Porque, ainda que o exército dos siros viera com poucos homens, contudo, o Senhor deu nas suas mãos um exército de grande multidão, porquanto deixaram ao Senhor , Deus de seus pais. Assim executaram os juízos de Deus contra Joás.
25 जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे.
25 E, retirando-se dele (porque em grandes enfermidades o deixaram), seus servos conspiraram contra ele, por causa do sangue do filho do sacerdote Joiada, e o mataram na sua cama, e morreu; e o sepultaram na Cidade de Davi, porém não o sepultaram nos sepulcros dos reis.
26 ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र.
26 Estes, pois, foram os que conspiraram contra ele: Zabade, filho de Simeate, a amonita, e Jozabade, filho de Sinrite, a moabita.
27 त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.
27 E, quanto a seus filhos, e à grandeza do cargo que se lhe impôs, e ao estabelecimento da Casa de Deus, eis que está escrito no livro da história dos reis. E Amazias, seu filho, reinou em seu lugar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.