2 Crônicas 21
marc (MARC) vs VC
1 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
1 Josafá adormeceu com seus pais e foi sepultado na cidade de Davi. Seu filho Jorão lhe sucedeu no trono.
2 यहोरामचे भाऊ अजर्याह, यहीएल, जखर्याह, अजर्याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते.
2 Jorão tinha irmãos, filhos de Josafá: Azarias, Jaiel, Zacarias, Azaria, Miguel e Safatias, todos filhos de Josafá, rei de Judá.
3 त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता.
3 O pai deles tinha-os dotado consideravelmente de prata, ouro, objetos preciosos, e lhes dera fortalezas em Judá; mas legara o reino a Jorão, porque era o primogênito.
4 जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले.
4 Uma vez consolidado na posse do reino de seu pai, Jorão fez perecer pela espada todos os seus irmãos, assim como alguns chefes de Israel.
5 जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले.
5 Tinha ele trinta e dois anos quando começou a reinar e reinou oito anos em Jerusalém.
6 अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
6 Seguiu as pegadas dos reis de Israel, como havia feito a casa de Acab, cuja filha desposara. Praticou o mal aos olhos do Senhor.
7 तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
7 Contudo, não quis o Senhor destruir a casa de Davi, em vista da aliança feita com Davi e porque lhe tinha prometido deixar uma lâmpada, assim como a seus descendentes.
8 यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.
8 No tempo de Jorão, Edom libertou-se da dominação de Judá, e constituiu um rei para si.
9 मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला.
9 Jorão se pôs a caminho, com seus chefes e seus carros, e no meio da noite bateu os edomitas que cercavam ele e os chefes dos carros.
10 आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे.
10 Contudo, os edomitas ficaram livres da dominação de Judá até o dia de hoje. Pela mesma época, Lobna revoltou-se igualmente, porque Jorão tinha abandonado o Senhor, Deus de seus pais.
11 त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.
11 Jorão estabeleceu também lugares altos nas montanhas de Judá; induziu â idolatria os habitantes de Jerusalém, e arrastou Judá ao mal.
12 यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते:
12 Foi então que lhe trouxeram da parte do profeta Elias uma mensagem concebida nos seguintes termos: Eis o que diz o Senhor, Deus de Davi, teu pai: Porque não andaste nas pegadas de teu pai Josafá, nem nas de Asa, rei de Judá,
13 परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे.
13 mas imitaste os reis de Israel, induziste à idolatria os habitantes de Judá e Jerusalém, como o fez a casa de Acab, e assassinaste teus irmãos, a família de teu pai, que eram melhores do que tu,
14 तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत.
14 o Senhor há de ferir com uma grande praga teu povo, teus filhos, tuas mulheres e todos os teus bens;
15 तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”
15 quanto a ti, hás de contrair no ventre uma grave doença, enfermidade que fará sair de teu corpo as entranhas durante longos dias.
16 याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.
16 O Senhor excitou contra Jorão o ânimo dos filisteus e dos árabes, vizinhos dos etíopes.
17 त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.
17 Eles subiram a Judá, irromperam por toda parte, pilharam todas as riquezas que estavam amontoadas no palácio real e levaram seus filhos com suas mulheres, de modo que só lhe ficou Joacaz, o filho mais novo.
18 हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले.
18 Depois disso, o Senhor feriu-o no ventre com um mal incurável.
19 याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.
19 Isso durou certo tempo e, pelo fim do segundo ano, a violência do mal fez-lhe sair as entranhas. Morreu no meio de violentas dores. Seu povo não queimou perfumes em sua honra como o tinham feito para seu pai.
20 यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही.
20 Sua idade era de trinta e dois anos quando começou a reinar e reinou oito anos em Jerusalém. Morreu sem ser chorado. Sepultaram-no na cidade dê Davi, mas não nos sepulcros reais.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.