2 Crônicas 19

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 जेव्हा यहूदीयाचा राजा यहोशाफाट सुखरुपपणे त्याच्या राजवाड्यात यरुशलेम येथे परत आला,
1 Josafá, rei de Judá, retornou são e salvo a Jerusalém.
2 तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे.
2 Jeú, filho do vidente Hanani, saiu-lhe ao encontro e lhe disse: Deve-se levar auxílio ao ímpio? Amas tu os que odeiam o Senhor? O Senhor está irritado contra ti.
3 कसेही असले तरी, तुमच्यामध्येही काही चांगले आहे, कारण तुम्ही अशेरा खांब देशातून काढून टाकले आहेत आणि परमेश्वराचा शोध घेण्याकडे तुमचे अंतःकरण लावले आहे.”
3 Todavia, há em ti coisas boas, pois suprimiste da terra os ídolos asserás e aplicaste teu coração à busca de Deus.
4 यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले.
4 Depois de sua volta a Jerusalém, Josafá saiu de novo a visitar seu povo, desde Bersabé até a montanha de Efraim, para conduzi-lo ao Senhor, Deus de seus pais.
5 त्याने यहूदीयाच्या प्रत्येक तटबंदीच्या शहरांमध्ये न्यायाधीशांची नेमणूक केली.
5 Estabeleceu juízes na terra, em cada uma das cidades fortes, sem exceção.
6 त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ते नीट विचार करा, कारण तुम्ही केवळ मर्त्यांसाठी न्याय करीत नाही, परंतु याहवेहसाठी निर्णय घेता. जेव्हा तुम्ही जे काही करीत असता तेव्हा ते तुमच्याबरोबर आहेत.
6 Vede o que fareis, disse ele aos juízes. Não é em nome de um homem que administrais a justiça, mas em nome do Senhor, que vos assistirá quando tiverdes de fazer os vossos julgamentos.
7 आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.”
7 Que o temor a Deus esteja conosco. Vigiai o vosso procedimento, pois, junto do Senhor, nosso Deus, não há iniqüidade, nem distinção de pessoa, nem admissão de presentes.
8 यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.
8 Também em Jerusalém, Josafá tinha estabelecido levitas e sacerdotes voltados à cidade para administrar a justiça em nome do Senhor e para serem árbitros nos litígios.
9 त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी.
9 Ele lhes deu as seguintes instruções: Eis como agireis, com temor ao Senhor, lealdade e integridade de coração.
10 शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही.
10 Em todo litígio trazido à vossa presença por vossos irmãos, estabelecidos em vossas cidades, quer se trate de assassínio, de lei, de preceito ou ordenações esclarecei-os, para que não se tornem culpados diante do Senhor, e que sua ira não se inflame contra vós e contra vossos irmãos. Agi dessa maneira para não vos tornardes culpados.
11 “याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्‍याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.”
11 Tendes à vossa frente o sumo sacerdote Amarias, para todos os assuntos religiosos, e Zabadias, filho de Ismael, príncipe da casa de Judá, para todos os negócios civis. Tereis à vossa disposição levitas, na qualidade de escribas. Cobrai ânimo, portanto, e ao trabalho! Esteja o Senhor com o homem de bem!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.