2 Crônicas 16
marc (MARC) vs ARA
1 आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.
1 No trigésimo sexto ano do reinado de Asa, subiu Baasa, rei de Israel, contra Judá e edificou a Ramá, para que a ninguém fosse permitido sair de junto de Asa, rei de Judá, nem chegar a ele.
2 त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.
2 Então, Asa tomou prata e ouro dos tesouros da Casa do Senhor e dos tesouros da casa do rei e enviou servos a Ben-Hadade, rei da Síria, que habitava em Damasco, dizendo:
3 आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
3 Haja aliança entre mim e ti, como houve entre meu pai e teu pai. Eis que te mando prata e ouro; vai e anula a tua aliança com Baasa, rei de Israel, para que se retire de mim.
4 बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली.
4 Ben-Hadade deu ouvidos ao rei Asa e enviou os capitães dos seus exércitos contra as cidades de Israel; e feriu a Ijom, a Dã, a Abel-Maim e todas as cidades-armazéns de Naftali.
5 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले.
5 Ouvindo isso Baasa, deixou de edificar a Ramá e não continuou a sua obra.
6 नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
6 Então, o rei Asa tomou todo o Judá, e trouxeram as pedras de Ramá e a sua madeira com que Baasa a edificara; com elas edificou Asa a Geba e a Mispa.
7 त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.
7 Naquele tempo, veio Hanani a Asa, rei de Judá, e lhe disse: Porquanto confiaste no rei da Síria e não confiaste no Senhor , teu Deus, o exército do rei da Síria escapou das tuas mãos.
8 कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले.
8 Acaso, não foram os etíopes e os líbios grande exército, com muitíssimos carros e cavaleiros? Porém, tendo tu confiado no Senhor , ele os entregou nas tuas mãos.
9 कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”
9 Porque, quanto ao Senhor , seus olhos passam por toda a terra, para mostrar-se forte para com aqueles cujo coração é totalmente dele; nisto procedeste loucamente; por isso, desde agora, haverá guerras contra ti.
10 यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.
10 Porém Asa se indignou contra o vidente e o lançou no cárcere, no tronco, porque se enfurecera contra ele por causa disso; na mesma ocasião, oprimiu Asa alguns do povo.
11 आसाच्या कारकिर्दीच्या घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.
11 Eis que os mais atos de Asa, tanto os primeiros como os últimos, estão escritos no Livro da História dos Reis de Judá e Israel.
12 त्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी आसा पायाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याचा आजार गंभीर स्वरुपाचा होता, तरी त्या आजारपणातही त्याने याहवेहकडून मदत घेतली नाही, परंतु फक्त वैद्यांचीच मदत घेतली.
12 No trigésimo nono ano do seu reinado, caiu Asa doente dos pés; a sua doença era em extremo grave; contudo, na sua enfermidade não recorreu ao Senhor , mas confiou nos médicos.
13 नंतर आसा त्याच्या कारकिर्दीच्या एकेचाळीसाव्या वर्षी मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला.
13 Descansou Asa com seus pais; morreu no quadragésimo primeiro ano do seu reinado.
14 त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.
14 Sepultaram-no no sepulcro que mandara abrir para si na Cidade de Davi; puseram-no sobre um leito, que se enchera de perfumes e de várias especiarias, preparados segundo a arte dos perfumistas. Foi mui grande a queima que lhe fizeram destas coisas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.