2 Coríntios 8
marc (MARC) vs ARA
1 आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.
1 Também, irmãos, vos fazemos conhecer a graça de Deus concedida às igrejas da Macedônia;
2 अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली.
2 porque, no meio de muita prova de tribulação, manifestaram abundância de alegria, e a profunda pobreza deles superabundou em grande riqueza da sua generosidade.
3 त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.
3 Porque eles, testemunho eu, na medida de suas posses e mesmo acima delas, se mostraram voluntários,
4 प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.
4 pedindo-nos, com muitos rogos, a graça de participarem da assistência aos santos.
5 आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.
5 E não somente fizeram como nós esperávamos, mas também deram-se a si mesmos primeiro ao Senhor, depois a nós, pela vontade de Deus;
6 म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.
6 o que nos levou a recomendar a Tito que, como começou, assim também complete esta graça entre vós.
7 तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.
7 Como, porém, em tudo, manifestais superabundância, tanto na fé e na palavra como no saber, e em todo cuidado, e em nosso amor para convosco, assim também abundeis nesta graça.
8 याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे.
8 Não vos falo na forma de mandamento, mas para provar, pela diligência de outros, a sinceridade do vosso amor;
9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
9 pois conheceis a graça de nosso Senhor Jesus Cristo, que, sendo rico, se fez pobre por amor de vós, para que, pela sua pobreza, vos tornásseis ricos.
10 या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता.
10 E nisto dou minha opinião; pois a vós outros, que, desde o ano passado, principiastes não só a prática, mas também o querer, convém isto.
11 मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा.
11 Completai, agora, a obra começada, para que, assim como revelastes prontidão no querer, assim a leveis a termo, segundo as vossas posses.
12 जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.
12 Porque, se há boa vontade, será aceita conforme o que o homem tem e não segundo o que ele não tem.
13 आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते.
13 Porque não é para que os outros tenham alívio, e vós, sobrecarga; mas para que haja igualdade,
14 या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे.
14 suprindo a vossa abundância, no presente, a falta daqueles, de modo que a abundância daqueles venha a suprir a vossa falta, e, assim, haja igualdade,
15 याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”
15 como está escrito: O que muito colheu não teve demais; e o que pouco, não teve falta.
16 जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.
16 Mas graças a Deus, que pôs no coração de Tito a mesma solicitude por amor de vós;
17 त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे.
17 porque atendeu ao nosso apelo e, mostrando-se mais cuidadoso, partiu voluntariamente para vós outros.
18 शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे.
18 E, com ele, enviamos o irmão cujo louvor no evangelho está espalhado por todas as igrejas.
19 खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल.
19 E não só isto, mas foi também eleito pelas igrejas para ser nosso companheiro no desempenho desta graça ministrada por nós, para a glória do próprio Senhor e para mostrar a nossa boa vontade;
20 कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत.
20 evitando, assim, que alguém nos acuse em face desta generosa dádiva administrada por nós;
21 फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.
21 pois o que nos preocupa é procedermos honestamente, não só perante o Senhor, como também diante dos homens.
22 मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे.
22 Com eles, enviamos nosso irmão cujo zelo, em muitas ocasiões e de muitos modos, temos experimentado; agora, porém, se mostra ainda mais zeloso pela muita confiança em vós.
23 तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.
23 Quanto a Tito, é meu companheiro e cooperador convosco; quanto a nossos irmãos, são mensageiros das igrejas e glória de Cristo.
24 कृपा करून ती प्रीती या बंधुंवरही करा आणि तुम्ही ते सर्व त्यांच्यासाठी कराल असे मी अभिमानाने व जाहीरपणे म्हटले आहे. ते सर्व मंडळ्यांनी पाहावे.
24 Manifestai, pois, perante as igrejas, a prova do vosso amor e da nossa exultação a vosso respeito na presença destes homens.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Coríntios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.