2 Coríntios 5

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे.
1 Sabemos, com efeito, que ao se desfazer a tenda que habitamos neste mundo, recebemos uma casa preparada por Deus e não por mãos humanas, uma habitação eterna no céu.
2 या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत.
2 E por isto suspiramos e anelamos ser sobrevestidos da nossa habitação celeste,
3 कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही.
3 contanto que sejamos achados vestidos e não despidos.
4 या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे.
4 Pois, enquanto permanecemos nesta tenda, gememos oprimidos: desejamos ser não despojados, mas revestidos com uma veste nova por cima da outra, de modo que o que há de mortal em nós seja absorvido pela vida.
5 ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे.
5 Aquele que nos formou para este destino é Deus mesmo, que nos deu por penhor o seu Espírito.
6 यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर असतो.
6 Por isso, estamos sempre cheios de confiança. Sabemos que todo o tempo que passamos no corpo é um exílio longe do Senhor.
7 आम्ही विश्वासाने जगतो, प्रत्यक्ष पाहण्याने नव्हे.
7 Andamos na fé e não na visão.
8 आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.
8 Estamos, repito, cheios de confiança, preferindo ausentar-nos deste corpo para ir habitar junto do Senhor.
9 तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभूंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे.
9 É também por isso que, vivos ou mortos, nos esforçamos por agradar-lhe.
10 कारण आपल्या सर्वांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. या शरीरामध्ये असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या अथवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांचे आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य ते प्रतिफळ मिळेल.
10 Porque teremos de comparecer diante do tribunal de Cristo. Ali cada um receberá o que mereceu, conforme o bem ou o mal que tiver feito enquanto estava no corpo.
11 प्रभूची भीती बाळगणे हे काय आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळेच इतरांना वळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो! आम्ही कोण आहोत हे परमेश्वरापुढे स्पष्ट आहे आणि मी आशा धरतो की, तुमच्या विवेकबुद्धीनेही तुम्ही हे निश्चित जाणता.
11 Compenetrados do temor do Senhor, procuramos persuadir os homens. Estamos a descoberto aos olhos de Deus, e espero que o estejamos também ante as vossas consciências.
12 पुन्हा स्वतःचीच प्रशंसा करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. तर तुम्हाला आमच्यासाठी अभिमान बाळगण्याची संधी देत आहोत, यासाठी की जे हृदयातील गोष्टींचा नव्हे तर बाह्य गोष्टींचा अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे.
12 Não estamos a gabar-nos ante os vossos olhos, mas damo-vos ocasião de vos gloriardes por nossa causa. Tereis assim o que responder àqueles que se prevalecem das aparências e não do que há no coração.
13 जर “आम्ही वेडे असलो,” जसे काही लोक म्हणतात तर ते परमेश्वरासाठी आहोत. जर आम्ही भानावर असलो, तर ते तुमच्यासाठी आहोत.
13 De fato, se ficamos arrebatados fora dos sentidos, é por Deus; e se raciocinamos sobriamente, é por vós.
14 ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत.
14 O amor de Cristo nos constrange, considerando que, se um só morreu por todos, logo todos morreram.
15 ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.
15 Sim, ele morreu por todos, a fim de que os que vivem já não vivam para si, mas para aquele que por eles morreu e ressurgiu.
16 येथून पुढे ऐहिक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही.
16 Por isso, nós daqui em diante a ninguém conhecemos de um modo humano. Muito embora tenhamos considerado Cristo dessa maneira, agora já não o julgamos assim.
17 जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.
17 Todo aquele que está em Cristo é uma nova criatura. Passou o que era velho; eis que tudo se fez novo!
18 हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे.
18 Tudo isso vem de Deus, que nos reconciliou consigo, por Cristo, e nos confiou o ministério desta reconciliação.
19 परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे.
19 Porque é Deus que, em Cristo, reconciliava consigo o mundo, não levando mais em conta os pecados dos homens, e pôs em nossos lábios a mensagem da reconciliação.
20 आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.
20 Portanto, desempenhamos o encargo de embaixadores em nome de Cristo, e é Deus mesmo que exorta por nosso intermédio. Em nome de Cristo vos rogamos: reconciliai-vos com Deus!
21 ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.
21 Aquele que não conheceu o pecado, Deus o fez pecado por nós, para que nele nós nos tornássemos justiça de Deus.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Coríntios 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.