2 Coríntios 2
marc (MARC) vs ARIB
1 मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही.
1 Mas deliberei isto comigo mesmo: não ir mais ter convosco em tristeza.
2 कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल?
2 Porque, se eu vos entristeço, quem é, pois, o que me alegra, senão aquele que por mim é entristecido?
3 मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल.
3 E escrevi isto mesmo, para que, chegando, eu não tenha tristeza da parte dos que deveriam alegrar-me; confiando em vós todos, que a minha alegria é a de todos vós.
4 तुम्हाला दुःखी करावे म्हणून नव्हे तर माझ्या प्रीतीची खोली तुम्हाला कळावी, म्हणून हे पत्र मी तुम्हाला क्लेश आणि हृदयाच्या यातना आणि अनेक आसवे गाळून लिहिले आहे.
4 Porque em muita tribulação e angústia de coração vos escrevi, com muitas lágrimas, não para que vos entristecêsseis, mas para que conhecêsseis o amor que abundantemente vos tenho.
5 जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही.
5 Ora, se alguém tem causado tristeza, não me tem contristado a mim, mas em parte {para não ser por demais severo} a todos vós.
6 तुम्ही सार्यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे.
6 Basta a esse tal esta repreensão feita pela maioria.
7 याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे.
7 De maneira que, pelo contrário, deveis antes perdoar-lhe e consolá-lo, para que ele não seja devorado por excessiva tristeza.
8 आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.
8 Pelo que vos rogo que confirmeis para com ele o vosso amor.
9 हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे.
9 É pois para isso também que escrevi, para, por esta prova, saber se sois obedientes em tudo.
10 तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे.
10 E a quem perdoardes alguma coisa, também eu; pois, o que eu também perdoei, se é que alguma coisa tenho perdoado, por causa de vós o fiz na presença de Cristo, para que Satanás não leve vantagem sobre nós;
11 यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही.
11 porque não ignoramos as suas maquinações.
12 मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले.
12 Ora, quando cheguei a Trôade para pregar o evangelho de Cristo, e quando se me abriu uma porta no Senhor,
13 परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.
13 não tive descanso no meu espírito, porque não achei ali irmão Tito; mas, despedindo-me deles, parti para a Macedônia.
14 परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.
14 Graças, porém, a Deus que em Cristo sempre nos conduz em triunfo, e por meio de nós difunde em todo lugar o cheiro do seu conhecimento;
15 ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत
15 porque para Deus somos um aroma de Cristo, nos que se salvam e nos que se perdem.
16 एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे?
16 Para uns, na verdade, cheiro de morte para morte; mas para outros cheiro de vida para vida. E para estas coisas quem é idôneo?
17 आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.
17 Porque nós não somos falsificadores da palavra de Deus, como tantos outros; mas é com sinceridade, é da parte de Deus e na presença do próprio Deus que, em Cristo, falamos.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Coríntios 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.