1 Samuel 9

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफियाचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता.
1 Havia um homem de Benjamim, chamado Cis, filho de Abiel, filho de Seror, filho de Becorat, filho de Afia, de família benjaminita, que era um homem valente.
2 कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता.
2 Tinha um filho chamado Saul, que era jovem e belo. Não havia em Israel outro mais belo do que ele; dos ombros para cima sobressaía a todo o povo.
3 शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.”
3 Tendo-se perdido as jumentas de Cis, pai de Saul, disse aquele ao seu filho: Toma um servo contigo e vai procurar as jumentas.
4 तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत.
4 Saul atravessou a montanha de Efraim e entrou na terra de Salisa, sem nada encontrar; percorreu a terra de Salim, mas em vão. Na terra de Benjamim não as encontrou tampouco.
5 जेव्हा ते सूफ प्रांतात पोहोचले, तेव्हा शौल त्याच्याबरोबर असलेल्या सेवकाला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ या, नाहीतर माझा पिता गाढवांचा विचार करण्याचे सोडून आपलीच काळजी करू लागेल.”
5 Tendo chegado à terra de Suf, Saul disse ao seu servo: Vem, voltemos. Meu pai poderia não mais pensar nas jumentas e ficar com cuidados por nós.
6 परंतु सेवक म्हणाला, “पाहा, या शहरात परमेश्वराचा एक मनुष्य आहे; तो फार सन्माननीय आहे आणि जे काही तो सांगतो ते खरे होते. तर चल, आपण तिकडे जाऊ. कदाचित आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो आपल्याला सांगेल.”
6 Nesta cidade, disse-lhe o servo, há um homem de Deus, varão muito considerado; tudo o que ele prediz se cumpre. Vamos lá; talvez ele nos mostrará o caminho que devemos tomar.
7 शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?”
7 Saul respondeu: Está bem, vamos; mas o que havemos de oferecer-lhe? Nossos alforjes estão vazios, e não temos presente algum para dar ao homem de Deus. O que nos resta?
8 तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.”
8 Tenho aqui um quarto de siclo de prata, respondeu o servo; dá-lo-ei ao homem de Deus para que ele nos mostre o caminho.
9 त्याकाळी इस्राएलमध्ये जर कोणी परमेश्वराविषयी चौकशी करण्यास गेला तर ते म्हणत असत, “चला, आपण पाहणार्‍याकडे जाऊ,” कारण आज ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पाहणारा असे संबोधले जाई.
9 {Antigamente, em Israel, todo o que ia consultar a Deus, dizia: Vinde, vamos ao vidente. Chamava-se então vidente ao que hoje se chama profeta.}
10 “ठीक आहे,” शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “चल, जाऊ या.” असे म्हणत ज्या नगरात परमेश्वराचा मनुष्य राहत होता त्याकडे ते निघाले.
10 Saul disse ao seu servo: Tens razão. Anda, vamos E foram à cidade onde estava o homem de Deus.
11 जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?”
11 Subindo eles a encosta da cidade, encontraram umas moças que saíam a buscar água. Há um vidente aqui?, perguntaram-lhes.
12 “होय तो आहे,” त्यांनी उत्तर दिले. “तो तुमच्यापुढेच जात आहे. आता घाई करा; तो आजच आमच्या गावात आला आहे, कारण लोक उच्च स्थानावर यज्ञ करणार आहेत.
12 Sim, responderam elas; ali diante de ti. Apressa-te; ele veio hoje à cidade, porque o povo oferece um sacrifício no lugar alto.
13 तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.”
13 Ao entrar na cidade, encontrá-lo-eis seguramente antes que suba ao lugar alto para o festim. O povo não comerá antes que ele chegue, pois ele deverá abençoar o sacrifício; os convidados só comerão depois. Subi, pois; hoje o encontrareis.
14 ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते.
14 Subiram à cidade. No momento em que entravam, encontraram Samuel que saía para subir ao lugar alto.
15 शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:
15 Ora, na véspera da chegada de Saul, o Senhor tinha revelado a Samuel:
16 “याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”
16 Amanhã, e esta mesma hora, mandar-te-ei um homem da terra de Benjamim, e tu o ungirás para chefe do meu povo de Israel, para que ele livre o povo das mãos dos filisteus. Porque voltei os meus olhos para o meu povo, e o seu clamor chegou até a mim.
17 जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”
17 Quando Samuel viu Saul, Deus disse-lhe: Eis o homem de quem te falei: este reinará sobre o meu povo.
18 शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?”
18 Saul aproximou-se de Samuel à porta da cidade e disse-lhe: Rogo-te que me digas onde é a casa do vidente.
19 “मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन.
19 Sou eu mesmo o vidente, respondeu Samuel; sobe na minha frente ao lugar alto; comereis hoje comigo. Amanhã te deixarei partir, depois de ter revelado a ti tudo o que tens no coração.
20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?”
20 Quanto às jumentas perdidas há dois ou três dias, não te inquietes por isso, porque já foram encontradas. E de quem será toda a beleza de Israel? Não é porventura tua e de toda a casa de teu pai?
21 शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?”
21 Saul respondeu: Eu sou um benjaminita, filho da menor tribo de Israel; e minha família é a menor de todas as famílias de Benjamim. Por que, pois, me falas assim?
22 नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले.
22 Samuel, tomando Saul e o seu servo, levou-os para a sala do festim e deu-lhes o primeiro lugar entre os convidados, que eram em número de aproximadamente trinta pessoas.
23 शमुवेल आचार्‍याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.”
23 Samuel disse ao cozinheiro: Serve a porção que te dei e que te mandei pôr à parte.
24 तेव्हा आचार्‍याने मांडीचा भाग आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले.
24 Tomou, pois, o cozinheiro a espádua com o que nela havia e a serviu a Saul. Samuel disse: Eis diante de ti a porção que te foi reservada. Come-a; reservei-a para este momento quando convidei o povo. Saul e Samuel comeram juntos naquele dia.
25 उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला.
25 Do lugar alto desceram para a cidade e prepararam uma cama para Saul no terraço
26 पहाटेच ते उठले आणि शमुवेलने शौलाला धाब्यावर बोलाविले, “तयार हो, म्हणजे मी तुला तुझ्या मार्गाने पाठवेन.” जेव्हा शौल तयार झाला, तो आणि शमुवेल एकत्र बाहेर पडले.
26 e ele foi dormir. No dia seguinte, ao romper da aurora, Samuel chamou Saul ao terraço e disse-lhe: Levanta-te, e deixar-te-ei partir. Saul levantou-se e saíram os dois juntos.
27 नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, “सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे.” आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; “परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन.”
27 Quando chegaram aos limites da cidade, Samuel disse a Saul: Dize ao teu servo que passe e vá adiante de nós, e o servo passou adiante; mas tu detém-te aqui para que eu te comunique uma palavra de Deus.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.