1 Samuel 8
marc (MARC) vs NVT
1 जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी म्हणून नेमले.
1 Quando Samuel ficou idoso, nomeou seus filhos para serem juízes sobre Israel.
2 त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली.
2 Joel, seu filho mais velho, e Abias, o segundo mais velho, julgavam em Berseba,
3 परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत.
3 mas não eram como seu pai. Eram gananciosos, aceitavam subornos e pervertiam a justiça.
4 म्हणून इस्राएलचे सर्व पुढारी एकत्र झाले आणि रामाह येथे शमुवेलकडे आले.
4 Por fim, as autoridades de Israel se reuniram em Ramá para discutir essa questão com Samuel.
5 ते शमुवेलला म्हणाले, “तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत; तर आता जसे इतर राष्ट्रांना आहे त्याप्रमाणे आमचेही नेतृत्व करण्यासाठी एक राजा नेमून द्यावा.”
5 Eles disseram: “Olhe, o senhor está idoso e seus filhos não seguem seu exemplo. Escolha um rei para nos julgar, como ocorre com todas as outras nações”.
6 परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.
6 Samuel não gostou de que lhe tivessem pedido um rei e buscou a orientação do S enhor .
7 तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे.
7 O S enhor lhe respondeu: “Faça tudo que eles pedem, pois é a mim que rejeitam, e não a você. Eles me rejeitaram como seu rei.
8 मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत.
8 Desde que os tirei do Egito até hoje, eles têm me abandonado e seguido outros deuses. Agora, tratam você da mesma forma.
9 आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.”
9 Faça o que eles pedem, mas advirta-os solenemente a respeito de como o rei os governará”.
10 शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते.
10 Então Samuel transmitiu a advertência do S enhor ao povo que lhe pedia um rei.
11 शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.
11 Disse ele: “Este é o modo como o rei governará sobre vocês. Ele convocará seus filhos para servi-lo em seus carros de guerra e como seus cavaleiros e os fará correr à frente dos carros dele.
12 त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील.
12 Colocará alguns como generais e capitães de seu exército, obrigará outros a arar seus campos e a fazer as colheitas e forçará outros mais a fabricar armas e equipamentos para os carros de guerra.
13 तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.
13 Tomará suas filhas e as obrigará a cozinhar, assar pães e fazer perfumes para ele.
14 तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.
14 Tomará de vocês o melhor de seus campos, vinhedos e olivais e os dará aos servos dele.
15 तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल.
15 Tomará um décimo de sua colheita de cereais e uvas para distribuir entre seus oficiais e servos.
16 तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.
16 Tomará seus escravos e escravas e o melhor do gado e dos jumentos para uso próprio.
17 तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.
17 Exigirá um décimo de seus rebanhos, e vocês se tornarão escravos dele.
18 जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.”
18 Quando esse dia chegar, lamentarão por causa desse rei que agora pedem, mas o S enhor não lhes dará ouvidos”.
19 परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच.
19 Mas o povo se recusou a ouvir a advertência de Samuel. “Mesmo assim, queremos um rei”, disseram.
20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.”
20 “Queremos ser como todas as nações ao nosso redor. Nosso rei nos julgará e nos conduzirá nas batalhas.”
21 लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्याने याहवेहला सांगितले.
21 Samuel repetiu para o S enhor aquilo que o povo tinha dito,
22 याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.”
22 e o S enhor lhe respondeu: “Faça o que eles pedem e dê-lhes um rei”. Então Samuel ordenou aos israelitas que voltassem cada um para sua cidade.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.