1 Samuel 6

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता,
1 A arca do Senhor esteve sete meses na terra dos filisteus.
2 तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्‍यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.”
2 Estes chamaram os sacerdotes e os adivinhos e perguntaram: — Que faremos com a arca do
3 ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.”
3 Eles responderam: — Se devolverem a arca do Deus de Israel, não a mandem vazia, mas enviem também a ele uma oferta pela culpa. Então vocês serão curados e saberão por que a mão dele continua pesando sobre vocês.
4 पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?”
4 Então os filisteus perguntaram: — Que oferta pela culpa devemos mandar? Os sacerdotes e adivinhos responderam: — Mandem cinco tumores de ouro e cinco ratos de ouro, segundo o número dos governantes dos filisteus, porque a praga é uma e a mesma sobre todos vocês e sobre todos os seus governantes.
5 ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील.
5 Façam imitações dos tumores e dos ratos que andam destruindo a terra, e deem glória ao Deus de Israel. Assim ele talvez alivie a sua mão de cima de vocês e do deus e da terra de vocês.
6 फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का?
6 Por que vocês endureceriam o coração, como os egípcios e Faraó fizeram? Não é verdade que, depois que Deus os maltratou, eles deixaram os israelitas sair, e eles foram embora?
7 “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा.
7 — Agora, pois, façam um carro novo, arranjem duas vacas com crias, sobre as quais nunca foi colocado jugo, e amarrem as duas ao carro; quanto aos bezerros, levem-nos para casa.
8 याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,
8 Então peguem a arca do Senhor e a ponham sobre o carro. E num cofre, ao lado dele, ponham as figuras de ouro que vocês vão lhe enviar como oferta pela culpa; depois, deixem o carro ir.
9 परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”
9 Fiquem observando: se ele subir pelo caminho de Bete-Semes, que leva a seu território, então foi o Deus de Israel que nos fez este grande mal. Mas, se não, saberemos que não foi a sua mão que nos atingiu, e que isso nos aconteceu por acaso.
10 तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले.
10 Os homens fizeram isso: pegaram duas vacas com crias e as amarraram ao carro; e encerraram os seus bezerros em casa.
11 त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या.
11 Puseram a arca do Senhor sobre o carro, junto com o cofre que continha os ratos de ouro e as imitações dos tumores.
12 तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
12 As vacas se encaminharam diretamente para Bete-Semes e, andando e berrando, seguiam sempre por esse mesmo caminho, sem se desviarem nem para a direita nem para a esquerda. Os governantes dos filisteus foram atrás delas, até a fronteira com Bete-Semes.
13 यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.
13 O povo de Bete-Semes andava fazendo a colheita do trigo no vale. Quando levantaram os olhos, viram a arca e ficaram muito contentes.
14 ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.
14 O carro veio até o campo de Josué, o bete-semita, e parou ali, onde havia uma grande pedra. Eles cortaram a madeira do carro em pedaços e ofereceram as vacas ao Senhor , em holocausto.
15 लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.
15 Os levitas desceram a arca do Senhor e também o cofre que estava junto a ela, em que estavam os objetos de ouro, e os puseram sobre a grande pedra. No mesmo dia, os homens de Bete-Semes ofereceram holocaustos e sacrifícios ao Senhor .
16 पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.
16 Os cinco governantes dos filisteus viram aquilo e voltaram para Ecrom no mesmo dia.
17 पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.
17 Estes são os tumores de ouro que os filisteus enviaram ao Senhor como oferta pela culpa: um por Asdode; outro por Gaza; outro por Asquelom; outro por Gate; e outro por Ecrom.
18 आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
18 Enviaram também os ratos de ouro, segundo o número de todas as cidades dos filisteus, pertencentes aos cinco governantes, desde as cidades fortificadas até as aldeias campestres. A grande pedra, sobre a qual puseram a arca do Senhor , está até o dia de hoje no campo de Josué, o bete-semita.
19 परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.
19 O Senhor feriu os homens de Bete-Semes, porque olharam para dentro da arca do Senhor , matando setenta deles. Então o povo chorou, porque o Senhor tinha feito tão grande matança entre eles.
20 आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”
20 Os homens de Bete-Semes disseram: — Quem poderia estar diante do
21 तेव्हा त्यांनी किर्याथ-यआरीमच्या लोकांकडे हा संदेश देत दूत पाठविले, “पलिष्ट्यांनी याहवेहचा कोश परत केला आहे. इकडे या आणि तो तुमच्या नगराकडे घेऊन जा.”
21 Então enviaram mensageiros aos moradores de Quiriate-Jearim, dizendo: — Os filisteus devolveram a arca do

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.