1 Samuel 30

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,
1 Quando Davi e seus soldados chegaram a Ziclague, no terceiro dia, os amalequitas tinham atacado o Neguebe e Ziclague, e haviam incendiado a cidade.
2 आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.
2 Levaram como prisioneiros todos os que lá estavam: as mulheres, os jovens e os idosos. A ninguém mataram, mas os levaram consigo, quando prosseguiram seu caminho.
3 जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत.
3 Ao chegarem a Ziclague, Davi e seus soldados encontraram a cidade destruída pelo fogo e viram que suas mulheres, filhos e filhas haviam sido levados como prisioneiros.
4 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही.
4 Então Davi e seus soldados choraram em alta voz até não terem mais forças.
5 दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.
5 As duas mulheres de Davi também tinham sido levadas: Ainoã de Jezreel, e Abigail de Carmelo, a que fora mulher de Nabal.
6 दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.
6 Davi ficou profundamente angustiado, pois os homens falavam em apedrejá-lo; todos estavam amargurados por causa de seus filhos e suas filhas. Davi, porém, fortaleceu-se no Senhor seu Deus.
7 तेव्हा दावीद अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले,
7 Então Davi disse ao sacerdote Abiatar, filho de Aimeleque: "Traga-me o colete sacerdotal". Abiatar o trouxe a Davi,
8 आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?”
8 e ele perguntou ao Senhor: "Devo perseguir este bando de invasores? Irei alcançá-los? " E o Senhor respondeu: "Persiga-os; é certo que você os alcançará e conseguirá libertar os prisioneiros".
9 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.
9 Davi e os seiscentos homens que estavam com ele foram ao ribeiro de Besor, onde ficaram alguns,
10 त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.
10 pois duzentos deles estavam exaustos demais para atravessar o ribeiro. Todavia, Davi e quatrocentos homens continuaram a perseguição.
11 रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली;
11 Encontraram um egípcio no campo e o trouxeram a Davi. Deram-lhe água e comida:
12 त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते.
12 um pedaço de bolo de figos prensados e dois bolos de uvas passas. Ele comeu e recobrou as forças, pois tinha ficado três dias e três noites sem comer e sem beber.
13 दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?”
13 Davi lhe perguntou: "A quem você pertence e de onde vem? " Ele respondeu: "Sou um jovem egípcio, servo de um amalequita. Meu senhor me abandonou quando fiquei doente há três dias.
14 आम्ही नेगेवातील करेथी प्रांत, यहूदीयाचा काही प्रांत आणि कालेबाचा नेगेव यावर छापा टाकला आणि सिकलाग जाळून टाकले.”
14 Nós atacamos o Neguebe dos queretitas, o território que pertence a Judá e o Neguebe de Calebe. E incendiamos a cidade de Ziclague".
15 दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?”
15 Davi lhe perguntou: "Você pode levar-me até esse bando de invasores? " Ele respondeu: "Jura, diante de Deus, que não me matarás nem me entregarás nas mãos de meu senhor, e te levarei até eles".
16 मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती.
16 Quando ele levou Davi até lá, eles estavam espalhados pela região, comendo, bebendo e festejando os muitos bens que haviam tomado da terra dos filisteus e de Judá.
17 दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही.
17 Davi os atacou no dia seguinte, desde o amanhecer até à tarde, e nenhum deles escapou, com a exceção de quatrocentos jovens que montaram em camelos e fugiram.
18 दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले.
18 Davi recuperou tudo o que os amalequitas tinham levado, incluindo suas duas mulheres.
19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले.
19 Nada faltou; nem jovens, nem velhos, nem filhos, nem filhas, nem bens nem qualquer outra coisa que fora levada. Davi recuperou tudo.
20 त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
20 E tomou também todos os rebanhos dos amalequitas, e seus soldados os conduziram à frente dos outros animais, dizendo: "Estes são os despojos de Davi".
21 नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्‍याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले.
21 Então Davi foi até os duzentos homens que estavam exaustos demais para segui-lo e tinham ficado no ribeiro de Besor. Eles saíram para encontrar Davi e os que estavam com ele. Ao se aproximar com seus soldados, Davi os saudou.
22 परंतु दावीदाचे काही दुष्ट व त्रासदायक अनुयायी म्हणाले, “हे लोक आपल्याबरोबर आले नाही, म्हणून आपण सोडवून आणलेल्या लुटीतील वाटा त्यांना आम्ही देणार नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या स्त्रिया व लेकरे घेऊन निघून जावे.”
22 Mas todos os maus e vadios que tinham ido com Davi disseram: "Uma vez que não saíram conosco, não repartiremos com eles os bens que recuperamos. No entanto, cada um poderá pegar sua mulher e seus filhos e partir".
23 तेव्हा दावीद म्हणाला, “नाही, माझ्या बंधूंनो! याहवेहने आपणास जे काही दिले आहे त्याचे आम्ही असे करू नये. याहवेहने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे आणि छापा टाकलेली टोळी, आमचे शत्रू जे आमच्या विरोधात उठले त्यांना याहवेहने आमच्या हाती दिले.
23 Davi respondeu: "Não, meus irmãos! Não façam isso com o que o Senhor nos deu. Ele nos protegeu e entregou em nossas mãos as forças que vieram contra nós.
24 याबाबत तुमचे कोण ऐकणार? जो मनुष्य सामानाजवळ राहतो त्याचा वाटा तेवढाच असणार जेवढा लढाईवर गेलेल्या व्यक्तीचा असणार. सर्वांना सारखाच वाटा मिळणार.”
24 Quem concordará com o que vocês estão dizendo? A parte de quem ficou com a bagagem será a mesma de quem foi à batalha. Todos receberão partes iguais".
25 तेव्हापासून आजपर्यंत दावीदाने हा नियम व विधी सर्व इस्राएली लोकांस लावून दिला.
25 Davi fez disso um decreto e uma ordenança para Israel, desde aquele dia até hoje.
26 दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.”
26 Quando Davi chegou a Ziclague, enviou parte dos bens às autoridades de Judá, que eram seus amigos, dizendo: "Eis um presente para vocês, tirado dos bens dos inimigos do Senhor".
27 बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना;
27 Ele enviou esse presente às autoridades de Betel, de Ramote do Neguebe, de Jatir,
28 आणि अरोएर, सिपमोथ, एशतमोआ येथील लोकांना
28 de Aroer, de Sifmote, de Estemoa,
29 व राकाल, यरहमेल व केनी नगरातील लोकांना;
29 de Racal, das cidades dos jerameelitas e dos queneus,
30 होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना
30 e de Hormá, de Corasã, de Atace,
31 आणि हेब्रोन व इतर ठिकाणी जिथे तो व त्याची माणसे फिरत असे तेथील लोकांना दावीदाने त्या भेटी पाठविल्या.
31 de Hebrom e de todos os lugares onde Davi e seus soldados tinham passado.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.