1 Samuel 25

marc (MARC) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 शमुवेल मरण पावला, तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्याच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्याला रामाह येथील त्याच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.
1 Samuel morreu, e todos os israelitas se juntaram e choraram a morte dele. Então o sepultaram na sua casa, em Ramá. Depois disso Davi saiu e foi para o deserto de Parã. Nabal estava em Carmelo, cortando a lã das suas ovelhas.
2 माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता.
2 — ausente —
3 त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.
3 — ausente —
4 आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.
4 Davi estava no deserto e soube disso.
5 तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा.
5 Então enviou dez rapazes a Carmelo, com ordem de encontrarem Nabal e o cumprimentarem em nome dele.
6 त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!
6 Mandou que dissessem o seguinte: “Meu caro amigo, Davi lhe manda saudações, desejando tudo de bom para o senhor, a sua família e tudo o que é seu.
7 “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.
7 Ele soube que o senhor está cortando a lã das suas ovelhas e mandou lhe contar que os seus pastores estiveram com a gente, e nós não lhes fizemos nenhum mal. Durante o tempo em que estiveram em Carmelo, não roubamos nada do que era deles.
8 आपल्या चाकरांना ते विचार आणि ते तुला सांगतील. म्हणून आता माझ्या माणसांवर कृपादृष्टी कर, कारण आम्ही सणाच्या वेळेस आलो आहोत, तर कृपा करून जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सेवकांना आणि तुझा पुत्र दावीद यांना दे.’ ”
8 Pergunte, e eles lhe contarão. Davi pede para o senhor nos receber com amizade porque viemos aqui num dia de festa. Assim, por favor, dê o que puder a nós, os seus criados, e ao seu querido amigo Davi.”
9 जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.
9 Os homens de Davi foram e deram o recado a Nabal, em nome de Davi. Então ficaram esperando,
10 नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत.
10 e Nabal respondeu: — Davi? Filho de Jessé? Quem é ele? Nunca ouvi falar nele! Hoje em dia há muitos escravos que fogem dos seus donos!
11 जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”
11 O meu pão, a minha água e os animais que matei para dar aos meus empregados eu não darei a homens que eu nem sei de onde vieram!
12 तेव्हा दावीदाची माणसे परत त्यांच्या वाटेने गेली. आणि पोहोचल्यावर प्रत्येक शब्दाचा अहवाल दावीदाला दिला.
12 Os homens de Davi voltaram e contaram o que Nabal tinha dito.
13 तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.
13 Então Davi disse: — Ponham as suas espadas nos cintos! E todos obedeceram. Davi também pegou a sua espada e saiu com mais ou menos quatrocentos dos seus homens enquanto duzentos ficaram atrás com a bagagem.
14 चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्यांनी त्यांचा अपमान केला.
14 Um dos empregados de Nabal disse a Abigail, a mulher de Nabal: — A senhora soube? Davi enviou do deserto uns mensageiros com saudações para o nosso patrão, mas ele os tratou mal.
15 तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही.
15 No entanto, eles têm sido muito bons para a gente: nunca nos incomodaram e, durante todo o tempo em que estivemos com eles nos campos, eles não roubaram nada que era nosso.
16 जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते.
16 Eles nos protegeram dia e noite todo o tempo em que estivemos com eles tomando conta dos nossos rebanhos.
17 आता काय करावे याचा तुम्ही विचार करा, कारण आमच्या मालकावर आणि त्यांच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. ते इतके दुष्ट मनुष्य आहेत की, त्यांच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.”
17 Pense nisso e resolva o que fazer. Isso poderá vir a ser um desastre para o nosso patrão e toda a sua família. Ele é tão mau, que ninguém pode falar com ele.
18 तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.
18 Então Abigail pegou depressa duzentos pães, dois odres cheios de vinho, cinco ovelhas assadas, uns dezessete quilos de trigo torrado, cem cachos de passas e duzentas pastas de figos secos e pôs tudo sobre jumentos.
19 आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.
19 Então disse aos empregados: — Vão na frente, que eu vou atrás. Porém não contou nada ao seu marido.
20 ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या समोरून येत होती व ती त्यांना भेटली.
20 Abigail ia montada no seu jumento e, de repente, numa curva, na descida, encontrou Davi e os seus homens, que vinham na sua direção.
21 दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला, ते व्यर्थच गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे.
21 Davi tinha pensado assim: “De que me adiantou proteger a propriedade desse homem aqui no deserto? Nós não roubamos nada que era dele, e é assim que ele me paga a ajuda que lhe dei?
22 उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”
22 Que Deus me castigue se eu não matar até o último daqueles homens antes do amanhecer!”
23 जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले.
23 Quando Abigail viu Davi, desmontou depressa, ajoelhou-se diante dele e encostou o rosto no chão,
24 ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या.
24 aos seus pés, dizendo: — Por favor, senhor! Escute-me! Eu sou a culpada!
25 माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.”
25 Por favor, não dê atenção a Nabal, pois ele não vale nada! Ele é exatamente o que seu nome quer dizer: um tolo ! Eu mesma não vi os rapazes que o senhor mandou.
26 तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.
26 Foi o Senhor Deus quem impediu que o senhor se vingasse e matasse os seus inimigos. Agora eu juro, pela sua vida e pela vida do Senhor , que todos os seus inimigos e todos os que querem prejudicá-lo serão castigados como Nabal.
27 आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो.
27 Senhor, faça o favor de aceitar este presente que eu lhe trouxe e o entregue aos seus homens.
28 “तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा करा. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहतर्फे युद्ध करत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही.
28 Perdoe, por favor, qualquer coisa errada que eu tenha feito. O Senhor Deus fará com que o senhor seja rei e também os seus descendentes, pois o senhor está combatendo o combate dele e o senhor não vai fazer nenhum mal enquanto viver.
29 जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहील, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.
29 Se alguém o atacar e tentar matá-lo, o Senhor , seu Deus, o protegerá como um homem que guarda um tesouro precioso. Mas ele vai jogar longe os seus inimigos, como um homem que atira pedras com a sua funda .
30 याहवेहने माझ्या धन्यासाठी जी चांगली अभिवचने दिली आहेत, ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर,
30 O Senhor Deus cumprirá todas as coisas boas que lhe prometeu e o fará rei de Israel.
31 माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”
31 E, quando isso acontecer, o senhor não terá motivo para se arrepender, ou sentir remorso por haver matado sem razão, ou por ter se vingado por si mesmo. E, quando o Senhor Deus o abençoar, não esqueça de mim.
32 दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत.
32 Davi respondeu: — Louvado seja o
33 तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो.
33 Graças ao que você fez hoje e ao seu juízo, eu deixei de cometer um crime de morte e fui impedido de me vingar por mim mesmo.
34 नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.”
34 Que o Senhor Deus me livre de fazer algum mal a você! Eu juro pelo Senhor , o Deus de Israel, o Deus vivo, que, se você não tivesse se apressado e não tivesse vindo me encontrar, amanhã cedo todos os homens de Nabal estariam mortos, até os meninos!
35 नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.”
35 Então Davi aceitou o que ela havia trazido e disse: — Volte para casa e não se preocupe. Eu farei o que você quiser.
36 जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही.
36 Abigail voltou para o seu marido Nabal, que estava em casa, festejando como um rei. Ele estava bêbado e alegre. Então ela não lhe contou nada. Na manhã seguinte,
37 नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला.
37 quando ele não estava mais bêbado, ela lhe contou tudo. Aí ele teve um ataque e ficou completamente paralisado.
38 सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला.
38 Uns dez dias depois, a ira de Deus feriu Nabal, e ele morreu.
39 जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.”
39 Quando Davi soube que Nabal havia morrido, disse: — Louvem a Deus, o Então Davi mandou a Abigail uma proposta de casamento.
40 त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुम्हाला त्यांची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.”
40 Os empregados dele foram até Carmelo e disseram: — Davi nos mandou buscá-la para que a senhora seja sua esposa.
41 तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे. मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.”
41 Então Abigail ajoelhou-se, encostou o rosto no chão e disse: — Eu sou escrava de Davi e estou pronta para lavar os pés dos empregados dele.
42 अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी घेऊन दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली.
42 Aí ela se levantou depressa e montou o seu jumento. E, acompanhada por suas cinco empregadas, partiu na companhia dos empregados de Davi e se tornou esposa dele.
43 दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या.
43 Davi tinha casado com Ainoã, de Jezreel, e agora Abigail também se tornou sua esposa.
44 परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती याला दिले होते, जो गल्लीम येथील होता.
44 Nesse meio tempo Saul tinha dado a sua filha Mical, que tinha sido esposa de Davi, a Palti, filho de Laís, da cidade de Galim.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 25, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.