1 Samuel 20

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?”
1 Então fugiu Davi de Naiote, em Ramá, veio ter com Jônatas e lhe disse: Que fiz eu? qual é a minha iniqüidade? e qual é o meu pecado diante de teu pai, para que procure tirar-me a vida?
2 “कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!”
2 E ele lhe disse: Longe disso! não hás de morrer. Meu pai não faz coisa alguma, nem grande nem pequena, sem que primeiro ma participe; por que, pois, meu pai me encobriria este negócio? Não é verdade.
3 परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”
3 Respondeu-lhe Davi, com juramento: Teu pai bem sabe que achei graça aos teus olhos; pelo que disse: Não saiba isto Jônatas, para que não se magoe. Mas, na verdade, como vive o Senhor, e como vive a tua alma, há apenas um passo entre mim e a morte.
4 योनाथान दावीदाला म्हणाला, “तुला वाटेल, ते मी तुझ्यासाठी करेन.”
4 Disse Jônatas a Davi: O que desejas tu que eu te faça?
5 तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन.
5 Respondeu Davi a Jônatas: Eis que amanhã é a lua nova, e eu deveria sentar-me com o rei para comer; porém deixa-me ir, e esconder-me-ei no campo até a tarde do terceiro dia.
6 जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’
6 Se teu pai notar a minha ausência, dirás: Davi me pediu muito que o deixasse ir correndo a Belém, sua cidade, porquanto se faz lá o sacrifício anual para toda a parentela.
7 जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे.
7 Se ele disser: Está bem; então teu servo tem paz; porém se ele muito se indignar, fica sabendo que ele já está resolvido a praticar o mal.
8 तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?”
8 Usa, pois, de misericórdia para com o teu servo, porque o fizeste entrar contigo em aliança do Senhor; se, porém, há culpa em mim, mata-me tu mesmo; por que me levarias a teu pai?
9 “कधीच नाही!” योनाथान म्हणाला. “जर मला थोडीतरी कल्पना असती की, माझ्या पित्याने तुला इजा करावयाचे योजले आहे, तर मी तुला सांगणार नाही काय?”
9 Ao que respondeu Jônatas: Longe de ti tal coisa! Se eu soubesse que meu pai estava resolvido a trazer o mal sobre ti, não to descobriria eu?
10 दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?”
10 Perguntou, pois, Davi a Jônatas: Quem me fará saber, se por acaso teu pai te responder asperamente?
11 योनाथान दावीदाला म्हणाला, “चल, आपण बाहेर मैदानात जाऊ.” तेव्हा ते मिळून तिकडे गेले.
11 Então disse Jônatas a Davi: Vem, e saiamos ao campo. E saíram ambos ao campo.
12 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांची मी शपथ घेतो की, परवा या सुमाराला मी खात्रीने माझ्या पित्याचे मनोगत समजून घेईन, जर तुझ्या हिताचे काही असले तर ते मी तुला कळविणार नाही काय?
12 E disse Jônatas a Davi: O Senhor, Deus de Israel, seja testemunha! Sondando eu a meu pai amanhã a estas horas, ou depois de amanhã, se houver coisa favorável para Davi, eu não enviarei a ti e não to farei saber?
13 परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत.
13 O Senhor faça assim a Jônatas, e outro tanto, se, querendo meu pai fazer-te mal, eu não te fizer saber, e não te deixar partir, para ires em paz; e o Senhor seja contigo, assim como foi com meu pai.
14 आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही,
14 E não somente usarás para comigo, enquanto viver, da benevolência do Senhor, para que não morra,
15 एवढेच नाही तर, याहवेहने दावीदाच्या प्रत्येक शत्रूंना पृथ्वीच्या पाठीवरून काढून टाकले तरीसुद्धा माझ्या कुटुंबावरील तुझी दया कधीही काढू नकोस.”
15 como também não cortarás nunca da minha casa a tua benevolência, nem ainda quando o Senhor tiver desarraigado da terra a cada um dos inimigos de Davi.
16 तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.”
16 Assim fez Jônatas aliança com a casa de Davi, dizendo: O Senhor se vingue dos inimigos de Davi.
17 आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली.
17 Então Jônatas fez Davi jurar de novo, porquanto o amava; porque o amava com todo o amor da sua alma.
18 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार.
18 Disse-lhe ainda Jônatas: Amanhã é a lua nova, e notar-se-á a tua ausência, pois o teu lugar estará vazio.
19 परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा.
19 Ao terceiro dia descerás apressadamente, e irás àquele lugar onde te escondeste no dia do negócio, e te sentarás junto à pedra de Ezel.
20 मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन.
20 E eu atirarei três flechas para aquela banda, como se atirasse ao alvo.
21 नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.”
21 Então mandarei o moço, dizendo: Anda, busca as flechas. Se eu expressamente disser ao moço: Olha que as flechas estão para cá de ti, apanha-as; então vem, porque, como vive o Senhor, há paz para ti, e não há nada a temer.
22 पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत.
22 Mas se eu disser ao moço assim: Olha que as flechas estão para lá de ti; vai-te embora, porque o Senhor te manda ir.
23 आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.”
23 E quanto ao negócio de que eu e tu falamos, o Senhor é testemunha entre mim e ti para sempre.
24 तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले.
24 Escondeu-se, pois, Davi no campo; e, sendo a lua nova, sentou-se o rei para comer.
25 राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसला होता आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते.
25 E, sentando-se o rei, como de costume, no seu assento junto à parede, Jônatas sentou-se defronte dele, e Abner sentou-se ao lado de Saul; e o lugar de Davi ficou vazio.
26 शौल त्या दिवशी काही बोलला नाही, कारण त्याला वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”
26 Entretanto Saul não disse nada naquele dia, pois dizia consigo: Aconteceu-lhe alguma coisa pela qual não está limpo; certamente não está limpo.
27 परंतु दुसर्‍या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?”
27 Sucedeu também no dia seguinte, o segundo da lua nova, que o lugar de Davi ficou vazio. Perguntou, pois, Saul a Jônatas, seu filho: Por que o filho de Jessé não veio comer nem ontem nem hoje?
28 योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली.
28 Respondeu Jônatas a Saul: Davi pediu-me encarecidamente licença para ir a Belém,
29 तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, कारण माझे घराणे नगरामध्ये यज्ञ करीत आहेत आणि मी तिथे असावे असा माझ्या भावाने हुकूम केला आहे. जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली, तर मला माझ्या भावांना भेटण्यासाठी जाऊ दे.’ त्यामुळे तो राजाच्या मेजवानीस आला नाही.”
29 dizendo: Peço-te que me deixes ir, porquanto a nossa parentela tem um sacrifício na cidade, e meu irmão ordenou que eu fosse; se, pois, agora tenho achado graça aos teus olhos, peço-te que me deixes ir, para ver a meus irmãos. Por isso não veio à mesa do rei.
30 शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय?
30 Então se acendeu a ira de Saul contra Jônatas, e ele lhe disse: Filho da perversa e rebelde! Não sei eu que tens escolhido a filho de Jessé para vergonha tua, e para vergonha de tua mãe?
31 जोपर्यंत इशायाचा पुत्र या पृथ्वीवर जिवंत आहे, तोपर्यंत तू किंवा तुझे राज्य स्थापित होणार नाही. आताच कोणाला तरी त्याच्याकडे पाठवून त्याला माझ्याकडे घेऊन ये, कारण त्याने अवश्य मरावे!”
31 Pois por todo o tempo em que o filho de Jessé viver sobre a terra, nem tu estarás seguro, nem o teu reino; pelo que envia agora, e traze-mo, porque ele há de morrer.
32 योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?”
32 Ao que respondeu Jônatas a Saul, seu pai, e lhe disse: Por que há de morrer. que fez ele?
33 परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.
33 Então Saul levantou a lança, para o ferir; assim entendeu Jônatas que seu pai tinha determinado matar a Davi.
34 योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्‍या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले.
34 Pelo que Jônatas, todo encolerizado, se levantou da mesa, e no segundo dia do mês não comeu; pois se magoava por causa de Davi, porque seu pai o tinha ultrajado.
35 सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला.
35 Jônatas, pois, saiu ao campo, pela manhã, ao tempo que tinha ajustado com Davi, levando consigo um rapazinho.
36 आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला.
36 Então disse ao moço: Corre a buscar as flechas que eu atirar. Correu, pois, o moço; e Jônatas atirou uma flecha, que fez passar além dele.
37 जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?”
37 Quando o moço chegou ao lugar onde estava a flecha que Jônatas atirara, gritou-lhe este, dizendo: Não está porventura a flecha para lá de ti?
38 तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला.
38 E tornou a gritar ao moço: Apressa-te, anda, não te demores! E o servo de Jônatas apanhou as flechas, e as trouxe a seu senhor.
39 (त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.)
39 O moço, porém, nada percebeu; só Jônatas e Davi sabiam do negócio.
40 नंतर योनाथानने आपली शस्त्रे त्या मुलाकडे देत म्हटले, “जा, हे घेऊन परत नगराकडे जा.”
40 Então Jônatas deu as suas armas ao moço, e lhe disse: Vai, leva-as à cidade.
41 तो मुलगा निघून गेल्यानंतर, दावीद त्या दगडाच्या दक्षिण बाजूने उठला आणि योनाथानसमोर भूमीवर उपडे पडून तीन वेळेस नमन केले. नंतर त्या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि एकत्र रडले—परंतु दावीद अधिक रडला.
41 Logo que o moço se foi, levantou-se Davi da banda do sul, e lançou-se sobre o seu rosto em terra, e inclinou-se três vezes; e beijaram-se um ao outro, e choraram ambos, mas Davi chorou muito mais.
42 योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला.
42 E disse Jônatas a Davi: Vai-te em paz, porquanto nós temos jurado ambos em nome do Senhor, dizendo: O Senhor seja entre mim e ti, e entre a minha descendência e a tua descendência perpetuamente.
43 — ausente —
43 Então Davi se levantou e partiu; e Jônatas entrou na cidade.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.