1 Samuel 17

marc (MARC) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली.
1 Os filisteus reuniram seu exército para a batalha e acamparam em Efes-Damim, entre Socó, em Judá, e Azeca.
2 शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले.
2 Em resposta, Saul reuniu as tropas israelitas perto do vale de Elá.
3 पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्‍यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.
3 Assim, os filisteus e os israelitas ficaram frente a frente, em colinas opostas, com o vale entre eles.
4 तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.
4 Então Golias, um guerreiro filisteu de Gate, saiu das fileiras do exército filisteu. Ele tinha 2,90 metros de altura,
5 त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते;
5 usava um capacete de bronze e vestia uma couraça de escamas de bronze que pesava sessenta quilos.
6 त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती.
6 Também usava caneleiras de bronze e carregava no ombro um dardo de bronze.
7 विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.
7 A haste de sua lança era pesada e grossa, como o eixo de um tear, e a ponta de ferro da lança pesava cerca de sete quilos. Seu escudeiro caminhava à frente dele.
8 गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे.
8 Golias parou e gritou para as tropas israelitas: “Por que saíram todos para lutar? Eu sou filisteu, e vocês são servos de Saul. Escolham um homem para vir aqui e lutar comigo!
9 जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.”
9 Se ele me matar, seremos seus escravos. Mas, se eu o matar, vocês serão nossos escravos!
10 तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”
10 Desafio hoje os exércitos de Israel. Mandem um homem para lutar comigo!”.
11 पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले.
11 Quando Saul e os israelitas ouviram isso, ficaram aterrorizados e muito abalados.
12 दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता.
12 Davi era filho de Jessé, efrateu de Belém, na terra de Judá. Na época do rei Saul, Jessé já era idoso e tinha oito filhos.
13 इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते.
13 Os três filhos mais velhos de Jessé — Eliabe, Abinadabe e Simeia — haviam se alistado no exército de Saul para lutar contra os filisteus.
14 दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,
14 Davi era o mais novo. Seus três irmãos mais velhos seguiam o exército de Saul,
15 परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.
15 enquanto Davi ia e voltava para ajudar seu pai a cuidar das ovelhas em Belém.
16 तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.
16 Durante quarenta dias, pela manhã e à tarde, o guerreiro filisteu se apresentava diante do exército israelita e o desafiava.
17 एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा.
17 Um dia, Jessé disse a Davi: “Leve depressa para seus irmãos que estão no acampamento este cesto com grãos tostados e estes dez pães.
18 त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये.
18 Leve também estes dez queijos para o capitão deles. Veja como estão seus irmãos e traga notícias deles”.
19 ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”
19 Os irmãos de Davi estavam com Saul e o exército israelita no vale de Elá, lutando contra os filisteus.
20 सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्‍याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईचे स्थानग्रहण करत होते.
20 Davi deixou as ovelhas com outro pastor e, na manhã seguinte, partiu bem cedo com os presentes, como Jessé havia ordenado. Chegou ao acampamento quando o exército israelita saía para o campo de batalha com gritos de guerra.
21 इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या.
21 Logo, filisteus e israelitas estavam frente a frente, exército contra exército.
22 दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्‍याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले.
22 Davi deixou suas coisas com o responsável pelos suprimentos e correu até a frente de batalha para saudar seus irmãos.
23 तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले.
23 Enquanto falava com eles, Golias, o guerreiro filisteu de Gate, saiu das fileiras do exército filisteu. Davi o ouviu gritar seu desafio habitual.
24 त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.
24 Quando os israelitas viram Golias, começaram a fugir, apavorados.
25 इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”
25 “Vocês viram aquele homem?”, perguntavam uns aos outros. “Ele sai todos os dias para desafiar Israel. O rei ofereceu uma grande recompensa para quem o matar. Dará uma de suas filhas como esposa e isentará toda a família dele de pagar impostos!”
26 दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”
26 Então Davi perguntou aos soldados que estavam por perto: “O que receberá o homem que matar esse filisteu e acabar com suas provocações contra Israel? Afinal de contas, quem é esse filisteu incircunciso para desafiar os exércitos do Deus vivo?”.
27 ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.”
27 Os soldados repetiram o que tinham dito e confirmaram: “Sim, essa será a recompensa para quem o matar”.
28 जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलतांना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”
28 Quando Eliabe, irmão mais velho de Davi, o ouviu falando com os soldados, ficou furioso e perguntou: “O que você está fazendo aqui? Não devia estar tomando conta daquelas poucas ovelhas? Conheço sua arrogância e suas más intenções. Você quer apenas ver a batalha!”.
29 दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?”
29 “O que eu fiz agora?”, disse Davi. “Só fiz uma pergunta!”
30 नंतर तो दुसर्‍या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले.
30 Então foi até outros soldados, fez a mesma pergunta e recebeu a mesma resposta.
31 दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.
31 Alguém contou ao rei Saul o que Davi tinha dito, e o rei mandou chamá-lo.
32 दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”
32 Davi disse a Saul: “Ninguém se preocupe por causa desse filisteu. Seu servo vai lutar contra ele”.
33 शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”
33 Saul respondeu: “Você não conseguirá lutar contra esse filisteu e vencer! É apenas um rapaz, e ele é guerreiro desde a juventude”.
34 परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले,
34 Davi, porém insistiu: “Tomo conta das ovelhas de meu pai e, quando um leão ou um urso aparece para levar um cordeiro do rebanho,
35 मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले.
35 vou atrás dele com meu cajado e tiro o cordeiro de sua boca. Se o animal me ataca, eu o seguro pela mandíbula e dou golpes nele com o cajado até ele morrer.
36 आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे.
36 Fiz isso com o leão e o urso, e farei o mesmo com esse filisteu incircunciso, pois ele desafiou os exércitos do Deus vivo!”.
37 ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.”
37 E disse ainda: “O S enhor que me livrou das garras do leão e do urso também me livrará desse filisteu!”. Por fim, Saul consentiu. “Está bem, então vá”, disse. “E que o S
38 शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.
38 Então Saul deu a Davi sua própria armadura, incluindo uma couraça e um capacete de bronze.
39 दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला.
39 Davi prendeu a espada sobre a armadura e tentou dar alguns passos, pois nunca tinha usado essas coisas. “Não consigo andar com tudo isso, pois não estou acostumado”, disse a Saul, e tirou a armadura.
40 नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.
40 Pegou cinco pedras lisas de um riacho e as colocou em sua bolsa de pastor. Armado apenas com seu cajado e sua funda, foi enfrentar o filisteu.
41 त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता.
41 Golias, com seu escudeiro à frente, caminhava em direção a Davi,
42 पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले.
42 rindo com desprezo do belo jovem ruivo.
43 तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला.
43 Gritou para Davi: “Por acaso sou um cão para que você venha a mim com um pedaço de pau?”. E amaldiçoou Davi em nome de seus deuses.
44 तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”
44 “Venha cá, e darei sua carne às aves e aos animais selvagens!”, berrou Golias.
45 दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो.
45 Davi respondeu ao filisteu: “Você vem a mim com uma espada, uma lança e um dardo, mas eu vou enfrentá-lo em nome do S enhor dos Exércitos, o Deus dos exércitos de Israel, que você desafiou.
46 आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत.
46 Hoje o S enhor entregará você em minhas mãos, e eu o matarei e cortarei sua cabeça. Então darei os cadáveres de seus homens às aves e aos animais selvagens, e o mundo todo saberá que há Deus em Israel!
47 येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”
47 E todos que estão aqui reunidos saberão que o S enhor salva seu povo, mas não com espada nem com lança. A batalha é do S enhor , e ele entregará vocês em nossas mãos!”.
48 पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला.
48 Quando o filisteu se aproximou para atacar, Davi foi correndo enfrentá-lo.
49 दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
49 Enfiou a mão na bolsa, pegou uma pedra e atirou-a com sua funda. A pedra acertou o filisteu na testa e ficou encravada ali. E Golias caiu com o rosto em terra.
50 अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.
50 Assim, Davi venceu o filisteu e o matou com apenas uma funda e uma pedra, pois não tinha espada.
51 दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले.
51 Em seguida, correu até o filisteu, puxou da bainha a espada dele e a usou para matá-lo e cortar-lhe a cabeça. Quando os filisteus viram que seu melhor guerreiro estava morto, deram meia-volta e fugiram.
52 तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते.
52 Os soldados de Israel e de Judá soltaram um forte grito de vitória e perseguiram os filisteus até Gate e até os portões de Ecrom. E os corpos dos filisteus mortos e feridos ficaram espalhados pelo caminho de Saarim até Gate e Ecrom.
53 इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.
53 Então o exército israelita voltou e saqueou o acampamento abandonado dos filisteus.
54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.
54 (Davi levou a cabeça do filisteu para Jerusalém, mas guardou as armas dele em sua própria tenda.)
55 शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?”
55 Quando Saul viu Davi sair para lutar contra os filisteus, perguntou a Abner, o comandante de seu exército: “Abner, quem é o pai desse rapaz?”. “Não faço ideia, ó rei!”, disse Abner.
56 राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”
56 “Então descubra quem é o pai dele!”, ordenou.
57 दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.
57 Assim que Davi voltou, depois de matar Golias, Abner o levou a Saul. Ele ainda carregava a cabeça do filisteu em suas mãos.
58 शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?”
58 Saul perguntou: “Quem é seu pai, meu rapaz?”. E Davi respondeu: “Sou filho de Jessé, que vive em Belém”.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.