1 Samuel 14

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही.
1 Um dia, Jônatas, filho de Saul, disse ao seu jovem escudeiro: — Venha, vamos até a guarnição dos filisteus, que está do outro lado. Porém ele não contou isso a seu pai.
2 शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.
2 Saul se encontrava na extremidade de Gibeá, debaixo da romãzeira em Migrom. E o povo que estava com ele eram cerca de seiscentos homens.
3 त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते.
3 Aías, filho de Aitube, irmão de Icabô, filho de Fineias, filho de Eli, sacerdote do Senhor em Siló, trazia a estola sacerdotal. O povo não sabia que Jônatas tinha ido.
4 ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेनेह होते.
4 Entre os desfiladeiros pelos quais Jônatas procurava passar à guarnição dos filisteus, havia um penhasco íngreme de um lado, e outro penhasco íngreme do outro lado. Um se chamava Bozez; o outro, Sené.
5 एक शिखर उत्तरेकडे मिकमाशासमोर आणि दुसरे दक्षिणेकडे गेबासमोर होते.
5 Um deles se erguia ao norte, diante de Micmás; o outro, ao sul, diante de Geba.
6 योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”
6 Jônatas disse ao seu escudeiro: — Venha, vamos até a guarnição desses incircuncisos. Talvez o
7 त्याचा शस्त्रवाहक म्हणाला, “तुझ्या मनामध्ये जे आहे ते कर, पुढे जा; मी माझ्या पूर्ण मनाने व जिवाने तुझ्याबरोबर आहे.”
7 Então o escudeiro disse: — Faça tudo o que estiver em seu coração. Eu estou com você e farei o que você decidir.
8 योनाथान म्हणाला, “चल, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या दृष्टीस पडू.
8 Jônatas respondeu: — Então vamos atravessar na direção daqueles homens e deixar que eles nos vejam.
9 जर ते आपल्याला म्हणतील, ‘आम्ही तुमच्याकडे येईपर्यंत तिथेच थांबा,’ तर आपण जिथे आहोत तिथेच थांबू आणि त्यांच्यापर्यंत जाणार नाही.
9 Se nos disserem assim: “Fiquem parados até que cheguemos perto de vocês”, então ficaremos onde estamos e não subiremos a eles.
10 परंतु जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण चढून जाऊ, कारण याहवेहने त्यांना आपल्या हाती दिले आहे याचे ते चिन्ह असेल.”
10 Porém se disserem: “Subam até aqui”, então subiremos, pois o Senhor os entregou em nossas mãos. Isto nos servirá de sinal.
11 जेव्हा ते दोघेजण पलिष्ट्यांच्या चौकीवर त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा पलिष्टी लोक म्हणाले, “पाहा, इब्री लोक ज्या बिळांमध्ये लपले होते त्यातून आता बाहेर येत आहेत.”
11 Quando os dois se deixaram ver pela guarnição dos filisteus, estes disseram: — Eis que os hebreus estão saindo dos buracos onde estavam escondidos.
12 चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.”
12 Os homens da guarnição disseram a Jônatas e ao seu escudeiro: — Subam até aqui e nós daremos uma lição em vocês. Então Jônatas disse ao escudeiro: — Venha atrás de mim, porque o
13 योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला.
13 Então Jônatas subiu engatinhando, e o seu escudeiro foi atrás. Os filisteus caíram diante de Jônatas, e o seu escudeiro os matava atrás dele.
14 त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली.
14 Neste primeiro ataque, Jônatas e o seu escudeiro mataram perto de vinte homens, numa pequena área de terra.
15 छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.
15 Houve grande espanto no arraial, no campo e entre todo o povo. Também a guarnição e os saqueadores tremeram, e até a terra tremeu. Foi um terror causado por Deus.
16 इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.
16 Em Gibeá de Benjamim, as sentinelas de Saul olharam e eis que a multidão dos filisteus se dispersava, correndo uns para cá, outros para lá.
17 तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.
17 Então Saul disse ao povo que estava com ele: — Contem os soldados e vejam quem é que saiu do acampamento. Contaram, e eis que nem Jônatas nem o seu escudeiro estavam ali.
18 शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.)
18 Saul disse a Aías: — Traga aqui a arca de Deus. Isso porque, naquele dia, ela estava com os filhos de Israel.
19 शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”
19 Enquanto Saul falava ao sacerdote, o alvoroço que havia no arraial dos filisteus aumentava cada vez mais. Então Saul disse ao sacerdote: — Desista de trazer a arca.
20 तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले.
20 Saul e todo o povo que estava com ele se reuniram e foram à batalha. E eis que a espada de um era contra o outro, e houve grande tumulto.
21 जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले.
21 Também os hebreus que anteriormente haviam estado com os filisteus e que tinham ido com eles ao arraial, também estes se juntaram com os israelitas que estavam com Saul e Jônatas.
22 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला.
22 Quando todos os homens de Israel que estavam escondidos na região montanhosa de Efraim ouviram que os filisteus estavam fugindo, também eles entraram na batalha e os perseguiram.
23 अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.
23 Assim o Senhor livrou Israel naquele dia. E a batalha passou além de Bete-Áven.
24 त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.
24 Naquele dia os homens de Israel estavam angustiados, porque Saul havia levado o povo a fazer um juramento, dizendo: — Maldito o homem que comer algo antes de anoitecer, antes de eu me vingar dos meus inimigos. Por isso todo o povo se absteve de comer naquele dia.
25 सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते.
25 Todo o povo chegou a um bosque onde havia mel no chão.
26 जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते.
26 Quando o povo entrou no bosque, eis que o mel estava escorrendo. Mas ninguém provou do mel, porque o povo estava com medo do juramento.
27 परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले.
27 Jônatas, porém, não sabia que o pai havia levado o povo a fazer aquele juramento. Por isso, estendeu a ponta da vara que tinha na mão, e a molhou no favo de mel. Quando comeu, os seus olhos voltaram a brilhar.
28 नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”
28 Então alguém do meio do povo disse: — O seu pai levou o povo a jurar solenemente, dizendo: “Maldito o homem que comer algo no dia de hoje.” Por isso o povo está exausto.
29 योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.
29 Então Jônatas disse: — Meu pai trouxe desastre sobre a terra. Vejam como os meus olhos brilham por ter eu provado um pouco deste mel.
30 आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
30 Teria sido muito melhor se hoje o povo tivesse comido livremente do que encontrou entre os despojos de seus inimigos. A derrota dos filisteus teria sido bem maior!
31 त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते.
31 Naquele dia derrotaram os filisteus, desde Micmás até Aijalom. O povo estava muito exausto.
32 तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले.
32 Então, lançando-se sobre o despojo, pegaram ovelhas, bois e bezerros, e os mataram no chão, e comeram a carne com sangue.
33 मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.”
33 Foram contar isto a Saul, dizendo: — Eis que o povo está pecando contra o Saul gritou: — Traidores! Rolem para aqui uma grande pedra.
34 तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ”
34 E Saul disse mais: — Espalhem-se entre o povo e digam a eles que cada um me traga o seu boi, a sua ovelha, e que os matem aqui, e então comam. E que não pequem contra o Então todo o povo trouxe, de noite, cada um o seu boi e o matou ali.
35 नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती.
35 E Saul edificou um altar ao Senhor . Foi o primeiro altar que lhe edificou.
36 शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.”
36 Então Saul disse: — Vamos descer esta noite no encalço dos filisteus. Vamos saqueá-los até o raiar do dia, e não deixemos que fique nem sequer um deles. Eles responderam: — Faça como achar melhor.
37 तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.
37 Mas o sacerdote disse: — Vamos primeiro nos aproximar de Deus. Então Saul consultou a Deus, dizendo: — Devo descer no encalço dos filisteus? Tu os entregarás nas mãos de Israel? Porém naquele dia Deus não lhe respondeu.
38 तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू.
38 Então Saul disse: — Venham cá, todos os chefes do povo, e informem-se e descubram qual é o pecado que foi cometido hoje.
39 इस्राएलचा उद्धार करणारा याहवेह यांची शपथ, पापाचा दोष जरी माझा पुत्र योनाथान याच्यावर असला, तरी त्याने मरावे.” परंतु कोणीही काही बोलले नाही.
39 Porque tão certo como vive o Senhor , que salva Israel, ainda que o meu filho Jônatas seja o culpado, certamente morrerá. Porém ninguém de todo o povo lhe respondeu.
40 तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.”
40 Então Saul disse a todo o Israel: — Fiquem vocês de um lado, e eu e o meu filho Jônatas ficaremos do outro. E o povo disse a Saul: — Faça como achar melhor.
41 शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले.
41 Então Saul falou ao Senhor , Deus de Israel: — Mostra a verdade. Então Jônatas e Saul foram indicados por sorteio, e o povo saiu livre.
42 शौल म्हणाला, “आता माझ्या व माझा पुत्र योनाथानवर चिठ्ठ्या टाका,” तेव्हा योनाथानची चिठ्ठी निघाली.
42 Então Saul disse: — Lancem a sorte entre mim e Jônatas, meu filho. E Jônatas foi indicado.
43 शौलाने योनाथानला विचारले, “तू काय केलेस ते मला सांग.”
43 Então Saul disse a Jônatas: — Diga-me o que foi que você fez. E Jônatas respondeu: — Eu apenas provei um pouco de mel com a ponta da vara que tinha na mão. Eis-me aqui; estou pronto para morrer.
44 शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”
44 Então Saul disse: — Que Deus me castigue se você não for morto, Jônatas.
45 परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही.
45 Porém o povo disse a Saul: — Como é que Jônatas pode ser morto, ele que efetuou tamanha salvação em Israel? Nada disso! Tão certo como vive o Assim o povo salvou Jônatas, para que não morresse.
46 यानंतर शौलाने पलिष्ट्यांचा पाठलाग करणे थांबविले आणि ते आपापल्या ठिकाणी परतले.
46 E Saul deixou de perseguir os filisteus, e estes voltaram para a sua terra.
47 इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.
47 Quando assumiu o reinado de Israel, Saul lutou contra todos os seus inimigos ao redor: contra Moabe, os filhos de Amom e Edom; contra os reis de Zobá e os filisteus; e, para onde quer que se voltava, era vitorioso.
48 तो शौर्याने लढला आणि त्याने अमालेक्यांचा पराभव केला आणि ज्यांनी इस्राएलला लुटले होते त्यांच्या हातूनही त्यांची सुटका केली.
48 Lutou com coragem, derrotando os amalequitas e libertando Israel das mãos dos que o saqueavam.
49 शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.
49 Os filhos de Saul eram Jônatas, Isvi e Malquisua. Os nomes de suas duas filhas eram Merabe, a mais velha, e Mical, a mais nova.
50 त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता.
50 A mulher de Saul se chamava Ainoã, filha de Aimaás. O nome do general do seu exército era Abner, filho de Ner, tio de Saul.
51 शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.
51 Quis era pai de Saul; e Ner, pai de Abner, era filho de Abiel.
52 शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे.
52 Durante todo o reinado de Saul, houve forte guerra contra os filisteus. Por isso, sempre que via um homem forte e valente, Saul o agregava a si.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.