1 Samuel 12

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे.
1 Então Samuel disse a todo o Israel: — Eis que atendi ao que vocês me pediram e constituí um rei sobre vocês.
2 आता तुमचा पुढारी म्हणून तुमच्याकडे राजा आहे. मी तर उतार वयाचा होऊन माझे केस पांढरे झाले आहेत, आणि माझी मुले येथे तुमच्याबरोबर आहेत. माझ्या तरुणपणाच्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमचा पुढारी आहे.
2 E agora eis que vocês têm o rei que irá adiante de vocês. Eu já sou velho e tenho os cabelos brancos, e os meus filhos estão com vocês. Eu tenho andado à frente de vocês desde a minha mocidade até o dia de hoje.
3 मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.”
3 Eis-me aqui. Testemunhem contra mim diante do Senhor e diante do seu ungido: de quem tomei o boi? De quem tomei o jumento? A quem enganei? A quem oprimi? E das mãos de quem aceitei suborno para encobrir com ele os meus olhos? Falem, e eu o restituirei.
4 त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही आम्हाला कधीही फसविले नाही किंवा आमच्यावर अत्याचार केला नाही, कोणाच्याही हातून तुम्ही काहीही घेतलेले नाही.”
4 Então responderam: — Você não nos defraudou, nem nos oprimiu, nem tomou coisa alguma das mãos de ninguém.
5 शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहेत आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.”
5 E ele lhes disse: — O E o povo confirmou: — Deus é testemunha.
6 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्यांनी मोशे आणि अहरोन यांना नेमले, आणि तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले ते याहवेहच होते.
6 Então Samuel disse ao povo: — O
7 तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेल्या सर्व नीतिमान कृत्यांविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.”
7 Agora fiquem aqui, porque vou discutir com vocês diante do Senhor , com relação a todos os seus atos de justiça que ele realizou em favor de vocês e dos seus pais.
8 याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
8 Depois que Jacó havia entrado no Egito, os pais de vocês clamaram ao Senhor , e o Senhor enviou Moisés e Arão, que os tiraram do Egito e os fizeram habitar neste lugar.
9 “परंतु याहवेह त्यांच्या परमेश्वरांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेराच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले.
9 Porém os pais de vocês se esqueceram do Senhor , seu Deus. Então ele os entregou nas mãos de Sísera, comandante do exército de Hazor, e nas mãos dos filisteus, e nas mãos do rei de Moabe, que lutaram contra eles.
10 तेव्हा त्यांनी रडून याहवेहचा धावा करीत ते म्हणाले, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही याहवेहचा त्याग केला आहे आणि बआल व अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता आमच्या शत्रूंच्या हातातून आमची सुटका करा आणि आम्ही तुमची सेवा करू,’
10 Eles clamaram ao Senhor e disseram: “Pecamos, pois deixamos o Senhor e servimos os baalins e astarotes. Mas agora livra-nos das mãos de nossos inimigos, e te serviremos.”
11 तेव्हा याहवेहनी यरूब्बआल, बाराक, इफ्ताह आणि शमुवेल यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला.
11 O Senhor enviou Jerubaal, Baraque, Jefté e Samuel, e os livrou das mãos dos inimigos que os cercavam, e vocês viveram em segurança.
12 “परंतु जेव्हा तुम्ही पाहिले की, अम्मोन्यांचा राजा नाहाश तुमच्यावर आक्रमण करत आहे, तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचा राजा असतानाही, तुम्ही मला म्हणाला, ‘नाही, आमच्यावर राज्य करण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे.’
12 — Quando vocês viram que Naás, rei dos filhos de Amom, vinha contra vocês, vocês me disseram: “Não! Queremos um rei sobre nós”, quando, na verdade, o Senhor , seu Deus, era o rei de vocês.
13 तर आता तुम्ही निवडून घेतलेला राजा येथे आहे, जो तुम्ही मागून घेतला आहे; पाहा, याहवेहने तुमच्यावर राजा नेमला आहे.
13 E agora, aqui está o rei que elegeram e que pediram. E eis que o Senhor deu um rei a vocês.
14 जर तुम्ही याहवेहचे भय धरून त्यांची सेवा कराल, त्यांचे आज्ञापालन कराल आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करतो तो तुमचा राजा व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुसरण कराल, तर बरे!
14 Se vocês temerem o Senhor , se o servirem, se derem ouvidos à sua voz e não forem rebeldes ao seu mandado, se seguirem o Senhor , seu Deus, tanto vocês como o rei que governa sobre vocês, então tudo lhes irá bem.
15 परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल.
15 Se, porém, vocês não derem ouvidos à voz do Senhor , mas forem rebeldes ao seu mandado, a mão do Senhor será contra vocês, como o foi contra os pais de vocês.
16 “तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहेत ते पाहा!
16 Fiquem, agora, aqui e vejam esta grande coisa que o Senhor fará diante de vocês.
17 हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”
17 Não estamos no tempo da colheita do trigo? Pois eu vou clamar ao Senhor , e ele mandará trovões e chuva. E vocês saberão e verão que é grande a maldade que praticaram aos olhos do Senhor , pedindo um rei.
18 तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.
18 Então Samuel invocou o Senhor , e o Senhor mandou trovões e chuva naquele dia. E todo o povo temeu grandemente o Senhor e Samuel.
19 सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”
19 Todo o povo disse a Samuel: — Ore por estes seus servos ao
20 “भिऊ नका,” शमुवेलने उत्तर दिले. “तुम्ही हे सर्व वाईट केले आहे; तरी आता याहवेहपासून दूर वळू नका, परंतु तुमच्या सर्व हृदयाने याहवेहची सेवा करा.
20 Então Samuel disse ao povo: — Não tenham medo. Vocês, de fato, cometeram todo este mal. No entanto, não se desviem de seguir o
21 निरुपयोगी मूर्तीच्या मागे लागू नका. ते तुमचे काहीही भले करू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला वाचवूही शकत नाहीत, कारण त्या निरुपयोगी आहेत.
21 Não se desviem, pois vocês estariam seguindo coisas vãs, que nada aproveitam e que não os podem livrar, porque são vaidade.
22 आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले.
22 Pois o Senhor , por causa do seu grande nome, não abandonará o seu povo, porque o Senhor decidiu fazer de vocês o seu povo.
23 माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला चांगला व खरा मार्ग शिकवेन.
23 Quanto a mim, longe de mim que eu peque contra o Senhor , deixando de orar por vocês. Pelo contrário, eu lhes ensinarei o caminho bom e direito.
24 परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा.
24 Tão somente temam o Senhor e sirvam a ele fielmente de todo o coração. Vejam que coisas grandiosas ele fez por vocês!
25 परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.”
25 Se, porém, continuarem a fazer o mal, perecerão, tanto vocês como o seu rei.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.