1 Reis 22

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही.
1 Três anos se passaram sem haver guerra entre Síria e Israel.
2 पण तिसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा यहोशाफाट इस्राएलच्या राजाला भेटण्यास गेला.
2 Porém, no terceiro ano, Josafá, rei de Judá, foi visitar o rei de Israel.
3 इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्‍यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?”
3 Este perguntou aos seus servos: — Vocês não sabem que Ramote-Gileade é nossa, e nós ficamos quietos e não a tiramos das mãos do rei da Síria?
4 तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?”
4 Então perguntou a Josafá: — Você vai comigo à batalha contra Ramote-Gileade? Josafá respondeu ao rei de Israel: — Sou como você é, o meu povo é como o seu povo, e os meus cavalos são como os seus cavalos.
5 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”
5 Josafá disse mais ao rei de Israel: — Consulte primeiro a palavra do
6 तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?”
6 Então o rei de Israel reuniu os profetas, cerca de quatrocentos homens, e lhes perguntou: — Devo ir e lutar contra Ramote-Gileade ou devo me conter? Eles responderam: — Vá, porque o Senhor a entregará nas mãos do rei.
7 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
7 Mas Josafá perguntou: — Não há aqui ainda algum profeta do
8 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.”
8 O rei de Israel respondeu a Josafá: — Há um ainda, por meio de quem podemos consultar o Josafá disse: — O rei não deveria falar assim.
9 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्‍याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.”
9 Então o rei de Israel chamou um oficial e disse: — Traga-me depressa Micaías, filho de Inlá.
10 इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते.
10 O rei de Israel e Josafá, rei de Judá, estavam assentados, cada um no seu trono, vestidos de trajes reais, numa eira à entrada do portão da cidade de Samaria; e todos os profetas profetizavam diante deles.
11 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”
11 Zedequias, filho de Quenaana, fez para si uns chifres de ferro e disse: — Assim diz o
12 इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”
12 Todos os profetas profetizaram assim, dizendo: — Suba a Ramote-Gileade! Você triunfará! O
13 जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”
13 O mensageiro que tinha ido chamar Micaías falou-lhe, dizendo: — Eis que as palavras dos profetas a uma voz predizem coisas boas para o rei. Portanto, que a sua palavra seja como a palavra de um deles; fale o que é bom.
14 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”
14 Micaías respondeu: — Tão certo como vive o
15 तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?”
15 Quando ele chegou à presença do rei, este lhe perguntou: — Micaías, devemos ir a Ramote-Gileade para a batalha ou devemos nos conter? Ele respondeu: — Vá! Você triunfará! O
16 राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”
16 O rei lhe disse: — Quantas vezes devo fazer você jurar que não me fale a não ser a verdade em nome do
17 तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”
17 Então Micaías disse: — Vi todo o Israel disperso pelos montes, como ovelhas que não têm pastor. E o
18 इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
18 Então o rei de Israel disse a Josafá: — Eu não disse a você que a meu respeito ele não profetiza o que é bom, mas somente o que é mau?
19 मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला.
19 Micaías prosseguiu: — Portanto, ouça a palavra do
20 आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’
20 Então o Senhor perguntou: “Quem enganará Acabe, para que vá e seja morto em Ramote-Gileade?” E um dizia uma coisa, e outro dizia outra coisa.
21 तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’
21 Então um espírito saiu, se apresentou diante do Senhor e disse: “Eu o enganarei.” O Senhor perguntou: “Como?”
22 “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’
22 Ele respondeu: “Sairei e serei um espírito mentiroso na boca de todos os profetas do rei.” Então o Senhor disse: “Você conseguirá enganá-lo. Vá e faça assim.”
23 “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”
23 E agora eis que o Senhor pôs esse espírito mentiroso na boca de todos estes seus profetas e o Senhor declarou que um mal vai lhe acontecer.
24 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”
24 Então Zedequias, filho de Quenaana, chegou, deu uma bofetada em Micaías e perguntou: — Por onde é que passou o Espírito do
25 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.”
25 Micaías respondeu: — Eis que você o verá no dia em que estiver correndo de quarto em quarto, tentando se esconder!
26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा
26 Então o rei de Israel disse: — Prenda Micaías e leve-o de volta a Amom, governador da cidade, e a Joás, filho do rei.
27 आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ”
27 E diga: “Assim diz o rei: Metam este homem na cadeia e o ponham a pão e água, até que eu volte em paz.”
28 तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!”
28 Micaías disse: — Se o rei de fato voltar em paz, é porque o E acrescentou: — Que todos os povos ouçam isto!
29 यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.
29 O rei de Israel e Josafá, rei de Judá, foram atacar Ramote-Gileade.
30 इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.
30 O rei de Israel disse a Josafá: — Eu vou me disfarçar e entrar no combate, mas você use os seus trajes reais. E assim o rei de Israel se disfarçou e entrou no combate.
31 आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”
31 Ora, o rei da Síria havia ordenado aos trinta e dois capitães dos seus carros de guerra que não lutassem nem contra pequeno nem contra grande, mas somente contra o rei de Israel.
32 रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला,
32 Quando os capitães dos carros viram Josafá, disseram: — Aquele certamente é o rei de Israel. E se dirigiram até ele para o atacar. Porém Josafá gritou.
33 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
33 Quando os capitães dos carros de guerra viram que não era o rei de Israel, deixaram de persegui-lo.
34 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”
34 Então um homem entesou o arco e, atirando ao acaso, atingiu o rei de Israel por entre as juntas da sua armadura. Então o rei Acabe disse ao condutor do seu carro: — Dê a volta e leve-me para fora do combate, porque estou gravemente ferido.
35 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि अराम्यांचा सामना करीत राजा रथातच राहिला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत रथाच्या तळाशी साचले आणि त्या संध्याकाळी तो मरण पावला.
35 A batalha se intensificou naquele dia. Quanto ao rei, seguraram-no em pé no seu carro de guerra de frente para os sírios, mas à tarde ele morreu. O sangue corria da ferida para o fundo do carro.
36 सूर्य मावळत असताना, सैन्यात एकच घोषणा झाली: “प्रत्येकाने आपआपल्या नगरात जावे, प्रत्येकाने आपआपल्या देशात जावे!”
36 Ao pôr do sol, fez-se ouvir um grito pelo acampamento, que dizia: — Cada um para a sua cidade, e cada um para a sua terra!
37 राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले.
37 Morto o rei, levaram-no a Samaria, onde o sepultaram.
38 शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.
38 Quando lavaram o carro de guerra junto à cisterna de Samaria, os cães lamberam o sangue do rei, segundo a palavra que o Senhor tinha dito; as prostitutas banharam-se naquelas águas.
39 अहाबाच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, हस्तिदंताने मढविलेला जो राजवाडा त्याने बांधला, व ज्या शहरांचे तट त्याने बांधले ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेले नाही काय?
39 Quanto aos demais atos de Acabe, a tudo o que fez, ao palácio de marfim que construiu e a todas as cidades que edificou, não está tudo escrito no Livro da História dos Reis de Israel?
40 अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
40 Assim, Acabe morreu, e Acazias, seu filho, reinou em seu lugar.
41 इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला.
41 Josafá, filho de Asa, começou a reinar sobre Judá no quarto ano do reinado de Acabe, rei de Israel.
42 यहोशाफाट राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती.
42 Josafá tinha trinta e cinco anos de idade quando começou a reinar e reinou vinte e cinco anos em Jerusalém. A mãe dele se chamava Azuba e era filha de Sili.
43 त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
43 Josafá andou em todos os caminhos de Asa, seu pai; não se desviou deles e fez o que era reto aos olhos do Senhor .
44 यहोशाफाट व इस्राएलचा राजा यांच्यात शांती होती.
44 Os lugares altos, porém, não foram destruídos; neles, o povo ainda oferecia sacrifícios e queimava incenso.
45 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय?
45 Josafá viveu em paz com o rei de Israel.
46 त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले.
46 Quanto aos demais atos de Josafá, ao poder que mostrou e como guerreou, não está tudo escrito no Livro da História dos Reis de Judá?
47 त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.
47 Também exterminou da terra os restantes dos prostitutos cultuais que ficaram nos dias de Asa, seu pai.
48 ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत.
48 Nessa época não havia rei em Edom, porém somente um governador.
49 तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला.
49 Josafá fez grandes navios, para irem a Ofir em busca de ouro; porém não foram, porque os navios se quebraram em Eziom-Geber.
50 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
50 Então Acazias, filho de Acabe, disse a Josafá: — Deixe que os meus servos naveguem com os seus. Porém Josafá não quis.
51 यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
51 Josafá morreu e foi sepultado na Cidade de Davi, seu pai; e Jeorão, seu filho, reinou em seu lugar.
52 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले.
52 Acazias, filho de Acabe, começou a reinar sobre Israel em Samaria, no décimo sétimo ano do reinado de Josafá, rei de Judá; e reinou dois anos sobre Israel.
53 त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
53 Fez o que era mau aos olhos do Senhor , pois andou nos caminhos de seu pai, bem como nos caminhos de sua mãe e nos caminhos de Jeroboão, filho de Nebate, que levou Israel a pecar.
54 — ausente —
54 Ele serviu a Baal, e o adorou, como o seu pai havia feito antes dele, provocando o Senhor , Deus de Israel, à ira.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.