1 Reis 1

marc (MARC) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे.
1 O rei Davi estava bem velho. Os seus servidores o cobriam com cobertas, mas ele não conseguia se aquecer.
2 म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक तरुण कुमारी शोधू या. तिने त्यांच्याजवळ झोपावे म्हणजे आमच्या स्वामींना ऊब येईल.”
2 Por isso, os seus conselheiros disseram: — Rei Davi, nós vamos procurar uma moça para ficar com o senhor e cuidar do senhor. Ela dormirá ao seu lado e o conservará quente.
3 नंतर त्यांनी सर्व इस्राएली देशात एका सुंदर तरुण कुमारीचा शोध केला आणि त्यांना शूनेमकरीण अबीशग आढळली, त्यांनी तिला राजाकडे आणले.
3 Então procuraram em toda a terra de Israel uma moça bonita. Em Suném encontraram uma jovem chamada Abisague e a levaram ao rei.
4 ती स्त्री खूप सुंदर होती; तिने राजाची काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली, पण राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
4 Abisague era muito bonita. Ela servia o rei e cuidava dele, mas Davi não teve relações com ela.
5 त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.
5 — ausente —
6 (“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.)
6 — ausente —
7 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला.
7 Adonias falou com Joabe, que era filho de uma mulher chamada Zeruia, e com Abiatar, o sacerdote, e eles concordaram em ficar do lado dele.
8 परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला जाऊन मिळाले नाही.
8 Mas o sacerdote Zadoque e Benaías, filho de Joiada, Natã, o profeta , Simei, Reí e os guarda-costas de Davi não ficaram do lado de Adonias.
9 अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्‍यांना आमंत्रित केले,
9 Um dia Adonias ofereceu ovelhas, touros e bezerros gordos em sacrifício , na pedra da Cobra, perto da fonte de Rogel. Ele convidou os outros filhos do rei Davi e os servidores do rei que eram de Judá.
10 परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही.
10 Porém não convidou o seu meio-irmão Salomão, nem Natã, o profeta, nem Benaías, nem os guarda-costas de Davi.
11 तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही?
11 Então Natã foi falar com Bate-Seba, a mãe de Salomão. Natã perguntou: — Você soube que Adonias, o filho de Hagite, se fez rei? E o rei Davi não está sabendo de nada!
12 तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो.
12 Vou lhe dar um conselho: se você quiser salvar a sua vida e a vida do seu filho Salomão,
13 दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’
13 vá agora mesmo falar com o rei Davi e diga o seguinte: “Rei Davi, o senhor não jurou que o meu filho Salomão seria rei em seu lugar e que seria ele quem haveria de sentar no seu trono? Então, como é que Adonias se tornou rei?”
14 तू राजाबरोबर अजूनही बोलत असतानाच मी आत येईन आणि तू जे सांगितले त्यामध्ये माझे शब्द घालेन.”
14 E Natã continuou: — E aí, quando você ainda estiver falando com o rei, eu vou chegar e confirmar a sua história.
15 तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.
15 Então Bate-Seba foi ao quarto de dormir do rei para falar com ele. Davi estava muito velho, e Abisague, a moça de Suném, estava cuidando dele.
16 बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले.
16 Em sinal de respeito, Bate-Seba se ajoelhou diante do rei. Então ele perguntou: — O que você quer?
17 ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’
17 Ela respondeu: — Rei Davi, o senhor jurou pelo nome do
18 परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही.
18 Mas Adonias já se tornou rei, e o senhor não está sabendo disso.
19 त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोनला त्याने बोलाविले नाही.
19 Ele ofereceu muitos touros, ovelhas e bezerros gordos em sacrifício e convidou os irmãos dele, o sacerdote Abiatar e Joabe, o comandante do exército, para a festa. Porém não convidou o seu filho Salomão.
20 माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार.
20 Rei Davi, todo o povo de Israel está esperando que o senhor lhe diga quem será o rei em seu lugar.
21 नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”
21 Se não disser, logo que o senhor morrer, eu e o meu filho Salomão seremos tratados como traidores.
22 ती राजाबरोबर बोलत असतानाच, नाथान संदेष्टा आला.
22 Enquanto Bate-Seba ainda estava falando, Natã chegou ao palácio.
23 आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले.
23 Contaram ao rei que o profeta Natã estava lá. Ele entrou, se ajoelhou diante do rei e encostou o rosto no chão.
24 नाथान संदेष्टा म्हणाला, “माझ्या स्वामी, अदोनियाह तुमच्यानंतर राजा होणार आणि तो तुमच्या राजासनावर बसणार अशी घोषणा तुम्ही केली आहे काय?
24 Depois disse: — Rei Davi, por acaso, o senhor anunciou que Adonias é quem será o rei em seu lugar?
25 आज त्याने खाली जाऊन पुष्कळ संख्येने गुरे, पुष्ट वासरे आणि मेंढरांचा यज्ञ केला आहे. त्याने सर्व राजपुत्र, सैन्यांचे सेनापती आणि अबीयाथार याजक यांना आमंत्रित केले आहे. सध्या यावेळी ते त्याच्यासोबत खात व पीत आहेत आणि म्हणत आहेत, ‘राजा अदोनियाह चिरायू होवो!’
25 Hoje mesmo ele foi oferecer muitos touros, ovelhas e bezerros gordos em sacrifício. Convidou todos os filhos do senhor, convidou Joabe, o comandante do seu exército, e Abiatar, o sacerdote. E agora mesmo eles estão comendo e bebendo com ele e gritando: “Viva o rei Adonias!”
26 परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही.
26 Mas Adonias não me convidou e não convidou Zadoque, o sacerdote, nem Benaías, nem Salomão.
27 हे सर्व माझ्या स्वामीने त्यांच्यानंतर राजासनावर कोणी बसावे हे आपल्या सेवकाला न कळवताच केले आहे काय?”
27 Será que o senhor aprovou tudo isso e não contou pelo menos aos seus conselheiros quem será o rei em seu lugar?
28 मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली.
28 O rei Davi disse: — Chamem Bate-Seba. Ela voltou e ficou diante dele.
29 तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ,
29 Aí o rei lhe disse: — Eu prometo pelo Deus vivo, que me livrou de todas as aflições,
30 याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.”
30 que hoje eu cumprirei o juramento que fiz a você, em nome do Senhor , o Deus de Israel: o juramento de que o seu filho Salomão seria o rei em meu lugar.
31 तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!”
31 Bate-Seba se ajoelhou, encostou o rosto no chão e disse: — Que o meu senhor, o rei Davi, viva para sempre!
32 दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले,
32 Então Davi mandou buscar o sacerdote Zadoque, o profeta Natã e Benaías, filho de Joiada. Quando eles entraram,
33 राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.
33 Davi disse: — Levem com vocês os funcionários do meu palácio, façam o meu filho Salomão montar a minha própria mula e o levem até a fonte de Giom.
34 तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’
34 Ali Zadoque e Natã o ungirão rei de Israel. Depois toquem as cornetas e gritem: “Viva o rei Salomão!”
35 नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.”
35 Em seguida venham atrás dele quando vier sentar-se no meu trono. Ele será rei em meu lugar porque eu o escolhi para governar Israel e Judá.
36 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत.
36 — Assim será feito! — respondeu Benaías. — E que o Senhor , seu Deus, confirme isso!
37 याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”
37 E que, assim como o Senhor Deus tem estado com o senhor, ele esteja também com Salomão e faça com que o reino dele seja ainda maior do que o seu!
38 तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.
38 Então Zadoque, Natã, Benaías, os queretitas e os peletitas fizeram Salomão montar a mula do rei Davi e o acompanharam até a fonte de Giom.
39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.”
39 Zadoque levou a vasilha de azeite que havia tirado da Tenda da Presença de Deus e ungiu Salomão. Então tocaram a corneta, e o povo gritou: — Viva o rei Salomão!
40 आणि सर्व लोक पावा वाजवित आणि मोठा आनंदोत्सव करीत त्याच्यामागे गेले, त्यांच्या घोषणांनी जमीन हादरली.
40 Depois todos foram andando atrás de Salomão, gritando de alegria e tocando flauta; e faziam tanto barulho, que até parecia que a terra estava rachando.
41 अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?”
41 Adonias e todos os seus convidados tinham acabado de comer quando ouviram aquele barulho. Joabe ouviu o som da corneta e perguntou: — O que quer dizer essa barulhada na cidade?
42 तो हे बोलत असताच, अबीयाथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनियाह त्याला म्हणाला, “आत ये. तुझ्यासारख्या योग्य मनुष्याने चांगलीच बातमी आणली असणार.”
42 Ele ainda estava falando quando chegou Jônatas, filho de Abiatar, o sacerdote. Adonias disse a Jônatas: — Entre aqui. Você é um homem de valor e deve estar trazendo boas notícias.
43 योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे.
43 — Pelo contrário, — respondeu Jônatas — o rei Davi tornou Salomão rei.
44 राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे,
44 Ele mandou Zadoque, Natã, Benaías, os queretitas e os peletitas acompanharem Salomão. Eles fizeram Salomão montar a mula do rei Davi,
45 आणि सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा राजा म्हणून गीहोन येथे अभिषेक केला आहे. तिथून ते मोठ्या आनंदाने वर गेले आणि शहरात त्या आवाजाचा नाद होत आहे. तोच आवाज आपण ऐकत आहात.
45 e Zadoque e Natã o ungiram rei, na fonte de Giom. Depois voltaram para a cidade, gritando de alegria, e agora o povo está fazendo um grande alvoroço. É esse o barulho que vocês estão ouvindo.
46 शिवाय, शलोमोनने राजासनावरील आपले स्थान घेतले आहे.
46 Agora Salomão é o rei.
47 तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले
47 E além disso os funcionários do palácio foram cumprimentar o rei Davi para dar-lhe os parabéns. Eles disseram: “Que o seu Deus faça com que Salomão seja ainda mais famoso do que o senhor, e que o reino dele seja ainda maior do que o seu!” Aí, o rei se curvou na cama
48 आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”
48 e orou assim: “Louvado seja o Senhor , o Deus de Israel, que hoje colocou um dos meus descendentes como rei em meu lugar e deixou que eu vivesse para ver isso!”
49 त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले.
49 Então os convidados de Adonias ficaram com medo, e se levantaram, e foram embora, cada um pelo seu caminho.
50 परंतु अदोनियाहने शलोमोनच्या भीतीने जाऊन वेदीवरील शिंगे धरून ठेवली.
50 Adonias ficou com muito medo de Salomão e por isso foi para a Tenda da Presença de Deus e ficou segurando nas pontas do altar .
51 तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ”
51 Contaram ao rei Salomão que Adonias estava com medo dele e que tinha ido pegar nas pontas do altar e tinha dito: — Eu quero que o rei Salomão jure hoje que não mandará me matar à espada.
52 शलोमोनने उत्तर दिले, “जर तो स्वतःस योग्य असा सिद्ध करेल, तर त्याच्या डोक्यावरील एक केससुद्धा जमिनीवर पडणार नाही; पण त्याच्या ठायी दुष्टाई आढळली, तर तो मरण पावेल.”
52 Salomão disse: — Se ele provar que é um homem de palavra, eu juro que nem um fio dos seus cabelos será tocado; mas, se estiver com más intenções, ele morrerá.
53 तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले आणि अदोनियाहने येऊन शलोमोन राजास मुजरा केला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.”
53 Então o rei Salomão mandou buscar Adonias. Fizeram com que ele descesse do altar, e ele veio, se ajoelhou diante do rei e encostou o rosto no chão. E o rei lhe disse: — Vá para casa.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.