1 Reis 13

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.
1 Ora, estando ele de pé diante do altar para queimar o incenso, eis que sobreveio um homem de Deus, vindo de Judá por ordem do Senhor;
2 याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”
2 este se pôs a clamar contra o altar da parte do Senhor, nestes termos: Altar! Altar! Eis o que diz o Senhor: Na casa de Davi nascerá um filho que se chamará Josias; ele imolará sobre ti os sacerdotes dos lugares altos, que agora queimam ofertas sobre ti, e queimar-se-ão sobre ti ossos humanos.
3 त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.”
3 Ao mesmo tempo anunciou o homem de Deus um prodígio, dizendo: Eis a prova de que é o Senhor quem fala: o altar vai-se fender e a cinza que está por cima se derramará por terra.
4 जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.
4 Ao ouvir a ameaça que o homem de Deus proferia contra o altar de Betel, o rei Jeroboão levantou a mão do altar, e disse: Prendei-o. Secou-se-lhe, porém, a mão que estendera contra o homem, de modo que não a pôde trazer a si.
5 आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.
5 O altar fendeu-se e espalhou-se a cinza que estava sobre ele, assim como o dissera o homem de Deus da parte do Senhor.
6 तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.
6 Então disse o rei ao homem de Deus: Aplaca o Senhor, teu Deus, e roga por mim para que me seja restituída a mão. O homem de Deus aplacou o Senhor, e o rei pôde trazer de novo a si a mão, que se tornou tal como era antes.
7 राजा त्या परमेश्वराच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर भोजन करण्यास घरी चल आणि मी तुला एक भेट देईन.”
7 O rei disse ao homem de Deus: Vem comigo a minha casa para restaurar as tuas forças, e dar-te-ei um presente.
8 परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार.
8 Mas o homem de Deus respondeu ao rei: Ainda que me desses a metade de tua casa, eu não iria contigo. Não comerei pão, nem beberei água nesse lugar,
9 कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ”
9 porque o Senhor me ordenou que não comesse pão, nem bebesse água, e tampouco voltasse pelo mesmo caminho por onde vim.
10 म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्‍या मार्गाने रवाना झाला.
10 Partiu, pois, de Betel por outro caminho e não tomou aquele por onde viera.
11 तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले.
11 Ora, habitava em Betel um profeta já idoso, a quem seus filhos contaram tudo o que o homem de Deus fizera naquele dia em Betel, e o que ele dissera ao rei. O pai disse-lhes: Por onde se foi ele?
12 त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला.
12 Seus filhos mostraram-lhe o caminho que tomara o homem de Deus vindo de Judá, ao partir.
13 तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला.” आणि त्यांनी तसे केल्यानंतर तो गाढवावर बसला
13 Ele disse aos seus filhos: Selai o meu jumento. Tendo-o eles selado, montou nele o profeta,
14 आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?”
14 e partiu em busca do homem de Deus. Encontrou-o sentado ao pé de um terebinto, e disse-lhe: És tu o homem de Deus que veio de Judá?
15 त्या संदेष्ट्याने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.”
15 Sim, respondeu ele. O velho profeta continuou: Vem comigo para comeres em minha casa.
16 परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत.
16 Não posso voltar, respondeu ele, nem ir contigo à tua casa. Não comerei pão, nem beberei água contigo nesse lugar,
17 याहवेहच्या वचनाद्वारे मला सांगितले गेले: ‘तू तिथे भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये किंवा ज्या मार्गाने तू आलास, त्याने परत जाऊ नये.’ ”
17 porque recebi do Senhor a ordem de não comer pão, nem beber água, nem tampouco voltar pelo mesmo caminho por onde vim.
18 त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)
18 Mas eu sou também profeta como tu, insistiu o outro. Ora, um anjo me falou da parte do Senhor: Leva-o contigo à tua casa e dá-lhe de comer. Era mentira.
19 म्हणून परमेश्वराचा मनुष्य त्याच्याबरोबर माघारी गेला व त्याच्या घरी खाणेपिणे केले.
19 O homem de Deus voltou com ele e comeu em sua casa.
20 ते मेजावर जेवायला बसले असताना, याहवेहचे वचन त्या वृद्ध संदेष्ट्याकडे आले, ज्याने त्याला माघारी आणले होते.
20 Enquanto estavam à mesa, o Senhor falou ao profeta que o tinha feito voltar,
21 तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही.
21 e este interpelou o homem de Deus, vindo de Judá, nestes termos: Eis o que diz o Senhor: Desobedeceste à palavra do Senhor e não cumpriste a ordem que o Senhor, teu Deus, te havia dado:
22 माघारी येऊन, ज्या ठिकाणी तू भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये असे याहवेहने तुला सांगितले होते, तिथे तू खाणेपिणे केले. म्हणून तुझ्या पूर्वजांच्या कबरेत तुझे शरीर पुरले जाणार नाही.’ ”
22 voltaste e comeste num lugar do qual Deus te dissera: Não comerás pão ali, nem beberás água. Por isso teu cadáver não será levado ao sepulcro de teus pais.
23 परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले.
23 Depois de ter comido, o velho profeta mandou selar um jumento para o seu hóspede, e este partiu.
24 त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्‍या बाजूला गाढव उभे राहिले.
24 Enquanto caminhava, o homem de Deus encontrou no caminho um leão, que o matou. Seu cadáver ficou estendido no caminho, tendo ao seu lado o jumento e o leão.
25 जे लोक त्या रस्त्याने येणे जाणे करीत होते त्यांनी त्याच्या शरीराच्या बाजूला सिंह उभा आहे असे पाहिले आणि त्यांनी शहरात जाऊन ज्या ठिकाणी वृद्ध संदेष्टा राहत होता तिथे ही बातमी सांगितली.
25 Alguns que passavam por ali, vendo o cadáver estendido por terra e junto dele o leão, foram e divulgaram a notícia na cidade onde morava aquele velho profeta.
26 त्याला त्याच्या प्रवासातून माघारी आणलेल्या त्या संदेष्ट्याने त्याविषयी ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराचा मनुष्य, ज्याने याहवेहच्या वचनाचा अवमान केला तो हाच. याहवेहने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले व त्याने त्याला फाडून मारून टाकले, याहवेहने त्याला चेतवणी दिल्यानुसार ते घडले आहे.”
26 Ouvindo isto, o velho profeta, que tinha levado à sua casa o homem de Deus, exclamou: É o homem de Deus que foi desobediente à ordem do Senhor; e o Senhor o entregou a um leão que o despedaçou e matou, como o Senhor lho predissera.
27 तेव्हा त्या संदेष्ट्याने त्याच्या मुलांना म्हटले, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला,” त्यानुसार त्यांनी केले.
27 E disse em seguida aos seus filhos: Selai o meu jumento. Eles selaram-no,
28 तेव्हा तो गेला आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडलेले व त्याच्या बाजूला गाढव व सिंह उभे असलेले आढळले. सिंहाने ना त्याचे शरीर खाऊन टाकले होते ना त्या गाढवाला फाडले होते.
28 o profeta partiu, e encontrou o cadáver estendido no caminho, tendo ao seu lado o jumento e o leão. O leão não tinha devorado o cadáver, nem dilacerado o jumento.
29 मग त्या संदेष्ट्याने परमेश्वराच्या मनुष्याचे शरीर उचलून गाढवावर ठेवले आणि त्याच्यासाठी शोक करावा व त्याला पुरावे म्हणून आपल्या शहरात आणले.
29 Tomou então o profeta o cadáver do homem de Deus, pô-lo em cima do seu jumento, e levou-o para a cidade a fim de pranteá-lo e dar-lhe sepultura.
30 मग त्याने त्याचे शरीर आपल्याच कबरेत ठेवले व म्हणाला, “अरेरे, माझ्या भावा!”
30 Depositou-o em seu próprio túmulo, e pranteou-o, dizendo: Ai, meu irmão!
31 त्याला पुरल्यानंतर, संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “मी मेल्यावर, परमेश्वराच्या मनुष्याला ज्या कबरेत पुरले आहे तिथेच मलाही ठेवा; त्याच्या हाडांजवळ माझी हाडे असू द्या.
31 Depois do enterro disse o ancião aos seus filhos: Quando eu morrer, sepultar-me-eis no túmulo onde repousa o homem de Deus; depositareis os meus ossos junto do seus.
32 कारण बेथेलमधील वेदी व शोमरोन नगरातील उच्च स्थानावरील मंदिरांविरुद्ध याहवेहच्या वचनानुसार त्याने जे काही जाहीर केले ते निश्चितच घडून येणार.”
32 Porque se cumprirá a ameaça que ele fez da parte do Senhor contra o altar de Betel e contra todos os templos dos lugares altos das cidades da Samaria.
33 यानंतरही, यरोबोअमने त्याचे दुष्टमार्ग सोडले नाही व पुन्हा प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून पूजास्थानांसाठी याजकांची नेमणूक केली. ज्या कोणाला याजक होण्यास इच्छा होईल त्यांना त्याने पूजास्थानांसाठी वेगळे केले.
33 Depois dessas coisas, Jeroboão não se converteu de sua péssima vida, mas continuou a tomar homens do meio do povo e constituí-los sacerdotes dos lugares altos: a todo o que desejasse, investia no cargo sacerdotal e o estabelecia nos lugares altos.
34 यरोबोअमचे घराण्याचे हे पाप त्यांच्या पतनास व पृथ्वीवरून त्यांच्या नाशास कारण झाले.
34 Isto tornou-se para a casa de Jeroboão um ocasião de pecado, que causou a sua perda e o seu extermínio da face da terra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.