1 Crônicas 21
marc (MARC) vs NTLH
1 सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले.
1 Satanás quis criar problemas para o povo de Israel e por isso levou Davi a fazer uma contagem do povo.
2 म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”
2 Davi deu a Joabe e aos outros oficiais a seguinte ordem: — Vão por toda a terra de Israel, desde o Norte até o Sul, e façam a contagem do povo. Eu quero saber quantos somos.
3 परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?”
3 Mas Joabe respondeu: — Que o
4 तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला.
4 Mas o rei fez com que Joabe obedecesse à sua ordem. Então Joabe saiu, viajou por toda a terra de Israel e depois voltou para Jerusalém.
5 योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते.
5 Ele informou ao rei Davi que o total de homens capazes para o serviço militar era o seguinte: um milhão e cem mil em Israel e quatrocentos e setenta mil em Judá.
6 या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता.
6 Mas Joabe desaprovava a ordem do rei e por isso não fez a contagem nas tribos de Levi e Benjamim.
7 परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली.
7 O que foi feito desagradou a Deus, e por isso ele castigou o povo de Israel.
8 तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.”
8 Então Davi disse: — Ó Deus, eu cometi um pecado terrível quando mandei contar o povo. Por favor, perdoa-me! O que fiz foi uma loucura.
9 याहवेहने दावीदाचा द्रष्टा गाद याला म्हटले,
9 Então o Senhor Deus disse a Gade, o profeta de Davi:
10 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”
10 — Vá e diga a Davi que eu dou a ele o direito de escolher uma de três coisas; aquilo que ele escolher eu farei. — Você pode escolher uma destas três coisas: três anos de fome, três meses fugindo dos exércitos dos seus inimigos ou três dias nos quais o
11 तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर:
11 — ausente —
12 तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”
12 — ausente —
13 दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात पडलो आहे. मला याहवेहच्या हाती पडू दे, कारण त्यांची कृपा अतिशय अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”
13 Davi respondeu: — Estou desesperado; porém não quero ser castigado por homens. Que o próprio
14 तेव्हा याहवेहने इस्राएल देशात मरी पाठवली आणि तिच्यामुळे सत्तर हजार लोक मरण पावले.
14 Então Deus mandou que uma peste caísse sobre o povo de Israel, e morreram setenta mil israelitas.
15 आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता.
15 Depois mandou um anjo para destruir a cidade de Jerusalém, mas mudou de ideia e disse ao anjo: — Pare! Já chega! O anjo do
16 दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले.
16 Davi olhou e viu o anjo no ar, segurando a sua espada, pronto para destruir Jerusalém. Então Davi e os líderes do povo, todos eles vestindo roupas feitas de pano grosseiro, ajoelharam-se e encostaram o rosto no chão.
17 दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.”
17 Aí Davi orou assim: — Ó Deus, fui eu que errei. Fui eu quem mandou fazer o recenseamento. O que foi que essa pobre gente fez? Ó
18 तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.
18 Então o anjo do Senhor disse a Gade que mandasse Davi construir um altar para Deus no terreiro de malhar cereais que pertencia a Araúna.
19 मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला.
19 Davi obedeceu à ordem do Senhor e foi, como Gade lhe tinha dito.
20 आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले.
20 Ali, no terreiro, Araúna e os seus quatro filhos estavam malhando trigo. Quando viram o anjo, os filhos fugiram e se esconderam.
21 जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.
21 Ao ver Davi chegando, Araúna saiu do terreiro, ajoelhou-se e encostou o rosto no chão.
22 दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.”
22 Então Davi lhe disse: — Quero que você me venda o seu terreiro de malhar cereais a fim de que eu construa nele um altar para Deus, o
23 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”
23 Araúna disse: — Fique com o terreiro e faça com ele o que quiser. Aqui estão estes bois para serem queimados em
24 परंतु दावीद राजाने अरवनाहला उत्तर दिले, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. जे तुझे आहे, ते मी याहवेहसाठी तसेच घेणार नाही. फुकट मिळालेले होमार्पण मी अर्पिणार नाही.”
24 Mas Davi respondeu: — Isso não! Eu pagarei o preço justo. Não vou dar como oferta ao
25 मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल दिली.
25 E pagou a Araúna quase sete quilos de ouro pelo terreiro.
26 नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. त्याने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून त्याला उत्तर दिले.
26 Então construiu ali um altar para Deus e ofereceu sacrifícios que foram completamente queimados e ofertas de paz. Ele orou, e Deus respondeu, mandando fogo do céu para queimar os sacrifícios que estavam no altar.
27 मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली.
27 O Senhor Deus mandou que o anjo colocasse a sua espada na bainha, e ele obedeceu.
28 याहवेहने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले, हे पाहून दावीदाने आर्णोन यबूसीच्या खळ्यात अर्पणे वाहिली.
28 Naquele instante Davi entendeu que Deus havia respondido à sua oração e por isso ofereceu sacrifícios no altar do terreiro de malhar cereais.
29 मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती.
29 Naquele tempo a Tenda da Presença de Deus , que Moisés havia feito no deserto, e o altar onde os sacrifícios eram queimados ainda estavam no lugar de adoração que ficava em Gibeão.
30 परंतु दावीद परमेश्वराला प्रश्न विचारावयास त्यांच्या पुढे जाण्यास धजेना, कारण याहवेहच्या दूताच्या तलवारीने तो भयभीत झाला होता.
30 Mas Davi não podia ir até lá para adorar a Deus porque estava com medo da espada do anjo do Senhor .
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.