1 Crônicas 17
marc (MARC) vs VC
1 जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!”
1 Quando Davi se instalou em sua casa, disse ao profeta Natã: Eis que moro numa casa de cedro e a arca da aliança do Senhor está debaixo de uma tenda.
2 नाथानाने दावीदाला उत्तर दिले, “आपल्या मनात जे काही आहे त्यानुसार करा, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहेत.”
2 Natã respondeu: Faze o que teu coração te sugere, porque Deus está contigo.
3 परंतु त्याच रात्री परमेश्वराचे वचन असे नाथानाकडे आले:
3 Mas, na noite seguinte, a palavra de Deus foi dirigida a Natã, nestes termos:
4 “जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस.
4 Vai e dize a Davi, meu servo: Eis o que diz o Senhor: Não és tu que me construirás a casa em que habitarei.
5 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही, तंबू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात, या निवासस्थानातून त्या निवासस्थानात फिरत राहिलो आहे.
5 Nunca habitei numa casa, desde o dia em que fiz sair Israel do Egito até hoje, mas tenho estado de tenda em tenda, de morada em morada.
6 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’
6 Durante todo o tempo em que viajei com todo o Israel, jamais propus esta questão a algum dos juízes de Israel, aos quais encarregara de apascentar meu povo: Por que não me edificais uma casa de cedro?
7 “तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.
7 Agora dirás a meu servo Davi: Eis o que diz o Senhor dos exércitos: Eu te tirei dos campos de pastagens e do pastoreio das ovelhas, para seres o chefe de meu povo de Israel;
8 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव करेन.
8 em toda parte a que foste, estive contigo, exterminei diante de ti teus inimigos e dei-te um nome igual ao dos grandes da terra.
9 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.
9 Dei um lugar a meu povo de Israel, e o fixei. Ele está estabelecido, e não será mais inquietado, e os iníquos não mais o oprimirão, como outrora,
10 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन.
10 como nos dias em que estabeleci juízes sobre Israel, meu povo. Humilhei todos os teus inimigos. Eu te anuncio que o Senhor há de fundar para ti uma casa.
11 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.
11 Quando teus dias se acabarem e tiveres ido juntar-te a teus pais, levantarei tua posteridade após ti, num de teus filhos, e firmarei seu reino.
12 तोच माझ्यासाठी घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.
12 É ele que me construirá uma casa e firmarei seu trono para sempre.
13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही.
13 Serei para ele um pai, e ele será para mim um filho; e nunca retirarei dele o meu favor como retirei daquele que reinou antes de ti.
14 मी त्याला माझ्या मंदिरावर आणि माझ्या राज्यावर नेमीन; त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
14 Eu o estabelecerei na minha casa e no meu reino para sempre, e seu trono será firme por todos os séculos.
15 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
15 Natã referiu a Davi todas as palavras que tinha ouvido em visão.
16 तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला:
16 Então Davi foi e se apresentou diante do Senhor e disse: Quem sou eu, Senhor Deus, e que é minha casa, para que me façais chegar ao que sou?
17 माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे.
17 E é ainda pouco a vossos olhos, ó Deus! Falastes da casa de vosso servo para os tempos longínquos, e olhastes para mim como a um homem de alta dignidade, ó Senhor Deus.
18 “तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.
18 Que mais poder-vos-ia dizer Davi sobre a honra que fazeis ao vosso servo? Vós conheceis o vosso servo.
19 हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे.
19 Senhor, é por causa de vosso servo e segundo o impulso de vosso coração que executastes todas estas grandes coisas para lhas revelar.
20 “हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.
20 Senhor, ninguém é semelhante a vós, e, conforme tudo que ouvimos dizer, não há outro Deus além de vós.
21 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?
21 Há sobre a terra outra nação comparável ao nosso povo de Israel, o qual seu Deus veio redimir para dele fazer seu povo, para vos fazer célebre, por meio de milagres e prodígios, repelindo nações diante de vosso povo que redimistes do Egito?
22 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.
22 De Israel, fizestes vosso povo para sempre, e vós, Senhor, tornastes-vos seu Deus.
23 “तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे.
23 E agora, Senhor, possa a palavra que pronunciastes acerca de vosso servo e de sua casa subsistir eternamente! Fazei como o dissestes.
24 यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.
24 Que ela subsista; então vosso nome será eternamente exaltado e dir-se-á: o Senhor dos exércitos é o Deus de Israel; é um Deus para Israel. E que seja sólida diante de vós a casa de vosso servo Davi.
25 “हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.
25 Porque fostes vós mesmo, ó meu Deus, que revelastes a vosso servo que lhe constituiríeis uma casa; eis por que vosso servo ousa dirigir-vos esta prece.
26 याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे.
26 Agora, Senhor, vós sois Deus, e dissestes a vosso servo essa palavra agradável.
27 आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.”
27 Dignai-vos, portanto, abençoar a casa de vosso servo, para que ela subsista perpetuamente diante de vós; porque, o que abençoais, Senhor, é para sempre bendito.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.