1 Coríntios 9

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 मी स्वतंत्र नाही का? मी प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूंना पाहिले नाही का? प्रभूमध्ये तुम्ही माझ्या श्रमाचे फळ नाही का?
1 Não sou eu apóstolo? Não sou livre? Não vi eu a Jesus Cristo, Senhor nosso? Não sois vós a minha obra no Senhor?
2 कदाचित मी दुसर्‍यांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी नक्कीच आहे! कारण माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही प्रभूमध्ये शिक्का आहात.
2 Se eu não sou apóstolo para os outros, ao menos o sou para vós; porque vós sois o selo do meu apostolado no Senhor.
3 माझा न्याय करणार्‍यांना हे माझे बचावाचे उत्तर आहे.
3 Esta é a minha defesa para com os que me condenam.
4 आम्हाला खाण्याचा पिण्याचा अधिकार नाही काय?
4 Não temos nós direito de comer e de beber?
5 इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?
5 Não temos nós direito de levar conosco uma mulher irmã, como também os demais apóstolos, e os irmãos do Senhor, e Cefas?
6 फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?
6 Ou só eu e Barnabé não temos direito de deixar de trabalhar?
7 स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?
7 Quem jamais milita à sua própria custa? Quem planta a vinha e não come do seu fruto? Ou quem apascenta o gado e não come do leite do gado?
8 मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही?
8 Digo eu isso segundo os homens? Ou não diz a lei também o mesmo?
9 कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?
9 Porque na lei de Moisés está escrito: Não atarás a boca ao boi que trilha o grão. Porventura, tem Deus cuidado dos bois?
10 हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.
10 Ou não o diz certamente por nós? Certamente que por nós está escrito; porque o que lavra deve lavrar com esperança, e o que debulha deve debulhar com esperança de ser participante.
11 जर आम्ही तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीचे बीज पेरले आणि त्याबद्दल केवळ भौतिक गोष्टींच्या हंगामाची अपेक्षा केली, तर त्यात काय मोठे झाले?
11 Se nós vos semeamos as coisas espirituais, será muito que de vós recolhamos as carnais?
12 जर इतरांना तुमच्याकडून या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे, तर आम्हालाही तुमच्याकडून मिळण्याचा अधिक हक्क नाही काय?
12 Se outros participam deste poder sobre vós, por que não, mais justamente, nós? Mas nós não usamos deste direito; antes, suportamos tudo, para não pormos impedimento algum ao evangelho de Cristo.
13 जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?
13 Não sabeis vós que os que administram o que é sagrado comem do que é do templo? E que os que de contínuo estão junto ao altar participam do altar?
14 याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.
14 Assim ordenou também o Senhor aos que anunciam o evangelho, que vivam do evangelho.
15 परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.
15 Mas eu de nenhuma destas coisas usei e não escrevi isso para que assim se faça comigo; porque melhor me fora morrer do que alguém fazer vã esta minha glória.
16 कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.
16 Porque, se anuncio o evangelho, não tenho de que me gloriar, pois me é imposta essa obrigação; e ai de mim se não anunciar o evangelho!
17 मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.
17 E, por isso, se o faço de boa mente, terei prêmio; mas, se de má vontade, apenas uma dispensação me é confiada.
18 माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.
18 Logo, que prêmio tenho? Que, evangelizando, proponha de graça o evangelho de Cristo, para não abusar do meu poder no evangelho.
19 मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे.
19 Porque, sendo livre para com todos, fiz-me servo de todos, para ganhar ainda mais.
20 यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्‍यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही.
20 E fiz-me como judeu para os judeus, para ganhar os judeus; para os que estão debaixo da lei, como se estivera debaixo da lei, para ganhar os que estão debaixo da lei.
21 ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.
21 Para os que estão sem lei, como se estivera sem lei (não estando sem lei para com Deus, mas debaixo da lei de Cristo), para ganhar os que estão sem lei.
22 जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे
22 Fiz-me como fraco para os fracos, para ganhar os fracos. Fiz-me tudo para todos, para, por todos os meios, chegar a salvar alguns.
23 मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्‍या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे.
23 E eu faço isso por causa do evangelho, para ser também participante dele.
24 शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल.
24 Não sabeis vós que os que correm no estádio, todos, na verdade, correm, mas um só leva o prêmio? Correi de tal maneira que o alcanceis.
25 जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो.
25 E todo aquele que luta de tudo se abstém; eles o fazem para alcançar uma coroa corruptível, nós, porém, uma incorruptível.
26 म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.
26 Pois eu assim corro, não como a coisa incerta; assim combato, não como batendo no ar.
27 मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.
27 Antes, subjugo o meu corpo e o reduzo à servidão, para que, pregando aos outros, eu mesmo não venha de alguma maneira a ficar reprovado.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.