1 Coríntios 8
marc (MARC) vs NVI
1 मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते.
1 Com respeito aos alimentos sacrificados aos ídolos, sabemos que todos temos conhecimento. O conhecimento traz orgulho, mas o amor edifica.
2 ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही.
2 Quem pensa conhecer alguma coisa, ainda não conhece como deveria.
3 परंतु जो परमेश्वरावर प्रीती करतो, त्याला परमेश्वर ओळखतात.
3 Mas quem ama a Deus, este é conhecido por Deus.
4 तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”
4 Portanto, em relação ao alimento sacrificado aos ídolos, sabemos que o ídolo não significa nada no mundo e que só existe um Deus.
5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत,
5 Pois mesmo que haja os chamados deuses, quer no céu, quer na terra, ( como de fato há muitos "deuses" e muitos "senhores" ),
6 तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.
6 para nós, porém, há um único Deus, o Pai, de quem vêm todas as coisas e para quem vivemos; e um só Senhor, Jesus Cristo, por meio de quem vieram todas as coisas e por meio de quem vivemos.
7 तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो.
7 Contudo, nem todos têm esse conhecimento. Alguns, ainda habituados com os ídolos, comem esse alimento como se fosse um sacrifício idólatra; e como a consciência deles é fraca, esta fica contaminada.
8 परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.
8 A comida, porém, não nos torna aceitáveis diante de Deus; não seremos piores se não comermos, nem melhores se comermos.
9 तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.
9 Contudo, tenham cuidado para que o exercício da liberdade de vocês não se torne uma pedra de tropeço para os fracos.
10 कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का?
10 Pois, se alguém que tem a consciência fraca vir você que tem este conhecimento comer num templo de ídolos, não será induzido a comer do que foi sacrificado a ídolos?
11 म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये.
11 Assim, esse irmão fraco, por quem Cristo morreu, é destruído por causa do conhecimento que você tem.
12 जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
12 Quando você peca contra seus irmãos dessa maneira, ferindo a consciência fraca deles, peca contra Cristo.
13 यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.
13 Portanto, se aquilo que eu como leva o meu irmão a pecar, nunca mais comerei carne, para não fazer meu irmão tropeçar.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.