1 Coríntios 16

marc (MARC) vs BKJ

Sair da comparação
1 आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा.
1 Ora, quanto à coleta que se faz para os santos, o mesmo que ordenei às igrejas da Galácia, fazei vós também.
2 प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत.
2 No primeiro dia da semana, cada um de vós pessoalmente separe e guarde, conforme Deus o prosperou, para que não sejam coletados quando eu chegar.
3 मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन.
3 E, quando eu tiver chegado, os que aprovardes por suas cartas, eu enviarei para levar a vossa liberalidade, a Jerusalém.
4 मीही जाणे उचित होईल असे वाटले, तर आम्ही सोबतीने प्रवास करू.
4 E, se for apropriado que eu também vá, eles irão comigo.
5 मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे.
5 Ora, eu irei até vós quando eu passar pela Macedônia; porque tenho de passar pela Macedônia.
6 तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता.
6 E bem pode ser que fique convosco e passe também o inverno, para que me acompanheis aonde quer que eu for.
7 यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे.
7 Porque eu não os verei agora pelo caminho, mas espero ficar convosco algum tempo, se o Senhor permitir.
8 पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे.
8 Mas eu ficarei em Éfeso até o Pentecostes.
9 कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत.
9 porque uma porta grande e eficaz é aberta para mim, e há muitos adversários.
10 तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभूचे सेवाकार्य करीत आहे.
10 Ora, se Timóteo vier, cuidem para que ele possa estar convosco sem temor; porque ele trabalha na obra do Senhor, como eu também.
11 कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे.
11 Portanto, não deixem nenhum homem desprezá-lo, mas conduzi-o em paz, para que venha ter comigo, pois o aguardo com os irmãos.
12 आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल.
12 E, no tocante ao nosso irmão Apolo, eu desejei grandemente que fosse até vós com os irmãos, mas a sua vontade não estava de todo para vir neste tempo, mas ele irá quando lhe for o tempo conveniente.
13 जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा.
13 Vigiai, estai firmes na fé, portai-vos como homens, e sede fortes.
14 तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.
14 Todas as vossas coisas sejam feitas com caridade.
15 तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,
15 Eu vos rogo, irmãos (sabeis que a casa de Estéfanas é as primícias da Acaia e que eles têm se dedicado ao ministério dos santos),
16 की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.
16 que também vos sujeiteis aos tais e a todo aquele que nos ajuda e trabalha.
17 स्तेफन, फर्तूनात व अखायिक यांच्या येण्याने मला फार आनंद झाला. त्यांच्यामुळे तुमच्यावतीने जे काही कमी होते त्यांची त्यांनी भरपाई केली.
17 Alegro-me com a vinda de Estéfanas, e de Fortunato, e de Acaico; porque o que estava faltando da vossa parte, eles supriram.
18 त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासित केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे.
18 Porque eles revigoraram o meu espírito e o vosso. Reconhecei, pois, aos tais.
19 आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात.
19 As igrejas da Ásia vos saúdam. Áquila e Priscila vos saúdam muito no Senhor, com a igreja que está em sua casa.
20 तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात.
20 Todos os irmãos vos saúdam. Cumprimentai-vos uns aos outros com beijo santo.
21 आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे.
21 Saudação da minha própria mão, de Paulo.
22 जो कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तो शापित असो. हे प्रभू या!
22 Se algum homem não ama o Senhor Jesus Cristo, seja anátema; Maranata.
23 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
23 A graça do nosso Senhor Jesus Cristo seja convosco.
24 तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी प्रीती असो. आमेन.
24 O meu amor seja com todos vós, em Cristo Jesus. Amém.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.