1 Coríntios 15
marc (MARC) vs BKJ
1 आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात.
1 Além disso, irmãos, eu vos declaro o evangelho que vos tenho pregado, o qual também recebestes, e no qual também estais firmes;
2 या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
2 pelo qual também sois salvos, se o guardardes na memória o que vos preguei, se não crestes em vão.
3 प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.
3 Porque eu vos entreguei primeiramente o que também recebi; como que Cristo morreu por nossos pecados, de acordo com as escrituras;
4 त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले,
4 e que foi sepultado, e que ele ressuscitou ao terceiro dia, de acordo com as escrituras;
5 आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना.
5 e que ele foi visto por Cefas, e então pelos doze;
6 त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत.
6 após isto, ele foi visto por cerca de quinhentos irmãos de uma vez, dos quais grande parte permanece até agora mas alguns já dormem.
7 याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.
7 Após isto, ele foi visto por Tiago, então por todos os apóstolos.
8 सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.
8 E, por último de todos, ele também foi visto por mim, como a alguém nascido fora do tempo devido.
9 कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला.
9 Porque eu sou o menor dos apóstolos, que não sou digno para ser chamado apóstolo, porque eu persegui a igreja de Deus.
10 आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले.
10 Mas pela graça de Deus, sou o que sou; e a sua graça que foi concedida a mim não foi em vão; mas eu trabalhei muito mais do que todos eles; todavia não eu, mas a graça de Deus que está comigo.
11 प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
11 Portanto, quer seja eu ou eles, assim nós pregamos, e assim tendes crido.
12 परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात?
12 Ora, embora se pregue que Cristo ressuscitou dos mortos, como dizem alguns dentre vós que não há ressurreição de mortos?
13 जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही.
13 Mas se não há ressurreição de mortos, então Cristo não ressuscitou;
14 आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
14 e, se Cristo não ressuscitou, então é vã a nossa pregação, e também é vã a vossa fé.
15 यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही.
15 Sim, e somos considerados como falsas testemunhas de Deus, pois testificamos de Deus, que ressuscitou a Cristo, ao qual ele não ressuscitou, se é que os mortos não ressuscitam.
16 जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही;
16 Porque, se os mortos não ressuscitam, então Cristo não ressuscitou;
17 आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात.
17 e, se Cristo não ressuscitou, a vossa fé é vã, e ainda estais nos vossos pecados.
18 आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे.
18 E também os que dormiram em Cristo pereceram.
19 जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.
19 Se apenas nesta vida temos esperança em Cristo, somos os mais miseráveis de todos os homens.
20 परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे.
20 Mas, agora é Cristo ressuscitado dos mortos, tornando-se as primícias dos que dormem.
21 कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे.
21 Pois desde que a morte veio por um homem, também por um homem veio a ressurreição dos mortos.
22 कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील
22 Porque, assim como em Adão todos morrem, igualmente também em Cristo todos serão vivificados.
23 प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील.
23 Mas cada homem em sua própria ordem: Cristo, as primícias; depois os que são de Cristo, na sua vinda.
24 नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील.
24 Então virá o fim, quando ele tiver entregue o reino a Deus, ao Pai, e quando ele tiver derrubado todo o governo, e toda a autoridade, e poder.
25 कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे.
25 Pois ele deve reinar, até que ele tenha colocado todos os inimigos debaixo de seus pés.
26 शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल.
26 O último inimigo que será destruído é a morte.
27 कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.” आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही.
27 Porque ele colocou todas as coisas debaixo de seus pés. Mas, quando ele diz que todas as coisas lhe estão sujeitas, está claro que exclui-se aquele que colocou todas as coisas sob ele.
28 हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे.
28 E, quando todas as coisas lhe estiverem sujeitas, então o mesmo Filho também se sujeitará àquele que todas as coisas lhe sujeitou, para que Deus possa ser tudo em todos.
29 जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे?
29 Do contrário, o que farão os que são batizados pelos mortos, se de modo algum os mortos ressuscitam? Por que então eles são batizados pelos mortos?
30 आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे?
30 E por que estamos nós em perigo a toda hora?
31 निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो.
31 Eu protesto pela alegria que eu tenho em Cristo Jesus, Senhor nosso, cada dia morro.
32 जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर,
32 Se da maneira do homem eu lutei contra animais em Éfeso, que vantagem tenho, se os mortos não são ressuscitados? Comamos e bebamos, pois amanhã morreremos.
33 तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.”
33 Não se engane: As comunicações malignas corrompem as boas maneiras.
34 तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.
34 Despertai para a justiça e não pequeis; porque alguns não têm o conhecimento de Deus; eu falo isto para vossa vergonha.
35 आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?”
35 Mas alguns homens dirão: Como são ressuscitados os mortos, e com que corpo eles virão?
36 किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.
36 Tolo; o que tu semeias não é despertado, se não morrer;
37 तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्या कशाचे तरी असते.
37 e, quando tu semeias, não semeias o corpo que será; mas um grão desnudo, pode ser de trigo ou de algum outro grão;
38 मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.
38 mas Deus dá-lhe o corpo como lhe agrada, e a cada semente o seu próprio corpo.
39 सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक.
39 Nem toda carne é a mesma carne; mas há um tipo de carne dos homens, e outra carne dos animais, outra dos peixes, e outra das aves.
40 त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्या प्रकारचे आहे.
40 Há também corpos celestes, e corpos terrestres, mas a glória dos celestes é uma, e a glória dos terrestres é outra.
41 सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्या प्रकारचे आणि तार्यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्यांचेही तेज वेगवेगळे असते.
41 Há uma glória do sol, e outra glória da lua, e outra glória das estrelas; porque uma estrela difere de outra estrela em glória.
42 अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते.
42 Assim também é a ressurreição dos mortos. É semeado na corrupção, e ressuscitado em incorrupção;
43 अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.
43 é semeado na desonra, e ressuscitado em glória. É semeado na fraqueza, e ressuscitado em poder;
44 नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते.
44 é semeado no corpo natural, e ressuscitado no corpo espiritual. Se há um corpo natural, há corpo espiritual.
45 असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.
45 E assim está escrito: O primeiro homem, Adão, foi feito em alma vivente; o último Adão, foi feito em espírito vivificante.
46 प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.
46 Mas não é primeiro o que é espiritual, mas o que é natural; e depois o que é espiritual.
47 पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.
47 O primeiro homem é da terra, terreno; o segundo homem é o Senhor, do céu.
48 जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत.
48 Tal qual o terreno, tais são também os terrenos; e tal qual o celestial, tais são também os celestiais.
49 आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.
49 E assim como temos portado a imagem do terreno, assim também portaremos a imagem do celestial.
50 माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही.
50 Agora digo-vos isto, irmãos: Que carne e sangue não podem herdar o reino de Deus, nem a corrupção herdar a incorrupção.
51 ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.
51 Eis aqui vos digo um mistério: Nem todos dormiremos, mas todos seremos transformados,
52 हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.
52 em um momento, em um piscar de olhos, ante a última trombeta; porque a trombeta soará, e os mortos serão ressuscitados incorruptíveis, e nós seremos transformados.
53 कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे.
53 Porque é necessário que este corruptível seja revestido de incorruptibilidade, e que isto que é mortal se revista da imortalidade.
54 जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”
54 E, quando este corruptível tiver sido revestido de incorruptibilidade, e isto que é mortal tiver sido revestido de imortalidade, então se cumprirá provérbio, que está escrito: A morte foi tragada em vitória.
55 “अरे मरणा, तुझा विजय कुठे?
55 Ó morte, onde está o teu ferrão? Ó sepultura, onde está a tua vitória?
56 कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
56 O aguilhão da morte é o pecado, e a força do pecado é a lei.
57 परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
57 Mas graças a Deus que nos dá a vitória por nosso Senhor Jesus Cristo.
58 यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
58 Portanto, meus amados irmãos, sede firmes, inabaláveis, sempre abundantes na obra do Senhor, sabendo que o vosso trabalho não é vão no Senhor.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.