1 Coríntios 14

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे.
1 Segui o amor e procurai, com zelo, os dons espirituais, mas principalmente que profetizeis.
2 कारण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा माणसाशी नव्हे तर परमेश्वराशी बोलता. निश्चित, तुम्ही आत्म्याद्वारे गूढ बोलत असाल तर तुमचे बोलणे कोणालाही समजणार नाही.
2 Pois quem fala em outra língua não fala a homens, senão a Deus, visto que ninguém o entende, e em espírito fala mistérios.
3 परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो.
3 Mas o que profetiza fala aos homens, edificando, exortando e consolando.
4 जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. परंतु जो संदेश देतो, तो मंडळीची प्रगती करण्यास मदत करतो.
4 O que fala em outra língua a si mesmo se edifica, mas o que profetiza edifica a igreja.
5 तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्‍यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.
5 Eu quisera que vós todos falásseis em outras línguas; muito mais, porém, que profetizásseis; pois quem profetiza é superior ao que fala em outras línguas, salvo se as interpretar, para que a igreja receba edificação.
6 बंधू व भगिनींनो, समजा मी तुमच्याकडे आलो आणि अन्य भाषेत बोलू लागलो, तर तुम्हाला माझा काय फायदा, याउलट मी तुमच्यासाठी काही प्रकटीकरण, किंवा ज्ञान किंवा संदेश दिला किंवा वचनाचा बोध आणला तर चांगले होणार नाही का?
6 Agora, porém, irmãos, se eu for ter convosco falando em outras línguas, em que vos aproveitarei, se vos não falar por meio de revelação, ou de ciência, ou de profecia, ou de doutrina?
7 बासरी किंवा वीणा यांसारख्या निर्जीव वस्तू ध्वनी उत्पन्न करतात, परंतु प्रत्येक वाद्याच्या स्वरात भिन्नता असल्याशिवाय कोणते वाद्य वाजत आहे हे कसे समजणार?
7 É assim que instrumentos inanimados, como a flauta ou a cítara, quando emitem sons, se não os derem bem distintos, como se reconhecerá o que se toca na flauta ou cítara?
8 जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?
8 Pois também se a trombeta der som incerto, quem se preparará para a batalha?
9 तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्‍याबरोबर बोलत आहात असे होईल.
9 Assim, vós, se, com a língua, não disserdes palavra compreensível, como se entenderá o que dizeis? Porque estareis como se falásseis ao ar.
10 निःसंशय जगामध्ये निरनिराळ्या भाषा आहेत, परंतु एकही अर्थाविना नाही.
10 Há, sem dúvida, muitos tipos de vozes no mundo; nenhum deles, contudo, sem sentido.
11 जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन.
11 Se eu, pois, ignorar a significação da voz, serei estrangeiro para aquele que fala; e ele, estrangeiro para mim.
12 तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.
12 Assim, também vós, visto que desejais dons espirituais, procurai progredir, para a edificação da igreja.
13 या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
13 Pelo que, o que fala em outra língua deve orar para que a possa interpretar.
14 कारण मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझे मन निष्फळ आहे.
14 Porque, se eu orar em outra língua, o meu espírito ora de fato, mas a minha mente fica infrutífera.
15 मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन.
15 Que farei, pois? Orarei com o espírito, mas também orarei com a mente; cantarei com o espírito, mas também cantarei com a mente.
16 जेव्हा तुम्ही फक्त आत्म्याने परमेश्वराची उपकारस्तुती कराल, तर जो चौकशी करणारा किंवा अविश्वासू व्यक्ती, ज्याला तुम्ही काय बोलता हे समजत नाही तो तुमच्या स्तुतीला “आमेन” कसा म्हणू शकेल?
16 E, se tu bendisseres apenas em espírito, como dirá o indouto o amém depois da tua ação de graças? Visto que não entende o que dizes;
17 तुम्ही पुरेशी स्तुती करता, परंतु याद्वारे कोणाचीच उन्नती होणार नाही.
17 porque tu, de fato, dás bem as graças, mas o outro não é edificado.
18 मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलू शकतो, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.
18 Dou graças a Deus, porque falo em outras línguas mais do que todos vós.
19 परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन.
19 Contudo, prefiro falar na igreja cinco palavras com o meu entendimento, para instruir outros, a falar dez mil palavras em outra língua.
20 प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा.
20 Irmãos, não sejais meninos no juízo; na malícia, sim, sede crianças; quanto ao juízo, sede homens amadurecidos.
21 नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे:
21 Na lei está escrito: Falarei a este povo por homens de outras línguas e por lábios de outros povos, e nem assim me ouvirão, diz o Senhor.
22 अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्‍यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नाही.
22 De sorte que as línguas constituem um sinal não para os crentes, mas para os incrédulos; mas a profecia não é para os incrédulos, e sim para os que creem.
23 तरीपण चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य तुमच्या मंडळीत आला आणि त्याने तुम्हा सर्वांना अन्य भाषेतून बोलताना ऐकले, तर तुम्ही सर्वजण वेडे आहात असेच त्याला वाटेल.
23 Se, pois, toda a igreja se reunir no mesmo lugar, e todos se puserem a falar em outras línguas, no caso de entrarem indoutos ou incrédulos, não dirão, porventura, que estais loucos?
24 परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील.
24 Porém, se todos profetizarem, e entrar algum incrédulo ou indouto, é ele por todos convencido e por todos julgado;
25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.
25 tornam-se-lhe manifestos os segredos do coração, e, assim, prostrando-se com a face em terra, adorará a Deus, testemunhando que Deus está, de fato, no meio de vós.
26 मग बंधूंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल.
26 Que fazer, pois, irmãos? Quando vos reunis, um tem salmo, outro, doutrina, este traz revelação, aquele, outra língua, e ainda outro, interpretação. Seja tudo feito para edificação.
27 कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि दुसरा अर्थ सांगेल.
27 No caso de alguém falar em outra língua, que não sejam mais do que dois ou quando muito três, e isto sucessivamente, e haja quem interprete.
28 पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्‍यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
28 Mas, não havendo intérprete, fique calado na igreja, falando consigo mesmo e com Deus.
29 संदेश देणार्‍यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी.
29 Tratando-se de profetas, falem apenas dois ou três, e os outros julguem.
30 बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्‍यांनी शांत व्हावे.
30 Se, porém, vier revelação a outrem que esteja assentado, cale-se o primeiro.
31 ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल.
31 Porque todos podereis profetizar, um após outro, para todos aprenderem e serem consolados.
32 संदेश देणार्‍याचे आत्मे संदेश देणार्‍यांच्या नियंत्रणात असतात.
32 Os espíritos dos profetas estão sujeitos aos próprios profetas;
33 कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.
33 porque Deus não é de confusão, e sim de paz. Como em todas as igrejas dos santos,
34 स्त्रियांनी मंडळीमध्ये शांत राहवे. स्त्रियांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी अधीन राहवे.
34 conservem-se as mulheres caladas nas igrejas, porque não lhes é permitido falar; mas estejam submissas como também a lei o determina.
35 त्यांना काही गोष्टींची चौकशी करावयाची असल्यास, त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे. कारण एखाद्या स्त्रीने मंडळीला प्रवचन देणे ही लज्जास्पद बाब आहे.
35 Se, porém, querem aprender alguma coisa, interroguem, em casa, a seu próprio marido; porque para a mulher é vergonhoso falar na igreja.
36 परमेश्वराच्या वचनाचा प्रारंभ तुम्हापासूनच झाला काय? आणि हे वचन फक्त तुम्हा लोकांपर्यंतच पोहोचले काय?
36 Porventura, a palavra de Deus se originou no meio de vós ou veio ela exclusivamente para vós outros?
37 आपल्याला पवित्र आत्म्याकडून संदेश देण्याचे किंवा दुसरे दान मिळाले आहे, असे वाटणार्‍यांनी हे ओळखावे, की मी जे लिहित आहे ती प्रभूची आज्ञा आहे.
37 Se alguém se considera profeta ou espiritual, reconheça ser mandamento do Senhor o que vos escrevo.
38 जर कोणी याकडे दुर्लक्ष करेल, तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष केल्या जाईल.
38 E, se alguém o ignorar, será ignorado.
39 यास्तव, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, संदेश देण्याची उत्कट इच्छा धरा आणि अन्य भाषेतून जे बोलतात त्यांना मना करू नका.
39 Portanto, meus irmãos, procurai com zelo o dom de profetizar e não proibais o falar em outras línguas.
40 तरीपण प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित आणि योग्यरीतिने केली जावी.
40 Tudo, porém, seja feito com decência e ordem.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.