Neemias 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते,
1 Ora, sucedeu que, quando Sambalate, e Tobias, e Gesém, o árabe, e o restante dos nossos inimigos, ouviram que eu havia edificado a muralha, e que não havia fenda (embora naquele tempo eu não tivesse posto as portas nos portões);
2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
2 que Sambalate e Gesém mandaram dizer-me: Vem, reunamo-nos em algumas das aldeias da planície de Ono. No entanto, eles pensavam em me fazer mal.
3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
3 E enviei-lhes mensageiros, dizendo: Estou fazendo uma grande obra, de modo que não posso descer; por que cessaria a obra, enquanto eu a deixo e desço até vós?
4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.
4 Todavia, desta forma enviaram a mim quatro vezes; e da mesma maneira lhes respondi.
5 मग, पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसाकरवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते.
5 Então Sambalate, da mesma maneira, pela quinta vez, me enviou o seu servo com uma carta aberta na sua mão;
6 त्यामध्ये असे लिहीले होते.
6 Na qual estava escrito: É relatado entre os pagãos, e Gesém o disse, que tu e os judeus pensam em se rebelar; por esta causa tu edificas a muralha, para que possas ser o seu rei, segundo estas palavras.
7 “यहूदात राजा आहे, असे स्वत:बद्दल घोषित करायला तू यरूशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
7 E tu também indicaste profetas para pregarem de ti em Jerusalém, dizendo: Há um rei em Judá; e agora isto será relatado ao rei, segundo estas palavras. Vem, portanto, agora, e consultemos juntamente.
8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
8 Então mandei dizer-lhe: De tudo o que dizes coisa nenhuma sucedeu; mas tu as inventas do teu próprio coração.
9 आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
9 Porque todos eles nos fizeram temerosos, dizendo: As suas mãos serão enfraquecidas da obra, para que ela não seja feita. Agora, portanto, ó Deus, fortalece as minhas mãos.
10 मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.”
10 Depois eu fui à casa de Semaías, o filho de Delaías, o filho de Meetabel, que estava recluso; e ele disse: Reunamo-nos na casa de Deus, dentro do templo, e fechemos as portas do templo; porque eles virão te matar; sim, à noite virão matar-te.
11 पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचविण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही.”
11 E eu disse: Deveria um homem como eu fugir? E quem há que, sendo como eu sou entraria no templo para salvar a sua vida? Eu não entrarei.
12 शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते.
12 E eis que eu percebi que Deus não o havia mandado; mas que ele pronunciava esta profecia contra mim; porquanto Tobias e Sambalate lhe haviam contratado.
13 मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते.
13 Para isso ele foi contratado, para que eu ficasse temeroso, e assim fizesse, e pecasse, e para que pudessem ter assunto para um mau relato, para que eles pudessem me afrontar.
14 देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे.
14 Lembra-te, meu Deus, de Tobias e de Sambalate, conforme estas suas obras, e da profetisa Noadias, e do restante dos profetas, que quiseram me atemorizar.
15 मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरूशलेमेच्या भिंतीचे काम बावन्न दिवसानी समाप्त झाले.
15 Assim, foi terminada a muralha no vigésimo quinto dia do mês de elul, em cinquenta e dois dias.
16 हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
16 E sucedeu que, tendo ouvido todos os nossos inimigos, e todos os pagãos que estavam junto a nós, ficaram mui desanimados aos seus próprios olhos; porque perceberam que esta obra fora feita pelo nosso Deus.
17 त्या दिवसात यहूदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबीया त्यांना उत्तरे देत होता.
17 Além disso, naqueles dias os nobres de Judá enviaram muitas cartas a Tobias, e as cartas de Tobias vinham para eles.
18 यहूदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते. कारण, आरहाचा पुत्र शखन्या याचा तोबीया हा जावई होता. तोबीयाचा पुत्र योहानान याचे मशुल्लामच्या कन्येशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र.
18 Porquanto havia muitos em Judá aliados a ele, porque ele era o genro de Secanias, o filho Ará; e o seu filho Joanã havia tomado a filha de Mesulão, o filho de Berequias.
19 तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत.
19 Eles também relataram as suas boas obras diante de mim, e proferiram as minhas palavras a ele. E Tobias enviava cartas para me atemorizar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Neemias 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.