Neemias 4

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
1 Quando Sambalate soube que estávamos reconstruindo o muro, ficou furioso. Ridicularizou os judeus
2 सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”
2 e, na presença de seus compatriotas e dos poderosos de Samaria, disse: "O que aqueles frágeis judeus estão fazendo? Será que vão restaurar o seu muro? Irão oferecer sacrifícios? Irão terminar a obra num só dia? Será que vão conseguir ressuscitar pedras de construção daqueles montes de entulho e de pedras queimadas? "
3 तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
3 Tobias, o amonita, que estava ao seu lado, completou: "Pois que construam! Basta que uma raposa suba lá, para que esse muro de pedras desabe! "
4 आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो.
4 Ouve-nos, ó Deus, pois estamos sendo desprezados. Faze cair sobre eles a zombaria. E sejam eles levados prisioneiros como despojo para outra terra.
5 त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयांदेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.
5 Não perdoes os seus pecados nem apagues as suas maldades, pois provocaram a tua ira diante dos construtores.
6 यरूशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला कारण लोकांनी मनापासून काम केले.
6 Nesse meio tempo fomos reconstruindo o muro, até que em toda a sua extensão chegamos à metade da sua altura, pois o povo estava totalmente dedicado ao trabalho.
7 पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
7 Quando, porém, Sambalate, Tobias, os árabes, os amonitas e os homens de Asdode souberam que os reparos nos muros de Jerusalém tinham avançado e que as brechas estavam sendo fechadas, ficaram furiosos.
8 तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरूशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला.
8 Todos juntos planejaram atacar Jerusalém e causar confusão.
9 पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
9 Mas nós oramos ao nosso Deus e colocamos guardas de dia e de noite para proteger-nos deles.
10 मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.”
10 Enquanto isso, o povo de Judá começou a dizer: "Os trabalhadores já não têm mais forças e ainda há muito entulho. Por nós mesmos não conseguiremos reconstruir o muro".
11 आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”
11 E os nossos inimigos diziam: "Antes que descubram qualquer coisa ou nos vejam, estaremos bem ali no meio deles; vamos matá-los e acabar com o trabalho deles".
12 त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले.
12 Os judeus que moravam perto deles dez vezes nos preveniram: "Para onde quer que vocês se virarem, saibam que seremos atacados de todos os lados".
13 तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती.
13 Por isso posicionei alguns do povo atrás dos pontos mais baixos do muro, nos lugares abertos, divididos por famílias, armados de espadas, lanças e arcos.
14 सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
14 Fiz uma rápida inspeção e imediatamente disse aos nobres, aos oficiais e ao restante do povo: "Não tenham medo deles. Lembrem-se de que o Senhor é grande e temível, e lutem por seus irmãos, por seus filhos e por suas filhas, por suas mulheres e por suas casas".
15 आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला.
15 Quando os nossos inimigos descobriram que sabíamos de tudo e que Deus tinha frustrado a sua trama, todos nós voltamos para o muro, cada um para o seu trabalho.
16 त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते.
16 Daquele dia em diante, enquanto a metade dos meus homens fazia o trabalho, a outra metade permanecia armada de lanças, escudos, arcos e couraças. Os oficiais davam apoio a todo o povo de Judá
17 बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
17 que estava construindo o muro. Aqueles que transportavam material faziam o trabalho com uma mão e com a outra seguravam uma arma,
18 तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता.
18 e cada um dos construtores trazia na cintura uma espada enquanto trabalhava; e comigo ficava um homem pronto para tocar a trombeta.
19 मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
19 Então eu disse aos nobres, aos oficiais e ao restante do povo: "A obra é grande e extensa, e estamos separados, distantes uns dos outros, ao longo do muro.
20 तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.”
20 Do lugar de onde ouvirem o som da trombeta, juntem-se a nós ali. Nosso Deus lutará por nós! "
21 अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
21 Dessa maneira prosseguimos o trabalho com metade dos homens empunhando espadas, desde o raiar da alvorada até o cair da tarde.
22 त्यावेळी मी लोकांस असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरूशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
22 Naquela ocasião eu também disse ao povo: "Cada um de vocês e o seu ajudante devem ficar à noite em Jerusalém, para que possam servir de guarda à noite e trabalhar durante o dia".
23 मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.
23 Eu, os meus irmãos, os meus homens de confiança e os guardas que estavam comigo nem tirávamos a roupa, e cada um permanecia de arma na mão.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Neemias 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.