Neemias 1

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.
1 As palavras de Neemias, o filho de Hacalias. E sucedeu no mês de quisleu, no vigésimo ano, quando eu estava no palácio em Susã,
2 माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरूशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.
2 que veio Hanani, um dos meus irmãos, ele e alguns homens de Judá; e eu perguntei-lhes a respeito dos judeus que haviam escapado, e que restaram do cativeiro, e a respeito de Jerusalém.
3 त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
3 E eles me disseram: Os restantes, que ficaram do cativeiro, lá na província, estão em grande aflição e desprezo; e a muralha de Jerusalém também está demolida, e os seus portões estão queimados pelo fogo.
4 आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.
4 E sucedeu, quando ouvi estas palavras, que eu me assentei e chorei, e lamentei alguns dias, e jejuei, e orei diante do Deus do céu,
5 मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस.
5 e disse: Eu te busco, ó ­SENHOR Deus do céu, o grande e terrível Deus, que guarda o pacto e a misericórdia por aqueles que o amam e observam os seus mandamentos;
6 तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.
6 que agora estejam atentos os teus ouvidos, e os teus olhos abertos, para que possas ouvir a oração do teu servo, a qual oro diante de ti agora, dia e noite, pelos filhos de Israel, os teus servos, e confesso os pecados dos filhos de Israel, os quais temos pecado contra ti; tanto eu, como a casa do meu pai temos pecado.
7 आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.
7 Temos agido mui corruptamente contra ti, e não temos guardado os mandamentos, nem os estatutos, nem os juízos que tu ordenaste ao teu servo Moisés.
8 कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन,
8 Lembra-te, rogo-te, a palavra que tu ordenaste ao teu servo Moisés, dizendo: Se vós transgredirdes, eu vos espalharei por entre as nações;
9 पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”
9 mas se vós converterdes a mim, e guardardes os meus mandamentos, e praticá-los; então, ainda que os vossos rejeitados estejam na extremidade do céu, ainda assim eu os reunirei de lá, e os trarei ao lugar que tenho escolhido para ali pôr o meu nome.
10 आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस.
10 Ora, estes são os teus servos e o teu povo, os quais tens redimido pelo teu grande poder, e pela tua mão forte.
11 तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
11 Ó Senhor, rogo-te, que estejam atentos os teus ouvidos à oração do teu servo, e à oração dos teus servos, que desejam temer o teu nome; e faze prosperar hoje o teu servo, e concede-lhe misericórdia à vista deste homem. Porquanto, eu era o copeiro do rei.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Neemias 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.