Mateus 27
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVT
1 जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला.
1 De manhã cedo, os principais sacerdotes e líderes do povo se reuniram outra vez para planejar uma maneira de levar Jesus à morte.
2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.
2 Então o amarraram, o levaram e o entregaram a Pilatos, o governador romano.
3 तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला.
3 Quando Judas, que o havia traído, viu que Jesus tinha sido condenado à morte, encheu-se de remorso e devolveu as trinta moedas de prata aos principais sacerdotes e líderes do povo,
4 तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
4 dizendo: “Pequei, pois traí um homem inocente”. “Que nos importa?”, retrucaram eles. “Isso é problema seu.”
5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
5 Então Judas jogou as moedas de prata no templo, saiu e se enforcou.
6 मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
6 Os principais sacerdotes juntaram as moedas e disseram: “Não seria certo colocar este dinheiro no tesouro do templo, pois é dinheiro manchado de sangue”.
7 तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली.
7 Então resolveram comprar o campo do oleiro e transformá-lo num cemitério para estrangeiros.
8 त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात.
8 Por isso, até hoje ele se chama Campo de Sangue.
9 तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले.
9 Cumpriu-se, assim, a profecia de Jeremias que diz: “Tomaram as trinta peças de prata, preço pelo qual ele foi avaliado pelo povo de Israel,
10 मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.”
10 e compraram o campo do oleiro, conforme o Senhor ordenou”.
11 मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
11 Agora Jesus estava diante de Pilatos, o governador romano, que lhe perguntou: “Você é o rei dos judeus?”. Jesus respondeu: “É como você diz”.
12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
12 No entanto, quando os principais sacerdotes e os líderes do povo fizeram acusações contra ele, Jesus permaneceu calado.
13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
13 Então Pilatos perguntou: “Você não ouve essas acusações que fazem contra você?”.
14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
14 Mas, para surpresa do governador, Jesus nada disse.
15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
15 A cada ano, durante a festa da Páscoa, era costume do governador libertar um prisioneiro, qualquer um que a multidão escolhesse.
16 तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता.
16 Nesse ano, havia um prisioneiro, famoso por sua maldade, chamado Barrabás.
17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
17 Quando a multidão se reuniu diante de Pilatos naquela manhã, ele perguntou: “Quem vocês querem que eu solte: Barrabás ou Jesus, chamado Cristo?”.
18 कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते.
18 Pois ele sabia muito bem que os líderes religiosos judeus tinham prendido Jesus por inveja.
19 तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”
19 Nesse momento, enquanto Pilatos estava sentado no tribunal, sua esposa lhe mandou o seguinte recado: “Deixe esse homem inocente em paz. Na noite passada, tive um sonho a respeito dele e fiquei muito perturbada”.
20 पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले.
20 Enquanto isso, os principais sacerdotes e os líderes do povo convenceram a multidão a pedir que Barrabás fosse solto e Jesus executado.
21 राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.”
21 Então o governador perguntou outra vez: “Qual dos dois vocês querem que eu lhes solte?”. A multidão gritou em resposta: “Barrabás!”.
22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
22 Pilatos perguntou: “E o que farei com Jesus, chamado Cristo?”. “Crucifique-o!”, gritou a multidão.
23 आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
23 “Por quê?”, quis saber Pilatos. “Que crime ele cometeu?” Mas a multidão gritou ainda mais alto: “Crucifique-o!”.
24 लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.”
24 Pilatos viu que de nada adiantava insistir e que um tumulto se iniciava. Assim, mandou buscar uma bacia com água, lavou as mãos diante da multidão e disse: “Estou inocente do sangue deste homem. A responsabilidade é de vocês”.
25 सर्व लोक म्हणू लागले, “त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”
25 Todo o povo gritou em resposta: “Que nós e nossos descendentes sejamos responsabilizados pela morte dele!”.
26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले.
26 Então Pilatos lhes soltou Barrabás. E, depois de mandar açoitar Jesus, entregou-o para ser crucificado.
27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली.
27 Alguns dos soldados do governador levaram Jesus ao quartel e chamaram todo o regimento.
28 त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला.
28 Tiraram as roupas de Jesus e puseram nele um manto vermelho.
29 मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!”
29 Teceram uma coroa de espinhos e a colocaram em sua cabeça. Em sua mão direita, puseram um caniço, como se fosse um cetro. Ajoelhavam-se diante dele e zombavam: “Salve, rei dos judeus!”.
30 आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले.
30 Cuspiam nele, tomavam-lhe o caniço da mão e com ele batiam em sua cabeça.
31 येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
31 Quando se cansaram de zombar dele, tiraram o manto e o vestiram novamente com suas roupas. Então o levaram para ser crucificado.
32 ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले.
32 No caminho, encontraram um homem chamado Simão, de Cirene, e os soldados o obrigaram a carregar a cruz.
33 जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले.
33 Então saíram para um lugar chamado Gólgota (que quer dizer “Lugar da Caveira”).
34 तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
34 Os soldados lhe deram para beber vinho misturado com fel, mas, quando Jesus o provou, recusou-se a beber.
35 त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
35 Depois de pregá-lo na cruz, os soldados tiraram sortes para dividir suas roupas.
36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
36 Então, sentaram-se em redor e montaram guarda.
37 आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले.
37 Acima de sua cabeça estava presa uma tabuleta com a acusação feita contra ele: “Este é Jesus, o Rei dos judeus”.
38 दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले.
38 Dois criminosos foram crucificados com ele, um à sua direita e outro à sua esquerda.
39 जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून
39 O povo que passava por ali gritava insultos e sacudia a cabeça, em zombaria:
40 म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.
40 “Você disse que destruiria o templo e o reconstruiria em três dias. Pois bem, se é o Filho de Deus, salve a si mesmo e desça da cruz!”.
41 तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले,
41 Os principais sacerdotes, os mestres da lei e os líderes do povo também zombavam de Jesus.
42 याने दुसऱ्यांना वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्राएलाचा राजा आहे. असेल, त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
42 “Salvou os outros, mas não pode salvar a si mesmo!”, diziam. “Quer dizer que ele é o rei de Israel? Que desça da cruz agora mesmo e creremos nele!
43 तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे.
43 Ele confiou em Deus, então que Deus o salve agora, se quiser. Pois ele disse: ‘Eu sou o Filho de Deus’.”
44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
44 Até os criminosos que tinham sido crucificados com ele o insultavam da mesma forma.
45 मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.
45 Ao meio-dia, desceu sobre toda a terra uma escuridão que durou três horas.
46 सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
46 Por volta das três da tarde, Jesus clamou em alta voz: “ Eli, Eli, lamá sabactâni ?”, que quer dizer: “Meu Deus, meu Deus, por que me abandonaste?”.
47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.”
47 Alguns dos que estavam ali pensaram que ele chamava o profeta Elias.
48 त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला.
48 Um deles correu, ensopou uma esponja com vinagre e a ergueu num caniço para que ele bebesse.
49 परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.”
49 Os outros, porém, disseram: “Esperem! Vamos ver se Elias vem salvá-lo”.
50 पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला.
50 Então Jesus clamou em alta voz novamente e entregou seu espírito.
51 पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले.
51 Naquele momento, a cortina do santuário do templo se rasgou em duas partes, de cima até embaixo. A terra estremeceu, rochas se partiram
52 कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले.
52 e sepulturas se abriram. Muitos do povo santo que haviam morrido ressuscitaram.
53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले.
53 Saíram do cemitério depois da ressurreição de Jesus, entraram na cidade santa de Jerusalém e apareceram a muita gente.
54 आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
54 O oficial romano e os outros soldados que vigiavam Jesus ficaram aterrorizados com o terremoto e com tudo que havia acontecido, e disseram: “Este homem era verdadeiramente o Filho de Deus!”.
55 तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या.
55 Muitas mulheres que tinham vindo da Galileia com Jesus para servi-lo olhavam de longe.
56 त्यांच्यात मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई या तेथे होत्या.
56 Entre elas estavam Maria Madalena, Maria, mãe de Tiago e José, e a mãe dos filhos de Zebedeu.
57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता.
57 Ao entardecer, José, um homem rico de Arimateia que tinha se tornado seguidor de Jesus,
58 तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला.
58 foi a Pilatos e pediu o corpo de Jesus. Pilatos ordenou que lhe entregassem o corpo.
59 नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.
59 José tomou o corpo e o envolveu num lençol limpo, feito de linho,
60 आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला.
60 e o colocou num túmulo novo, de sua propriedade, escavado na rocha. Então rolou uma grande pedra na entrada do túmulo e foi embora.
61 मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.
61 Maria Madalena e a outra Maria estavam ali, sentadas em frente ao túmulo.
62 त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले.
62 No dia seguinte, no sábado, os principais sacerdotes e os fariseus foram a Pilatos
63 ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’
63 e disseram: “Senhor, lembramos que, quando ainda vivia, aquele mentiroso disse: ‘Depois de três dias ressuscitarei’.
64 म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
64 Por isso, pedimos que lacre o túmulo até o terceiro dia. Isso impedirá que seus discípulos roubem o corpo e depois digam a todos que ele ressuscitou. Se isso acontecer, estaremos em pior situação que antes”.
65 पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.”
65 Pilatos respondeu: “Levem soldados e guardem o túmulo como acharem melhor”.
66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
66 Então eles lacraram o túmulo e puseram guardas para protegê-lo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.