Levítico 8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
1 O Senhor disse a Moisés:
2 अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
2 "Traga Arão e seus filhos, suas vestes, o óleo da unção, o novilho para a oferta pelo pecado, os dois carneiros e o cesto de pães sem fermento;
3 दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.
3 e reúna toda a comunidade à entrada da Tenda do Encontro".
4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.
4 Moisés fez como o Senhor lhe ordenou, e a comunidade reuniu-se à entrada da Tenda do Encontro.
5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”
5 Então Moisés disse à comunidade: "Foi isto que o Senhor mandou fazer";
6 मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
6 e levou Arão e seus filhos à frente e mandou-os banhar-se com água;
7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.
7 pôs a túnica em Arão, colocou-lhe o cinto e o manto, e pôs sobre ele o colete sacerdotal; depois a ele prendeu o manto sacerdotal com o cinturão;
8 मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;
8 colocou também o peitoral, e nele pôs o Urim e o Tumim;
9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
9 e colocou o turbante na cabeça de Arão com a lâmina de ouro, isto é, a coroa sagrada, na frente do turbante, conforme o Senhor tinha ordenado a Moisés.
10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.
10 Depois Moisés pegou o óleo da unção e ungiu o tabernáculo e tudo o que nele havia, e assim os consagrou.
11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले.
11 Aspergiu sete vezes o óleo sobre o altar, ungindo o altar e todos os seus utensílios e a bacia com o seu suporte, para consagrá-los.
12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले.
12 Derramou o óleo da unção sobre a cabeça de Arão para ungi-lo e consagrá-lo.
13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
13 Trouxe então os filhos de Arão à frente, vestiu-os com suas túnicas e cintos, e colocou-lhes gorros, conforme o Senhor lhe havia ordenado.
14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
14 Em seguida trouxe o novilho para a oferta pelo pecado, e Arão e seus filhos puseram-lhe as mãos sobre a cabeça.
15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
15 Moisés sacrificou o novilho, e com o dedo pôs um pouco do sangue em todas as pontas do altar para purificá-lo. Derramou o restante do sangue na base do altar e assim o consagrou para fazer propiciação por ele.
16 गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
16 Moisés pegou também toda a gordura que cobre as vísceras, o lóbulo do fígado e os dois rins com a gordura que os cobre, e os queimou no altar.
17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
17 Mas o novilho com o seu couro, a sua carne e o seu excremento, ele os queimou fora do acampamento, conforme o Senhor lhe havia ordenado.
18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
18 Mandou trazer então o carneiro para o holocausto, e Arão e seus filhos puseram as mãos sobre a cabeça do carneiro.
19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
19 A seguir Moisés sacrificou o carneiro e derramou o sangue nos lados do altar.
20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.
20 Depois, cortou o carneiro em pedaços; queimou a cabeça, os pedaços e a gordura.
21 त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
21 Lavou as vísceras e as pernas, e queimou o carneiro inteiro sobre o altar, como holocausto, oferta de aroma agradável ao Senhor, preparado no fogo, conforme o Senhor lhe havia ordenado.
22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
22 Depois mandou trazer o outro carneiro, o carneiro para a oferta de ordenação, e Arão e seus filhos colocaram as mãos sobre a cabeça do carneiro.
23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
23 Moisés sacrificou o carneiro e pôs um pouco do sangue na ponta da orelha direita de Arão, no polegar da sua mão direita e no polegar do seu pé direito.
24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
24 Moisés também mandou que os filhos de Arão se aproximassem, e sobre cada um pôs um pouco do sangue na ponta da orelha direita, no polegar da mão direita e no polegar do pé direito; e derramou o restante do sangue nos lados do altar.
25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
25 Apanhou a gordura, a cauda gorda, toda a gordura que cobre as vísceras, o lóbulo do fígado, os dois rins e a gordura que os cobre e a coxa direita.
26 परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
26 Então, do cesto de pães sem fermento, que estava perante o Senhor, apanhou um pão comum, outro feito com óleo e um pão fino, colocando-os sobre as porções de gordura e sobre a coxa direita.
27 हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
27 Pôs tudo nas mãos de Arão e de seus filhos e os moveu perante o Senhor como gesto ritual de apresentação.
28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते.
28 Depois Moisés pegou de volta das mãos deles e queimou tudo no altar, em cima do holocausto, como uma oferta de ordenação, preparada no fogo, de aroma agradável ao Senhor.
29 मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
29 Moisés também pegou o peito e a sua própria porção do carneiro da ordenação, e o moveu perante o Senhor como gesto ritual de apresentação, como o Senhor lhe havia ordenado.
30 मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
30 Então pegou um pouco do óleo da unção e um pouco do sangue que estava no altar e os aspergiu sobre Arão e suas vestes, bem como sobre seus filhos e suas vestes. Assim consagrou Arão e suas vestes, e seus filhos e suas vestes.
31 मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
31 Moisés então disse a Arão e a seus filhos: "Cozinhem a carne na entrada da Tenda do Encontro, onde a deverão comer com o pão do cesto das ofertas de ordenação, conforme me foi ordenado: ‘Arão e seus filhos deverão comê-la’.
32 मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
32 Depois queimem o restante da carne e do pão.
33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.
33 Não saiam da entrada da Tenda do Encontro por sete dias, até que se completem os dias da ordenação de vocês, pois essa cerimônia de ordenação durará sete dias.
34 परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.
34 O que se fez hoje foi ordenado pelo Senhor para fazer propiciação por vocês.
35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”
35 Vocês terão que permanecer dia e noite à entrada da Tenda do Encontro por sete dias e obedecer às exigências do Senhor, para que não morram; pois isso me foi ordenado".
36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
36 Arão e seus filhos fizeram tudo o que o Senhor tinha ordenado por meio de Moisés.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.