Levítico 27

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
1 Disse mais o Senhor a Moisés:
2 इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे.
2 Fala aos filhos de Israel e dize-lhes: Quando alguém fizer voto com respeito a pessoas, estas serão do Senhor , segundo a tua avaliação.
3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे,
3 Se o objeto da tua avaliação for homem, da idade de vinte anos até à de sessenta, será a tua avaliação de cinquenta siclos de prata, segundo o siclo do santuário.
4 आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे.
4 Porém, se for mulher, a tua avaliação será de trinta siclos.
5 मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
5 Se a idade for de cinco anos até vinte, a tua avaliação do homem será de vinte siclos, e a da mulher, de dez siclos.
6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
6 Se a idade for de um mês até cinco anos, a tua avaliação do homem será de cinco siclos de prata, e a tua avaliação pela mulher será de três siclos de prata.
7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
7 De sessenta anos para cima, se for homem, a tua avaliação será de quinze siclos; se mulher, dez siclos.
8 परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
8 Mas, se for mais pobre do que a tua avaliação, então, apresentar-se-á diante do sacerdote, para que este o avalie; segundo o que permitem as posses do que fez o voto, o avaliará o sacerdote.
9 काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
9 Se for animal dos que se oferecem ao Senhor , tudo quanto dele se der ao Senhor será santo.
10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
10 Não o mudará, nem o trocará bom por mau ou mau por bom; porém, se dalgum modo se trocar animal por animal, um e outro serão santos.
11 काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
11 Se for animal imundo dos que se não oferecem ao Senhor , então, apresentará o animal diante do sacerdote.
12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
12 O sacerdote o avaliará, seja bom ou mau; segundo a avaliação do sacerdote, assim será.
13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
13 Porém, se dalgum modo o resgatar, então, acrescentará a quinta parte à tua avaliação.
14 एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
14 Quando alguém dedicar a sua casa para ser santa ao Senhor , o sacerdote a avaliará, seja boa ou seja má; como o sacerdote a avaliar, assim será.
15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
15 Mas, se aquele que a dedicou quiser resgatar a casa, então, acrescentará a quinta parte do dinheiro à tua avaliação, e será sua.
16 एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
16 Se alguém dedicar ao Senhor parte do campo da sua herança, então, a tua avaliação será segundo a semente necessária para o semear: um gômer pleno de cevada será avaliado por cinquenta siclos de prata.
17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
17 Se dedicar o seu campo desde o Ano do Jubileu, segundo a tua plena avaliação, ficará.
18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
18 Mas, se dedicar o seu campo depois do Ano do Jubileu, então, o sacerdote lhe contará o dinheiro segundo os anos restantes até ao Ano do Jubileu, e isto se abaterá da tua avaliação.
19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
19 Se aquele que dedicou o campo dalgum modo o quiser resgatar, então, acrescentará a quinta parte do dinheiro à tua avaliação, e ficará seu.
20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
20 Se não quiser resgatar o campo ou se o vender a outro homem, nunca mais se resgatará.
21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
21 Porém, havendo o campo saído livre no Ano do Jubileu, será santo ao Senhor , como campo consagrado; a posse dele será do sacerdote.
22 स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,
22 Se alguém dedicar ao Senhor o campo que comprou, e não for parte da sua herança,
23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
23 então, o sacerdote lhe contará o preço da avaliação até ao Ano do Jubileu; e, no mesmo dia, dará o importe da avaliação como coisa santa ao Senhor .
24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
24 No Ano do Jubileu, o campo tornará àquele que o vendeu, àquele de quem era a posse do campo por herança.
25 मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
25 Toda a tua avaliação se fará segundo o siclo do santuário; o siclo será de vinte geras.
26 लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
26 Mas o primogênito de um animal, por já pertencer ao Senhor , ninguém o dedicará; seja boi ou gado miúdo, é do Senhor .
27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
27 Mas, se for de um animal imundo, resgatar-se-á, segundo a tua avaliação, e sobre ele acrescentará a quinta parte; se não for resgatado, vender-se-á, segundo a tua avaliação.
28 लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
28 No entanto, nada do que alguém dedicar irremissivelmente ao Senhor , de tudo o que tem, seja homem, ou animal, ou campo da sua herança, se poderá vender, nem resgatar; toda coisa assim consagrada será santíssima ao Senhor .
29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
29 Ninguém que dentre os homens for dedicado irremissivelmente ao Senhor se poderá resgatar; será morto.
30 भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
30 Também todas as dízimas da terra, tanto dos cereais do campo como dos frutos das árvores, são do Senhor ; santas são ao Senhor .
31 म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
31 Se alguém, das suas dízimas, quiser resgatar alguma coisa, acrescentará a sua quinta parte sobre ela.
32 गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.
32 No tocante às dízimas do gado e do rebanho, de tudo o que passar debaixo do bordão do pastor, o dízimo será santo ao Senhor .
33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
33 Não se investigará se é bom ou mau, nem o trocará; mas, se dalgum modo o trocar, um e outro serão santos; não serão resgatados.
34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.
34 São estes os mandamentos que o Senhor ordenou a Moisés, para os filhos de Israel, no monte Sinai.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.