Lucas 14

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.
1 Num sábado, ao entrar Jesus na casa de um dos principais fariseus para tomar uma refeição, eles o estavam observando.
2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.
2 E eis que diante dele se achava um homem hidrópico.
3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”
3 Então Jesus, dirigindo-se aos intérpretes da Lei e aos fariseus, perguntou:
4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.
4 Eles, porém, não disseram nada. Então Jesus pegou na mão daquele homem, curou-o e o mandou embora.
5 मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
5 A seguir, Jesus lhes perguntou:
6 आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
6 A isto nada puderam responder.
7 नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला,
7 Reparando como os convidados escolhiam os primeiros lugares, Jesus contou-lhes uma parábola:
8 “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
8 — Quando alguém convidá-lo para um casamento, não sente no lugar de honra, pois pode haver um convidado mais importante do que você.
9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल.
9 Então aquele que convidou os dois dirá a você: “Dê o lugar a este aqui.” Então você irá, envergonhado, ocupar o último lugar.
10 पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल.
10 Pelo contrário, quando alguém convidá-lo, vá sentar no último lugar, para que, quando vier aquele que o convidou, diga a você: “Amigo, venha sentar num lugar melhor.” Isso será uma honra para você diante de todos os demais convidados.
11 कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
11 Porque todo o que se exalta será humilhado; e o que se humilha será exaltado.
12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.
12 Depois Jesus disse ao que o havia convidado:
13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
13 Pelo contrário, ao dar um banquete, convide os pobres, os aleijados, os coxos e os cegos,
14 म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
14 e você será bem-aventurado, pelo fato de não terem eles com que recompensá-lo. A sua recompensa você receberá na ressurreição dos justos.
15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.”
15 Ao ouvir tais palavras, um dos que estavam à mesa com Jesus lhe disse: — Bem-aventurado aquele que participar do banquete no Reino de Deus.
16 मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले.
16 Jesus, porém, respondeu:
17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले.
17 À hora da ceia, enviou o seu servo para avisar aos convidados: “Venham, porque tudo já está preparado.”
18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’
18 Mas todos eles, um por um, começaram a apresentar desculpas. O primeiro disse: “Comprei um campo e preciso ir vê-lo; peço que me desculpe.”
19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’
19 Outro disse: “Comprei cinco juntas de bois e vou experimentá-las; peço que me desculpe.”
20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
20 E outro disse: “Casei-me e, por isso, não posso ir.”
21 तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
21 — O servo voltou e, contou tudo ao seu senhor. Então, irado, o dono da casa disse ao seu servo: “Saia depressa para as ruas e becos da cidade e traga para cá os pobres, os aleijados, os cegos e os coxos.”
22 नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’
22 Mais tarde, o servo lhe disse: “Patrão, já fiz o que o senhor mandou, e ainda há lugar.”
23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.
23 Então o senhor disse ao servo: “Saia pelos caminhos e atalhos e obrigue todos a entrar, para que a minha casa fique cheia.
24 कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”
24 Porque digo a vocês que nenhum daqueles homens que foram convidados provará a minha ceia.”
25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,
25 Grandes multidões acompanhavam Jesus, e ele, voltando-se, lhes disse:
26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
26 — Se alguém vem a mim e não me ama mais do que ama o seu pai, a sua mãe, a sua mulher, os seus filhos, os seus irmãos, as suas irmãs e até a sua própria vida, não pode ser meu discípulo.
27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
27 E quem não tomar a sua cruz e vier após mim não pode ser meu discípulo.
28 जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
28 Pois qual de vocês, pretendendo construir uma torre, não se assenta primeiro para calcular a despesa e verificar se tem os meios para a concluir?
29 नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,
29 Para não acontecer que, tendo lançado os alicerces e não podendo terminar a construção, todos os que a virem zombem dele,
30 या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!
30 dizendo: “Este homem começou a construir e não pôde acabar.”
31 किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?
31 Ou qual é o rei que, indo para combater outro rei, não se assenta primeiro para calcular se com dez mil homens poderá enfrentar o que vem contra ele com vinte mil?
32 जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.
32 Caso contrário, estando o outro ainda longe, envia-lhe uma embaixada, pedindo condições de paz.
33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
33 Assim, pois, qualquer um de vocês que não renuncia a tudo o que tem não pode ser meu discípulo.
34 मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?
34 — O sal é certamente bom; mas, se o sal se tornar insípido, como lhe restaurar o sabor?
35 ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
35 Não presta mais nem para a terra nem para o monte de estrume; lançam-no fora. Quem tem ouvidos para ouvir, ouça.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.